कोल्हापूर : नेहमी वादग्रस्त ठरणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेची सभा आज वेगळ्याच कारणांनी गाजली. महापालिकेची सभा सुरु असतानाच भर सभागृहात विरोधी गटाच्या नगरसेवकाने सत्ताधारी काँग्रेसच्या गटनेत्याची चुंबन घेतल्याने सर्व जण आवाक झाले आणि जोरदार हशा पिकला.
#BreakingNews । नेहमी वादग्रस्त ठरणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेची सभा आज वेगळ्याच कारणांनी गाजली. महापालिकेची सभा सुरु असतानाच भर सभागृहात विरोधी गटाच्या नगरसेवकाने सत्ताधारी काँग्रेसच्या गटनेत्याची चुंबन घेतल्याने सर्वजण आवाक झाले आणि जोरदार हशा पिकला.https://t.co/HOK58cBO5u pic.twitter.com/uAPwIUxrhA
— ZEE २४ तास (@zee24taasnews) January 30, 2020
आज महानगरपालिकेत विरोधी गट असलेल्या ताराराणी आघाडीचे नगरसेवक कमलाकर भोपळे सत्ताधारी गटाच्या बाकावर जाऊन बसले. त्यांच्याशेजारी काँग्रेसचे गटनेते आणि स्थायी समितीचे सभापती शारगंधर देशमुख बसले होते. सभागृहाचे कामकाज सुरु झाले अन् अभिनंदनाचे ठराव सुरु असतानाच भोपळे आणि देशमुख यांच्यात काहीतरी बोलणे झाले. त्यानंतर खुशीत असलेल्या कमलाकर भोपळे यांनी भरसभागृहात शारगंधर देशमुख यांचे चुंबन घेतले. ही चित्रण कॅमेऱ्यात कैद झाले. तोपर्यंत सभागृहात एकच हशा पिकला.
अचानक झालेल्या याप्रकारामुळे शारगंधर देशमुखही कावरेबावरे झाले. त्यांनाही हसू आवरता आले नाही. दरम्यान, ही बाब सर्व सभागृहाच्या लक्षात आल्यानंतर हशा पिकला. नेमकी काय चर्चा सुरु होती हे समजले नाही, मात्र सभागृहात अशा वागण्यामुळे त्याची उलटसुलट चर्चा सुरु होती. सभागृहात अशाप्रकारचे वर्तन योग्य नसल्याचीही प्रतिक्रीय दबक्या आवाजात उमटली.