Good News! गणपतीला बिनधास्त जा गावी, कोकणात 7 विशेष ट्रेन सोडणार; 'या' तारखेपासून बुकिंग

Ganpati Special Train For Konkan: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाकडून सात विशेष रेल्वे गाड्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.    

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 19, 2024, 09:04 AM IST
 Good News! गणपतीला बिनधास्त जा गावी, कोकणात 7 विशेष ट्रेन सोडणार; 'या' तारखेपासून बुकिंग title=
kokan railway to run ganpati special train between - mumbai to sawantwadi ratnagiri booking start from 21 july

Ganpati Special Train For Konkan: गणेशोत्सवासाठी हजारो चाकरमानी कोकणात दाखल होतात. कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळं दरवर्षी रेल्वे प्रशासनाकडून गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांचे आयोजन करण्यात येते. यंदाही रेल्वे गणेशोत्सवासाठी विशेष सात ट्रेन सोडणार आहे. या गाड्यांचे बुकिंग कधी करता येणार, जाणून घ्या सर्व काही 

कोकणात जाण्यासाठी आता चाकरमान्यांची लगबग सुरू होईल. रेल्वेसाठी काही महिने आधीच बुकिंग करावं लागतं. प्रवाशांची हीच गरज लक्षात घेऊन रेल्वेने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे बुकिंग मेपासूनच सुरू करण्यात आले होते. आताही रेल्वे प्रशासनाने मुंबईतून कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी सात गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोकणात जाणाऱ्या या गाड्यांचे आरक्षण 21 जुलैपासून सकाळी आठ वाजता सुरू आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळं चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण रविवारी 21 जुलैपासून सकाळी 8 पासून सुरू होणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

असं असेल या 7 विशेष रेल्वे गाड्यांचे आयोजन 

1) मुंबई सीएसएमटी - सावंतवाडी डेली स्पेशल (३६ फेऱ्या) - ०११५१
स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) पर्यंत दररोज रात्री ००:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १४:२० वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल. ०११५२ स्पेशल सावंतवाडीवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) दररोज १५.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

2) मुंबई सीएसएमटी - रत्नागिरी डेली स्पेशल (एकूण ३६ फेऱ्या) ०११५३
स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) पर्यंत दररोज सकाळी ११:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २०:१० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल. ०११५४ स्पेशल रत्नागिरीवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) दररोज पहाटे ४ वाजता सुटेल आणी त्याच दिवशी दुपारी १३:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावडाव, आरवली रोड, संगमेश्वर रोड.

3) एलटीटी - कुडाळ डेली स्पेशल (३६ फेऱ्या)  ०११६७
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) पर्यंत दररोज रात्री २१:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०९:३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल. ०११६८ स्पेशल कुडाळवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) दररोज दुपारी १२:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ००:४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, अंजनी, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग.

4) ०११७१ स्पेशल एलटीटी मुंबई येथून (36 फेऱ्या)
०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) पर्यंत दररोज सकाळी ०८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २१:०० वाजता सावंतवाडी येथे०११७२ स्पेशल सावंतवाडीवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) पर्यंत दररोज रात्री २२:२० वाजता सुटेल आण ि दुसऱ्या दिवशी सकाळी १०:४० वाजता एलटीटी मुंबई येथे पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग.

5) दिवा चिपळूण मेमू स्पेशल (एकूण ३६ फेऱ्या) ०११५५ मेमू स्पेशल दिवा येथून
०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) पर्यंत दररोज सकाळी ०७:१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १४:०० वाजता चिपळूण येथे पोहोचेल. ०११५६ मेमू स्पेशल चिपळूणवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) पर्यंत दररोज दुपारी १५:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२:५० वाजता दिवा येथे पोहोचेल.

थांबे: दिवा, निळजे, तळोजा, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेन, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गारगाव, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, कळंबणी, खेड, अंजनी.

6) एलटीटी - कुडाळ स्पेशल (१६ सेवा) - ०११८५ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून
०२.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (८ फेऱ्या) पर्यंत सोमवार, बुधवार आणि शनिवारी रात्री ००:४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी १२:३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल. ०११८६ स्पेशल कुडाळवरून ०२.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) सोमवार, बुधवार आणि शनिवारी संध्याकाळी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ०४:५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग.

7) एलटीटी कुडाळ स्पेशल (६ सेवा) -०११६५ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून
०३.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (3 फेऱ्या) पर्यंत मंगळवारी रात्री ००:४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी १२:३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल. ०११६६ स्पेशल कुडाळवरून ०३.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (3 फेऱ्या) पर्यंत मंगळवारी संध्याकाळी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ०४:५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग