सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयात गुरूवारी एका महिलेने सयामी जुळ्या मुलीला जन्म दिला आहे. सिव्हिलमध्येअशा प्रकारचे बाळ पहिल्यांदाच जन्माला दिल आहे. या बाळाला दोन डोके असून एक शरीर आहे. तसेच त्याला दोन हृदय, दोन श्वसन व अन्ननलिका आहेत. या रुग्णालयात अशी प्रसूती पहिल्यांदाच झाली असल्याच डॉक्टरांनी सांगितलं आहे.
बुधवारी प्रसुतीसाठी या महिलेले रूग्णालयात दाखल केले होते. या महिलेची प्रसूतीपूर्व सोनोग्राफी केली होती. यावेळी सयामी बाळ असल्याची कल्पना दाम्पत्याला देण्यात आली होती. या महिलेचं सिझर करून दोन डोके असलेले बाळ जन्माला आले. वैद्यकीय परिभाषेत याला ‘कोजाईन्ड टिष्ट्वन’ म्हटले जाते.
जन्माला आलेल्या बाळाला दोन हृदय, दोन श्वसननलिका, दोन हात, दोन पाय, एक लिव्हर आणि दोन किडनी असून शरीर मात्र एकच आहे. या बालकाला रुग्णालयातील बी ब्लॉकमध्ये नवजात शिशू अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या बाळाला आॅक्सिजन, सलाईन व अन्य औषधे सुरु आहेत.
दोन डोकी असणारे अशा प्रकारची प्रसूती होण्याचे प्रकार लाखातून एक असे आढळते. अशा घटना जगभरात घडलेल्या आहेत. मात्र सोलापुरात माझ्या पस्तीसएक वर्षाच्या कालावधीमध्ये पहिलीच घटना आहे. अन्यत्र खासगी रुग्णालयात हा प्रकार दुर्मिळ असावा. गर्भधारणेतील दोषामुळे अशी गुंतागुंतीचे अपत्य जन्माला येऊ शकते असे डॉक्टरांनी सांगितले आहे.