Breaking News Live Updates: आपली मागणी 13 तारखेपर्यंत मान्य झाली तर ठीक अन्यथा..., मनोज जरांगेंचा इशारा

मुंबईत काल रात्री पासून पावसाची संततधार सुरु आहे. जोरात तर कधी हलक्या स्वरूपात कोसळतात सरी कोसळत आहेत. यामुळे रस्ते वाहतूक सुरळीत असली तरी मध्य रेल्वेची लोकल 15 ते 20 मिनिट उशिराने धावतेय. 7 रोजी कोकणात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. आषाढी वारी निमित्ताने

Breaking News Live Updates: आपली मागणी 13 तारखेपर्यंत मान्य झाली तर ठीक अन्यथा..., मनोज जरांगेंचा इशारा

Breaking News Live Updates: मुंबईत काल रात्री पासून पावसाची संततधार सुरु आहे. जोरात तर कधी हलक्या स्वरूपात कोसळतात सरी कोसळत आहेत. यामुळे रस्ते वाहतूक सुरळीत असली तरी मध्य रेल्वेची लोकल 15 ते 20 मिनिट उशिराने धावतेय. 7 रोजी कोकणात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. आषाढी वारी निमित्ताने
आज पासून श्री विठ्ठल रुक्मिणी यांचे 24 तास दर्शन भाविकांना मिळणार आहे. राज्यासह देशभरातील अशा महत्वाच्या अपडेट्स जाणून घेऊया.

7 Jul 2024, 18:05 वाजता

मनोज जरांगेंचं परभणीत भाषण

- मराठा आरक्षणासाठी राज्यातील मराठ्यांनी कंबर कसली आहे. आता लेकरावर वाईट वेळ येऊ नये म्हणून मराठे आंदोलनात उभे राहिलेत

- मराठ्यांनी एक इंचही आता मागे सरकायचं नाही
 
 -सरकारने ओबीसींना आरक्षण असूनही त्यांचे नेते मराठ्यांच्या विरोधात उपोषणाला बसवलेत.

- आम्हाला अभ्यास नाही तरीही नेते उताने पाताणे केलेत

- सरकार आमचा अंत पाहू नका जर दोरी हातातून निसटली तर मराठे माझंही ऐकणार नाहीत
मराठ्यांना आता। सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या,

- तो ओबीसी मतांची आतापर्यंत ओबीसी मतांची दाखवत होता पण लोकसभेत मराठ्यांनी कचका दाखवल्यानं ते आता मराठ्यांच्या नादेला लागत नही भुजबळ यांच्यावर टीका

- आता येवल्यातील लोक म्हणतात आम्ही याला पाडणार. मी अडाणी असलो तरी मराठ्यांना आरक्षण दिलंय

- आतापर्यंत दीड कोटी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं. तो म्हणतो मी कसला तरी दिसतो.तुला का माझ्याशी लग्न करायचं आहे का?

- मराठ्यांना फक्त एवढं म्हणालो की पाडा त्यांनी रपा रपा पाडले

- चंद्रकांत पाटील मराठ्यांमध्ये गैरसमज पसरवत आहे.चंद्रकांत दादा तुमहाला सोयरे आणि नातेवाईक यांच्यातील फरक कळतो का? चुलते पुतणे तुमच्यात सगेसोयरे कधी व्हायला लागलेत, तुमच्यात चुलत्या पुतण्यांचं लग्न होतं का.?जरांगे यांचा चंद्रकांत पाटील यांना सवाल

- आपली मागणी 13 तारखेपर्यत मान्य झाली तर ठीक अन्यथा आपल्याला मान्य नाही
नाहीतर बघू मग मुंबई

7 Jul 2024, 17:24 वाजता

उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांसोबत संवाद

छत्रपती संभाजी नगर दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी निपाणी फाट्यावर येऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळेस सरकारच्या योजनांचा लाभ मिळतो का? अशी विचारणा त्यांनी शेतकऱ्यांना केली. आम्हाला कुठलीही योजना नको फक्त आमच्या पिकांना भाव द्या अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. शेतमजूर महिलांशी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली.  यावेळी एक चिमुकला शाळेत जात नाही त्याचा शाळेचा खर्च शिवसेना करेल असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 

7 Jul 2024, 14:47 वाजता

डोंबिवली एमआयडीसी फेस दोन मध्ये एका कंपनीमध्ये आग, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी, आग नियंत्रणात

 

7 Jul 2024, 14:19 वाजता

हे या सरकारचे अखेरचे अधिवेशन- उद्धव ठाकरे 

उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर येथून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला.आपण हक्काची संभाजी नगर जागा गमावली, कारण काहीही असेल हार झाली आहे, अती आत्मविश्वास नडला का असेल कदाचित असे ठाकरे म्हणाले. खैरे निष्ठेने राहिले म्हणून उमेदवारी देऊन आदर केला.अधिवेशनाला सुरुवात झाली हे या सरकारचे अखेरचे निरोपाचे अधिवेशन आहे. आपण यांना घालवायची शपथ घ्यायला हवी, असे ठाकरे म्हणाले. 

7 Jul 2024, 13:50 वाजता

सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट 

अजित पवारांच्या काटेवाडीतील घरी जाऊन सुप्रिया सुळे आणि यूगेंद्र पवार यांनी आशा काकींची घेतली भेट...मी अजित पवारांच्या घरी नाही तर आशा काकींच्या घरी गेले होते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच दरवेळेस मी काटेवाडीत आल्यावर आशा काकींची भेट घेतली...काटेवाडीत दादांची माझी भेट झाली नसल्यांचे त्यांनी स्पष्ट केले.

7 Jul 2024, 13:26 वाजता

नाशिकमध्ये अजित पवारांना मोठा धक्का, 100 जण जाणार पवार गटात 

नाशिकमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसलाय.अजित पवार गटातून जवळपास 100 जण शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत.आज शरद पवारांच्या उपस्थितीत ते प्रवेश  करणार आहेत. माजी आमदार नितीन भोसले यांनी यासंदर्भातील माहिती दिली. नाशिकचे शहराध्यक्ष नानासाहेब महाले हे पुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामध्ये होते. त्यांच्या सोबत 100 कार्यकर्ते आज बारामतीच्या गोविंद बागेत शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत.

7 Jul 2024, 13:13 वाजता

नागपुरात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु

जून महिन्यात आणि जुलैच्या पहिल्या पावसान ओढ दिल्यानंतर आज सकाळपासून नागपुरात पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. पूर्व विदर्भात जून महिन्यात चंद्रपूर, गडचिरोली भंडारा येथे 40% पेक्षा जास्त कमी पाऊस झाला आहे... संपूर्ण विदर्भात 16 टक्के कमी पाऊस झाला आहे. आजच्या पावसामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. विदर्भात प्रादेशिक हवामान विभागाने येलो अलर्ट जाहीर केला आहे.

7 Jul 2024, 12:57 वाजता

पुण्यातील बेकायदा पार्टी प्रकरणी आरोपींना शिक्षा 

पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील एल-थ्री बारमध्ये बेकायदा पार्टी झाली होती. याप्रकरणी बार मालक-चालक,पार्टीचे आयोजक,डीजे, अंमली पदार्थांचे सेवन करणारे आणि पुरवठा करणारे यांच्यासह अन्य आरोपींना सह दिवाणी न्यायाधीश यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर 19 आरोपींची केली कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

पार्टीत ड्रग्ज कुठून आणले? त्या मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यायचा आहे.अटक आणखी आरोपींची चौकशी करायची आहे.त्यामुळे तपास अधिकारी यांनी कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. मात्र,आरोपींच्या वकिलांनी पोलिसांच्या मागणीला विरोध केला.

7 Jul 2024, 11:51 वाजता

पुण्यातील एस पी कॉलेजमधील मुलांच्या वसतिगृहात विद्युत पुरवठा करणारया सिटी मीटरमध्ये आगीची घटना 

 महाविद्यालय कर्मचारयांकडून अग्निरोधक उपकरण वापरुन आग विझवण्याचा प्रयत्न; 

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण. जखमी नाही

7 Jul 2024, 10:13 वाजता

पंढरपूर तालुक्यात शरद पवार पुन्हा मोठा धक्का देण्याची शक्यता 

भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके पुन्हा शरद पवारांच्या भेटीला 

काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी सोडून भालके गेले होते बीआरएसमध्ये, आज गोविंद बागेत भेटीसाठी दाखल