दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला 50 मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा (Oxigen Supply) होत होता. कर्नाटकमार्गे महाराष्ट्रात हा साठा येत होता. पण महाराष्ट्रात येणारा 50 मेट्रिक टन ऑक्सिजन थांबवण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त समोर येतंय.
काल रात्री ऑक्सिजन थांबवण्यात आल्याचे वृत्त कळताच गोंधळ निर्माण झालाय. कर्नाटकाचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी केंद्र सरकारला सांगून महाराष्ट्राला होणारा 50 मेट्रीक टन ऑक्सीजन पुरवठा थांबवल्याचे सांगण्यात येतंय.
हा पुरवठा थांबल्याने कोल्हापूर, सांगली आणि आसपासच्या जिल्ह्यांच्या ऑक्सिजन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्याच्या ऑक्सिजन पुरवठ्यावरही परिणाम होणार आहे. सध्या कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होतोय. या पार्श्वभुमीवर अशाप्रकारे साठा रोखणे हे संतापजनक असल्याची प्रतिक्रिया राज्यातून उमटतेय.