Pune Paper Leak | अखेर पेपरफुटीचं गूढ उकललं, पेपर फोडण्यात चक्क सीईओचाच हात असल्याचं समोर

पुण्यातील आरोग्य विभागाच्या गट ड संवर्गाच्या (Health Department Group D Exam Pune) पेपर फुटीप्रकरणी (Pune Paper Leak) अखेर मोठा खुलासा झाला आहे. 

Updated: Dec 8, 2021, 07:18 AM IST
Pune Paper Leak | अखेर पेपरफुटीचं गूढ उकललं, पेपर फोडण्यात चक्क सीईओचाच हात असल्याचं समोर

पुणे : आरोग्य विभागाने मोठ्या गाजावाजा करत ड विभागांतर्गत येणाऱ्या विविध पदांसाठी (Health Department Group D Exam)  परीक्षा घेण्यात आली. मात्र काही तासांनी पेपर फुटल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी अखेर मोठा खुलासा झाला आहे. या पेपरफुटीमागे चक्क आरोग्य विभागाच्या सीईओचा हात असल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी कसून केलेल्या तपासानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. (Latur Public Health Department Chief Administrative Officer Prashant Badgire is main accused in Health Department Group D Exam paper leak pune) 

लातूरमधील सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे हेच पेपरफुटी प्रकरणी मुख्य सूत्रधार असल्याचं निषपण्ण झालंय. बडगिरे यांच्या विभागात संदीप जोगदंड आणि शाम म्हसके हे कार्यरत होते. या दोघांच्या मदतीने बडगिरेंनी पेपर फोडला.

बडगिरे यांनी संदीप जोगदंडकडून 10 लाख आणि शाम म्हसकेकडून 5 लाख रुपये घेत पेपर फोडला. दरम्यान पुणे पोलिसांच्या सायबर शाखेकडून याप्रकरणी कसून चौकशी केली जात आहे. आतापर्यंतच्या तपासातून हाती लागलेल्या पुराव्यांच्या आधारे एकूण 11 जणांना अटक करण्यात आली आहे.