Ambabai Gabhara Darshan:अंबाबाई देवीच्या भक्तांसाठी खुशखबर समोर येत आहे. कोरोनाच्या काळापासून भाविकांना पितळी उंबऱ्याच्या बाहेरुनच देवीचे दर्शन घेता येत होते. पण करवीर निवसनी अंबाबाई देवीचे दर्शन आता गाभाऱ्यातुन करता येणार आहे.
कोरोनाच्या काळात दूरुन दर्शनाची व्यवस्था केली होती. पण आता देवीच्या जवळ जाऊन दर्शन घेण्याची पर्वणीच भाविकांना मिळणार आहे. देवीचे रुप आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी भाविक दुरुन येत असतात. पण त्यांना गाभाऱ्यात जाता येत नव्हते. पण उद्या म्हणजेच 29 ऑगस्टपासून भाविकांसाठी अंबाबाई देवीचे गाभारा दर्शन सुरू होणार आहे.
कोरोना काळात बंद करण्यात आलेलं गाभारा दर्शन अखेर सुरू करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. काही गर्दीचे दिवस वगळता भाविकांना अंबाबाईचे दर्शन घेता येणार आहे. यामुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे केसरकर यावेळी म्हणाले.