छप्पर फाडके! मालवणमध्ये मच्छिमारांना रापणीला लागली 'बंपर मासळी'

रापणीत बंपर बांगडे (Rapani) तब्बल दोन वर्षानंतर मिलाल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे यांत्रिक मासेमारीच्या आक्रमणामुळे आणि हवामानातील बदलांमुळे विस्कळीत झालेल्या पारंपारिक मासेमारीच्या सध्याच्या काळात मोठ्या संख्येने मासे मिळणं अत्यंत दुर्मिळ घटना झाली आहे. 

Updated: Nov 23, 2022, 05:46 PM IST
छप्पर फाडके! मालवणमध्ये मच्छिमारांना रापणीला लागली 'बंपर मासळी'  title=

उमेश परब, झी मीडिया, सिंधूदुर्ग: सिंधुदुर्ग परिसरात मच्छिमारांच्या रापणीला तब्बल दोन वर्षांनी बांगडा (Bangda Fish) मासे लागले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण भागातील पारंपारिक मच्छिमारांना रापणीला बंपर मासळी लागली आहे. रापणीत बंपर बांगडे (Rapani) तब्बल दोन वर्षानंतर मिलाल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे यांत्रिक मासेमारीच्या आक्रमणामुळे आणि हवामानातील बदलांमुळे विस्कळीत झालेल्या पारंपारिक मासेमारीच्या सध्याच्या काळात मोठ्या संख्येने मासे मिळणं अत्यंत दुर्मिळ घटना झाली आहे. अशात या मिळालेल्या बंपर बांगड़ा मासळीमुळे मच्छिमार आनंदित झाले आहेत.

सध्या करोनाच्या (Corona) काळात सगळंच बंद असल्यानं मासेमारांच्या हाती निराशाच येत होती परंतु आता या आनंदाच्या बातमीनं त्यांच्यात आशाचा किरण जागृत झाला आहे. याचा एक व्हिडीओही (Video) समोर आला आहे ज्यातून तुम्ही पाहू शकता की मासेमारांच्या हाती चांगला बांगडा मासा लागला असून मासेमारांच्या चेहऱ्यावर आनंद नांदताना दिसतो आहे. 

मासेमारांच्या आनंदात भर : 

या रापणीतून हजारो मच्छिमारांचे पोट भरले जाते. यंदा या रापणीतून साधारणपणे 13 ते 15 टन मासे जाळ्यात अडकल्याची माहिती समोर आली आहे. सध्या मासेमारांसाठी ही घटना आनंददायी ठरली आहे. या भागात मासेमारी व्यवसायला बेरोजगारीचेही ग्रहण लागल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही घटना त्यांच्यासाठी एक चांगलीच पर्वणी ठरली आहे आणि यामुळे मासेमारांनाही आशेचा किरण सापडला आहे. अनेकदा येथे बेरोजगारीच्या (Unemployment) समस्या असल्याचेही काही उदाहरणांवरून स्पष्ट झाले आहे. या कामातून अनेकांना चांगला रोजगारही मिळतो त्यामुळे अशाप्रकारे इतके टन मासे रापणीला लागणं ही खरंतर आनंदाची बाब आहे. अनेकांना करोनाच्या काळातही कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले होते. तेव्हा आता अशावेळी हे मासे ते बाजारात विकून चांगला नफा (Profit) मिळवू शकतात. सध्या त्यामुळे एक चांगली बाजारपेठ (Market) तयारी होईल. 

मालवण येथे पारंपरिक मच्छिमारांच्या रापपणीला बंपर बांगडा मासळी : 

देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर यंदा बांगडा माशाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. ब-याच वर्षांनी बांगडा मासा एवढ्या मोठ्या प्रमाणात सापडतोय अशी चर्चा मच्छीमारांमध्ये आहे. किंबहुना बांगड्याचा इतका बंपर कॕच आम्ही कधी पाहिला नव्हता असे मच्छीमारांचे म्हणणे आहे. प्राप्त माहितीनुसार हा कॕच इतका बंपर झालाय की त्याला समाधानकारक दर मिळत नाहीय. त्यामुळे मालवण तालुक्यातील शेकडो गिलनेटधारक पारंपरिक मच्छीमारांनी बांगडा मासा पकडणे बंद केले आहे. किनाऱ्यालगत बेकायदेशीररित्या पर्ससीन नेट मासेमारी करणाऱ्या पर्ससीन नौकांमुळे जिल्ह्यातील हजारो पारंपरिक रापण आणि गिलनेटधारक मच्छीमारांच्या व्यवसायाचे आर्थिक समीकरण पुरते बिघडले आहे. 

विक्रमी उत्पादन : 

दरम्यान बांगड्याचे विक्रमी उत्पादन होत असताना रापण व्यावसायिकांच्या जाळ्यात मात्र मोठ्या प्रमाणात बांगडा येत नव्हता. परंतु मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्यानंतर बांगडा आणि काही प्रमाणात तारली मासळीचे थवे देवबाग, तारकर्ली आणि वायरी किनाऱ्यावर सरकल्याचे पहावयास मिळाले. रापणीच्या जाळ्यात भरपूर मासळी अडकल्याचे निदर्शनास आल्यास मच्छीमार रापण लगेच ओढत नाहीत. रापण किनाऱ्यावर बांधून ठेवली जाते. मत्स्य व्यापाऱ्यांशी बोलणी झाल्यावर मासळीचा उपसा करायला सुरूवात होते. मुख्य रापण बांधून ठेवत रापणीची छोटी-छोटी जाळी अर्थात पाटे घेऊन थोडी-थोडी मासळी किना-यावर आणली जाते. 

जुने दिवस परत... :

25 वर्षांपूर्वी रापण व्यवसाय जोरात असताना दोन ते तीन दिवस बांगडा मासळीचा उपसा केला जायचा. यावेळी मच्छीमारांसाठी त्यांचे कुटुंबिय किनाऱ्यावर जेवणाचे डबे घेऊन जायचे. आमटीसाठी मासे नेणा-यांची रापणीकडे अक्षरशः रीघ लागायची. दोन्ही हाताच्या बोटांमध्ये बांगड्याची 'गाथण' करून बांगडे आमटीसाठी नेले जायचे. रात्रीच्यावेळी शेकोटीवर बांगडे भाजून खाण्याचा आनंद घेतला जायचा. मागील दोन दिवस मालवणातील काही किनाऱ्यांवर हे दुर्मिळ झालेले चित्र पुन्हा बघावयास मिळाले. परंतु रविवारी किनाऱ्यालगत सुरू झालेला खांडवी मासळीचा ओघ बुधवारपासून काहीसा कमी झाला आहे. पण या तीन दिवसात रापणीचे ते जुने दिवस अनुभवल्याचे उद्गार मात्र मच्छीमारांच्या तोंडून ऐकावयास मिळाले. 

रापणी काय असते? :

जेव्हा मच्छिमार समुद्रात किंवा तलावात मासे पकडण्यासाठी जातात तेव्हा ते दोन मच्छिमारांचा (Fishermen) चमू तयार करतात. त्यातला एक चमू बोटीच्या एका बाजूला असतो तर दुसरा चमू होडीच्या दूसरा बाजूला असतो आणि त्यानूसार मध्ये ठेवलेल्या जाळीतून ते अडकलेले मासे हळूहळू पुढे घेऊन जातात. ज्याद्वारे या प्रक्रियेला रापणीचं असं म्हणतात.