कोल्हापूर : जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात सोमवारी रात्री एक भीषण अपघात घडलाय. या अपघातात तीन विद्यार्थ्यांचा जागीच चेंदामेंदा झाला तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी अवस्थेत आढळले.
रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका कारला मागून येणाऱ्या कंटेनरनं जोरदार धडक दिल्यानं हा अपघात घडलाय. यामध्ये कारमधील तीन विद्यार्थी जागीच ठार झाले. हरळी बुद्रुक जवळील इंचनाळ भागात हा अपघात घडला.
सुरज ब्रह्मा पाटील (रा. बेळगाव), सुरज जयवंत टिप्पे (रा. तमनाकवाडा) आणि विश्वजीत पांडुरंग पाटील ( रा. गोकुळ शिरगाव) या तीन विद्यार्थ्यांची नावं आहेत.
तर या अपघाता दरम्यान या गाडीत असणारे संदेश सदाशिव टिप्पे (रा. तमनाकवाडा) आणि अजिनाथ साहेबराव खुडे (रा. वडगा) हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी अवस्थेत आहेत. त्यांना जवळच्याच रुग्णालयात हलवण्यात आलंय.
गडहिंग्लजमध्ये भीषण अपघात, तीन विद्यार्थ्यांचा चेंदामेंदा