महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण; इथं आहे राज्यातील सर्वात मोठा वीज निर्मीती प्रकल्प

कोयना धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. या धरणाचा महाराष्ट्राच्या प्रगतीत मोलाचा वाटा आहे. 

वनिता कांबळे | Updated: Feb 20, 2024, 11:35 PM IST
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण; इथं आहे राज्यातील सर्वात मोठा वीज निर्मीती प्रकल्प  title=

Koyna Dam : पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्हयात असलेले कोयना धरण हे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी  म्हणून ओळखले जाते. हे धरण दुष्काळग्रस्त बागाची तहानच भागवत नाही तर राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावते. राज्यातील सर्वात मोठा वीज निर्मीती प्रकल्प  कोयना धरणावरच आहे. सांगलीतील दुष्काळग्रस्त भागात याच धराणातून पाणी पुरवठा करण्यात आला आहे. 

कोयना नदीमध्ये 2 हजार600 क्युसेक पाण्याचा विसर्ग

सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढल्यानं, कोयना नदी पात्रात पाचशे क्युसेक विसर्ग सुरु करण्यात आलाय. कोयना धरण पायथा विद्युत गृहाची दोन्ही युनिट सुरू असून, त्यातून 2हजार100 क्युसेक विसर्ग सुरू आहे. सध्या कोयना नदीमध्ये एकूण 2 हजार600 क्युसेक विसर्ग सुरू आहे. यामुळे दुष्काळग्रस्त भागाला मोठा दिलासा मिळाला आहे. 

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी 

कोयना नदी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आहे. याच नदीवर उभारण्यात आलेले  कोयना धरण देखील महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी बनले आहे. महाबळेश्वर येथे उगम पावणाऱ्या कोयना नदीवर हे धरण बांधण्यात आले. कोयना धरण 103 मीटर उंच आहे. 1954 साली महाराष्ट्र सरकारने कोयना धरणाचे काम सुरु केले. 1963 धर बांधून पूर्ण झाले. 103 मीटर उंच  हे धरण 803 मीटर  लांब आहे.  कोयना धरणामुळे तब्बल 12 हजार 100 हेक्टर क्षेत्रफळ ओलिताखाली आले आहे. त्यामूळेच हा प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. 105 टीएमसी म्हणजेच 2900 दशलक्ष घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता कोयना धरणाची आहे. 

महाराष्ट्राची प्रगती

कोयना धरणामुळे महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणात झाली. पश्चिम महाराष्ट्रात भरभराट आली. कोयना धरणामुळे शेतीबरोबरच सातारा सांगली व कोल्हापूर येथील औद्योगिक क्षेत्राला  पाणीपुरवठा होऊ लागला. कोयना धरण हे महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्पांपैकी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. कोयना धरणावरील जलविद्युत प्रकल्पातून 1960 मेगावॅट इतक्या प्रचंड क्षमतेची वीज निर्मीती केली जाते. कोयान वीज निर्मिती प्रकल्पातील वीज महाराष्ट्र बरोबरच गोवा व कर्नाटक इतर राज्यांनाही वितरित केली जाते. 

पर्यटनाला चालना

कोयना धरणामुळे पश्चिम महाराष्ट्र विशेषत: सातारा जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळाली आहे. धरणातून तयार झालेल्या शिवसागर जलाशयाला पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. तसेच कोयना अभयारण्य देखील पर्यटकांचे मुख्य आक्रषण आहे.