कोल्हापूर : कोल्हापूरची जीवनदायीनी पंचगंगा नदी नेहमीच प्रदूषणाच्या मुद्द्यावरून चर्चेचा विषय ठरली आहे. यापूर्वी कधी फेसळालेले पाणी तर कधी मृत माशांचा खच लागल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र आज पंचगंगा नदीत इथल्या नागरिकांना वेगळंच चित्र पाहायला मिळाले. जे पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली. तसेच अनेकांनी याचा व्हिडीओ देखील काढला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावरती सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहे.
पंचगंगा नदीच्या पृष्ठ भागावर जणू हजारो मासे नदीच्या पाण्याच्या पृष्ठभागावर दिसून आले. तुम्हाला हे दृश्य पाहून वाटेल की, हे मासे जणू एकामागे एक रांगेत उभे राहून परेडच करत आहेत.
कधी तासंतास पाण्यात गळ टाकूनही मासे मिळत नाहीत मात्र एव्हड्या मोठ्या प्रमाणात नदीत मासे पाहून अनेकजण चक्रावले. माशांचा हा अफलातून व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामागे नेमकं कारण स्पष्ट झाले नसले तरी हा प्रदूषणाचा परिणाम आहे का अशी भीती सुद्धा व्यक्त केली जात आहे.