कोल्हापूर : कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता पकरवीर निवासिनी अंबाबाई मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आाला आहे. मध्यरात्रीपासून भक्तांसाठी मंदिर बंद करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने केला आहे. त्यामुळे मंदिर परिसरात शुकशुकाट जाणवत आहे. काही भक्त मंदिराच्या बाहेरूनच अंबाबाई देवीचं दर्शन घेवून परतत आहेत. दरम्यान, अंबाबाई देवीचे रोजचे विधी नित्यनियमाने सुरू असणार आहेत. हे विधी करण्यासाठी काही पुजाऱ्यांची निवड केली आहे.
अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी मंदिर परिसरात असते. परंतु कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय खबरदारीचा उपाय म्हणून अंबाबाई, जोतीबा मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळ अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहेत.
साडेतीन शक्तीपींठापैकी महत्त्वाचं असणारं अंबाबाई मंदिर यापूर्वी कधी ? आणि का बंद करण्यात आलं होतं..
- ३० जानेवारी १९८४ रोजी गांधी हत्या झाल्यानंतर अंबाबाई मंदिर आठ दिवस बंद होत.
- १९५५ साली अंबाबाई देवीच्या मूर्तीवर वज्रलेप करण्यात आलं होतं. त्यावेळी अंबाबाई देवीचं मंदिर दोन दिवस बंद होत.
- १९९२ साली अंबाबाई मंदिरात बॉम्ब असल्याची अफवा पसरली होती. त्यावेळी अंबाबाई मंदिर दोन दिवस बंद करण्यात आलं होतं.
त्यानंतर आाता कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई देवीचे मंदिर अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलं आहे.