कोल्हापुरात भाजपला दे धक्का, काँग्रेस-राष्ट्रवादीची जिल्हा परिषदेवर सत्ता

कोल्हापुरात महाराष्ट्र विकासआघाडीचा भाजपला दे धक्का, काँग्रेस-राष्ट्रवादीची बाजी

Updated: Jan 2, 2020, 04:33 PM IST
कोल्हापुरात भाजपला दे धक्का, काँग्रेस-राष्ट्रवादीची जिल्हा परिषदेवर सत्ता title=
संग्रहित छाया

कोल्हापूर : जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीने मुसंडी मारत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटल यांना दणका दिला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसचे बजरंग पाटील यांची निवड झाली आहे. त्यांनी भाजपच्या अरुण इंगवले यांचा पराभव केला.  तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांची निवड झाली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत महाराष्ट्र विकासआघाडीचा प्रयोग यशस्वी झाला. जिल्हा परिषदेच्या राजकारणात शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत होती. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपला आस्मान दाखवले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

महाराष्ट्र विकासआघाडीकडून बजरंग पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता. तर राष्ट्रवादीकडून उपाध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून सतिश पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरविले होते. ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला चांगलाच झटका दिला आहे.

काँग्रेसचे बजरंग पाटील यांना ४१ मते मिळालीत तर भाजप आघाडीकडून अरुण इंगवले यांना केवळ २४ मते मिळालीत. त्यामुळे बजरंग पाटील हे १७ मतांनी विजयी झालेत. तर भाजपने आवाडे गट, चंदगड युवक क्रांती आघाडी, जनसुराज्य, ताराराणी आघाडी यांच्यासोबत युती केली होती. तरीही भाजपला जोरदार धक्का बसला आहे.

जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस १४, राष्ट्रवादी १०, स्वाभिमानी शेतकरी संघटना २, शाहू आघाडी २, अपक्ष १, चंदगड विकास आघाडी १, ताराराणी आघाडी १ असे ४१ अशी महाविकास आघाडीकडे पक्षीय बलाबल होते तर भाजपकडे १३, आवाडे गट २, चंदगड युवक क्रांती आघाडी १, जनसुराज्य ६, ताराराणी आघाडी २ असे २४ चे संख्याबळ होते.