Breaking News Live Updates: आपली मागणी 13 तारखेपर्यंत मान्य झाली तर ठीक अन्यथा..., मनोज जरांगेंचा इशारा

मुंबईत काल रात्री पासून पावसाची संततधार सुरु आहे. जोरात तर कधी हलक्या स्वरूपात कोसळतात सरी कोसळत आहेत. यामुळे रस्ते वाहतूक सुरळीत असली तरी मध्य रेल्वेची लोकल 15 ते 20 मिनिट उशिराने धावतेय. 7 रोजी कोकणात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. आषाढी वारी निमित्ताने

Breaking News Live Updates: आपली मागणी 13 तारखेपर्यंत मान्य झाली तर ठीक अन्यथा..., मनोज जरांगेंचा इशारा

Breaking News Live Updates: मुंबईत काल रात्री पासून पावसाची संततधार सुरु आहे. जोरात तर कधी हलक्या स्वरूपात कोसळतात सरी कोसळत आहेत. यामुळे रस्ते वाहतूक सुरळीत असली तरी मध्य रेल्वेची लोकल 15 ते 20 मिनिट उशिराने धावतेय. 7 रोजी कोकणात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. आषाढी वारी निमित्ताने
आज पासून श्री विठ्ठल रुक्मिणी यांचे 24 तास दर्शन भाविकांना मिळणार आहे. राज्यासह देशभरातील अशा महत्वाच्या अपडेट्स जाणून घेऊया.

7 Jul 2024, 09:59 वाजता

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस एक पाऊल पुढे. इच्छुक उमेदवारांकडून काँग्रेसने पुण्यात मागवले अर्ज

सोमवार पासून अर्ज घेण्यात येणार,काँग्रेस पक्षाने पुणे शहरातील सर्व 8 विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांकडून मागवले अर्ज

5 ऑगस्ट पर्यंत इच्छुकांना भरता येणार अर्ज, लवकरच शहर काँग्रेस कमिटी प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठवणार इच्छुकांचे अर्ज

7 Jul 2024, 09:21 वाजता

शिराळ्यातल्या गुन्ह्यातुन राज ठाकरेंची दोष मुक्तता. इस्लामपूर न्यायालयाने दिला निकाल.

2008 मध्ये शेंडगेवाडी येथे मनसेच्या आंदोलन प्रकरणी दाखल झाला होता गुन्हा.रेल्वे भरती प्रकरणी मराठी मुद्द्यावरून मनसेने केलेल्या आंदोलनाला लागलं होतं,हिंसक वळण.

शिराळा न्यायालयामध्ये मनसेच्या जिल्हाध्यक्षांसह राज ठाकरें विरोधात सुरू होता खटला. गुन्ह्यातून राज ठाकरेंचं नाव काढण्याचा इस्लामपूर न्यायालयात केला होता अर्ज. याच खटल्याप्रकरणी राज ठाकरेंना शिराळा न्यायालयाकडून दोन वेळा बजावण्यात आला होता अजामीन पत्र वॉरंट.

7 Jul 2024, 08:43 वाजता

आजपासून श्री विठ्ठल रुक्मिणीचे 24 तास दर्शन भाविकांना मिळणार

7 Jul 2024, 08:43 वाजता

आषाढी वारी निमित्ताने आजपासून श्री विठ्ठल रुक्मिणी यांचे 24 तास दर्शन भाविकांना मिळणार, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती

आज 11 वाजता नैवेद्य झाल्यानंतर देवाचा आणि मातेचा पलंग काढला जाईल. यानंतर देवाला पाठीमागे कापसाचा लोड आणि रुक्मिणी मातेला कापसाचा तक्क्या लावतात. आजपासून भाविकांना अखंड दर्शन देण्यासाठी देव उभे राहणार

7 Jul 2024, 08:28 वाजता

आषाढी वारी निमित्ताने आजपासून श्री विठ्ठल रुक्मिणी यांचे 24 तास दर्शन भाविकांना मिळणार, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती

आज 11 वाजता नैवेद्य झाल्यानंतर देवाचा आणि मातेचा पलंग काढला जाईल. यानंतर देवाला पाठीमागे कापसाचा लोड आणि रुक्मिणी मातेला कापसाचा तक्क्या लावतात. आजपासून भाविकांना अखंड दर्शन देण्यासाठी देव उभे राहणार

7 Jul 2024, 08:07 वाजता

तानशेत दरम्यान रेल्वे ट्रॅक वर पडले झाड, कसाराहून येणारी वाहतूक अनिश्चित काळासाठी ठप्प

7 Jul 2024, 07:48 वाजता

उद्धव ठाकरे यांचा शिवसंकल्प मेळावा आज संभाजीनगर मध्ये होणार आहे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे यांचा आज पहिला संभाजीनगर दौरा आहे ,या मेळाव्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे विधानसभेचे रणशिंग फुंकणार आहे महत्त्वाचं म्हणजे मेळाव्याच्या आधीच उद्धव ठाकरे करताना भाजपला जोरदार धक्का दिला आहे भाजपचे पाच ते सहा माजी नगरसेवक आज उद्धव गटात प्रवेश करणार आहे त्यामुळे निश्चितपणे मेळाव्याची जोरदार चर्चा आहे