सिंहगडावरुन १५० फूट दरीत पडूनही 'त्या' गर्भवती महिलेचे प्राण वाचले

'दैव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय देणारी घटना सिंहगडावर घडलीये. सेल्फी काढत असताना सिंहगडावरुन एक गर्भवती महिला पाय घसरुन १५० फूट खोल दरी कोसळली. दैव बलवत्तर होते म्हणून तिचे प्राण वाचले.

Updated: Aug 7, 2017, 04:21 PM IST
सिंहगडावरुन १५० फूट दरीत पडूनही 'त्या' गर्भवती महिलेचे प्राण वाचले title=

पुणे : 'दैव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय देणारी घटना सिंहगडावर घडलीये. सेल्फी काढत असताना सिंहगडावरुन एक गर्भवती महिला पाय घसरुन १५० फूट खोल दरी कोसळली. दैव बलवत्तर होते म्हणून तिचे प्राण वाचले.

प्रणिती लहू इंगळे असं या महिलेचं नाव आहे. शनिवारी प्रणिती आपला नवरा आणि भावासह सिंहगडावर फिरण्यास आली होती. दरड कोसळल्याने येथील वाहतूक बंद आहे. त्यामुळे पर्यटक गडावर पायीच जातायत. 

सिंहगडावर फिरण्यासाठी गेलेली असताना प्रणिती सेल्फी काढण्यासाठी कड्याच्या टोकावर उभी होती. यावेळी तिचा तोल गेला आणि ती १५० फूट खोल दरीत कोसळली. 

मात्र त्यावेळी तेथील स्थानिक लोकांनी तिला वाचवले आणि बाहेर काढले. त्यानंतर तात्काळी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.