Nitesh Kumar:सैन्यात जायची होती इच्छा पण ट्रेन अपघाताने बदललं आयुष्य, भारताच्या 'गोल्डन बॉय'चा संघर्षमय प्रवास

Gold Medalist Nitesh Kumar Inspirational Story: नितेश कुमार पॅरालॉम्पिक्सच्या बॅडमिंटन स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकणारा तिसरा भारतीय ठरला. त्याची कहाणी खूपच संघर्षमय आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Sep 2, 2024, 05:35 PM IST
Nitesh Kumar:सैन्यात जायची होती इच्छा पण ट्रेन अपघाताने बदललं आयुष्य, भारताच्या 'गोल्डन बॉय'चा संघर्षमय प्रवास title=
भारताच्या 'गोल्डन बॉय'चा संघर्षमय प्रवास

Gold Medalist Nitesh Kumar Inspirational Story: नितेश कुमारने पॅरालंम्पिक्स 2024 मध्ये गोल्ड मेडल जिंकलय. त्याने बॅडमिंटनच्या एसएल 3 कॅटगरीमध्ये ग्रेट ब्रिटनच्या डेनियल बैथेल याला 21-14, 18-21, 23-21 ने हरवून सुवर्ण पदक जिंकले. तो पॅरीस ऑलिम्पिक 2024 मध्ये गोल्ड मेडल जिंकणारा दुसरा अॅथलिट बनलाय. भारताचे हे नववे मेडल आहे. नितेशने पहिल्यांदाच पॅरालॉम्पिक्समध्य सहभाग घेतला आणि पहिल्याच प्रयत्नात इतिहास रचला. पॅरालॉम्पिक्सच्या बॅडमिंटन स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकणारा तिसरा भारतीय ठरला. त्याची कहाणी खूपच संघर्षमय आहे. 

 पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक 

संघर्ष हा अनेकांच्या पाचवीला पुजलेला असतो. यावर मात करत जे प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहतात, त्यांना यश मिळतं. भारताचा पॅरा ॲथलीट नितेश कुमारने हे सत्य सिद्ध केले आहे. आज गोल्ड मेडल मिळाल्यानंतर जगभरात या खेळाडुची चर्चा होतेय. पण एक वेळ अशी होती की तो अनेक महिने अंथरुणावर पडून होता. त्याचे आयुष्य जगायचे धाडस तुटले होते. पण आता पुढे काय झाले हे सर्व जगाने पाहिले. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून त्याने इतिहास रचलाय. 

अंथरुणावर पडल्यामुळे गेला नैराश्येत

नितेश 15 वर्षांचा असताना त्याच्या आयुष्याला एक दुःखद वळण लागलं. 2009 मध्ये विशाखापट्टणम येथे झालेल्या रेल्वे अपघातात त्याने आपला पाय गमावला. अंथरुणावर पडल्यामुळे तो खूप नैराश्येत गेला होता. माझे बालपण थोडे वेगळे होते. मी फुटबॉल खेळायचो आणि मग हा अपघात झाला. यामुळे मला माझा खेळ कायमचा सोडावा लागला आणि अभ्यासाला सुरुवात करावी लागली पण खेळ माझ्या आयुष्यात पुन्हा आला, अशी आठवण नितेश सांगतो. बॅडमिंटन एसएल 3 फायनलमध्ये सुवर्ण पदक जिंकलेल्या नितेशला आयआयटी-मंडीमध्ये शिकत असताना बॅडमिंटनची माहिती मिळाली. पुढे जाऊन हाच खेळ त्याची ताकद बनला. सहकारी पॅरा शटलर प्रमोद भगत आणि स्टार क्रिकेटर विराट कोहली यांच्याकडून प्रेरणा घेऊन नितेशने आपले जीवन पुन्हा उभारण्यास सुरुवात केली.

 तंदुरुस्त ॲथलीट

'प्रमोद भैय्या म्हणजे प्रमोद भगत हे माझे प्रेरणास्थान आहेत. ते कुशल आणि अनुभवी आहेत आणि ते माणूस म्हणूनही खूप नम्र आहेत, असे नितेश सांगतो. विराट कोहलीने ज्या प्रकारे स्वत:ला तंदुरुस्त ॲथलीट बनवले आहे त्याचे नितेशला खूप कौतुक वाटते. नितेश स्वत:ला देखील खूप तंदुरुस्त आणि शिस्तप्रिय ठेवतो. 

 नौदलाच्या गणवेशाची क्रेझ

नितेशचे वडील नौदल अधिकारी आहेत. आपणही नोदलात अधिकारी व्हावं असं त्याचं स्वप्न होतं. 'मला नौदलाच्या गणवेशाची क्रेझ होती. मी माझ्या वडिलांना त्यांच्या गणवेशात पाहायचो आणि मला एकतर खेळात किंवा आर्मी किंवा नेव्हीसारख्या नोकरीत राहायचे होते, असे तो सांगतो. पण अपघाताने नितेशच्या स्वप्नांचा चुराडा झाला.असे असताना पुण्यातील कृत्रिम अवयव केंद्राला भेट दिल्यानंतर नितेशचा दृष्टिकोन बदलला.