कॅटचा स्कोर सांग जरा? बिग बींच्या नातीचा IIM मध्ये प्रवेश, लोकांना विश्वास बसेना, इंटरनेटवर ट्रोल!

Navya Naveli Nanda Troll : नव्या नवेली नंदानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही बातमी सांगताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल... 

दिक्षा पाटील | Updated: Sep 2, 2024, 04:31 PM IST
कॅटचा स्कोर सांग जरा? बिग बींच्या नातीचा IIM मध्ये प्रवेश, लोकांना विश्वास बसेना, इंटरनेटवर ट्रोल! title=
(Photo Credit : Social Media)

Navya Naveli Nanda Troll : बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही चर्चेत असलेल्या स्टारकिड्सपैकी एक आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या स्टारकिड्सपैकी ती एक आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर तिच्या आयुष्यातील अपडेट्स शेअर करताना दिसतेय आता नव्या नवेली नंदानं सांगितलं की तिनं आयआयएम अहमदाबादमध्ये अ‍ॅडमिशन घेतलं आणि या संस्थेत शिक्षण घेण्याचं तिचं स्वप्न पूर्ण झालं. त्यानंतर सेलिब्रिटी तिला शुभेच्छा देताना दिसत आहेत. तर काही नेटकऱ्यांनी नव्या नवेली नंदाच्या पोस्टवर कमेंट करत तिला ट्रोल करण्यास सुरुवाच केली आहे. 

नव्या नवेली नंदाला तिच्या वडिलांप्रमाणेच बिझनेस करायचा आहे. खरंतर तिनं आयआयएम अहमदाबादमध्ये एमबीएमध्ये अ‍ॅडमिशन घेतलं आणि तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. तिनं जे फोटो शेअर केले त्यात आपण पाहू शकतो की ती गेटसमोर उभी असून आयआयएम अहमदाबादच्या बोर्डासोबत फोटो क्लिक करते. त्यासोबत नव्यानं तिथल्या कॅम्पसचे देखील काही फोटो शेअर केले होते. त्यासोबत तिनं काही फॅकल्टी आणि मित्र-मैत्रिणींसोबतचे फोटो शेअर केले आहेत. नव्या नवेली नंदानं हे फोटो शेअर करत कॅप्शन दिलं की स्वप्न ही सत्यात उतरतात. पुढचे 2 वर्ष... बेस्ट लोकं आणि फॅकल्टीसोबत असेन! ब्लंडेड पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्राम. नव्या नवेली नंदाच्या या पोस्टवर तिची आई श्वेता बच्चन, करिश्मा कपूर, शनाया कपूर, अनन्या पांडे, सुहाना खानपासून अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हेही वाचा : अमिताभ बच्चन यांच्या नातीनं जे ठरवलं ते मिळवलंच; अखेर तिला मिळाली नशिबाची साथ...

नव्या नवेली नंदाच्या या पोस्टवर लोकांनी कमेंट करत काहींनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. नेटकऱ्यांना विश्वास होत नाही आहे की तिला आयआयएम अहमदाबादमध्ये अ‍ॅडमिशन मिळालं. एका नेटकऱ्यानं कमेंट केली की 'तुझा कॅटचा स्कोर काय सांगितला.' दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली की 'तुमचा जीडीपीआयचा अनुभव शेअर करना.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'तू कॅट क्रेक केलीस की आजोबा आणि मामामुळे अ‍ॅडमिशन मिळालं.' दरम्यान, नव्या नवेली नंदा ही लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे.