नाशिक : इगतपुरी शहरात एका हॉटेलमध्ये धांगडधिंगा सुरु होता. मध्य पार्टीत मुलींसह तरुणांचा हा धिंगाणा सुरु होता. यावेळी अश्लील प्रकार होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा मारला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंबई - नाशिक महामार्गावरील इगतपुरीच्या रेन फॉरेस्ट हॉटेलवर पोलिसांनी छापा मारला. मद्यधुंद अवस्थेत तरुण-तरुणींचा धांगडधिंगा सुरु होता. धांगडधिंगाणा करणाऱ्या ८ ते ९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मद्य पार्टीत अश्लील प्रकार सुरु होता. काही मुली सुद्धा पार्टीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. मद्यरात्री ईगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.