Alia Bhatt with Alan Walker : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही गेल्या काही दिवसांपासून तिचा आगामी चित्रपट 'जिगरा' मुळे चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, आलिया आता तिच्या चित्रपटामुळे नाही तर दुसऱ्याच कारणामुळे चर्चेत आहे. आलिया भट्टनं असं काही केलं की सगळीकडे तिची चर्चा रंगली आहे. आलियानं बंगळुरुमध्ये नुकत्याच झालेल्या अॅलन वॉकरच्या सनबर्न शोमध्ये सहभागी झाली होती. या शोमध्ये आलियाची हजेरी पाहता सगळ्यांना आश्चर्य झालं. सनबर्न फेस्टिव्हलच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर त्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत.
या कार्यक्रमातील आलियाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कार्यक्रमात आलियानं ऑफ-शोल्डर, ट्यूब टॉप ब्लू टॉप परिधान केला आहे. तर त्याला मॅचिंग असं स्कर्ट तिनं परिधान केलं आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांचे दोन फेवरेट्स एकत्र आल्याचे पाहून खूप जास्त उत्सुक झाल्याचे म्हटले. एका नेटकऱ्यानं कमेंट करत म्हटलं की हा शो बराच काळ आठवणीत राहणार आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, 'बापरे, आलिया भट्ट आणि अॅलन वॉकर विश्वास बसत नाही.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'बॅंगर कोलॅबरेशनचं आणखी एक वर्ष.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'ए फॉर आलिया आणि ए ऑर अॅलन. बंगळुरु तुमचं खरंच भाग्य आहे.'
Alia Bhatt at Alan Walker concert today in Bangalore pic.twitter.com/wbwXj5s8Wt
— Alia's nation (@Aliasnation) October 4, 2024
दरम्यान, जिगरा या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर या चित्रपटाचे दिग्दर्शन आलिया भट्टनं केलं आहे. या चित्रपटात आलियासोबत वेदांग रैना महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तर हा चित्रपट 11 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आलियाच्या भूमिकेचा प्रवास कसा आहे अर्थात तिच्या भावाला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी ती काय काय करते हे दाखवण्यात आलं आहे. तर या चित्रपटाची निर्मिती ही करण जोहर, अपूर्व मेहता आणि आलिया भट्ट, शाहीन भट्ट आणि सौमेन मिश्रानं देखील केलं आहे.
हेही वाचा : 'मी 20 वर्षांची होते त्यानं मला एकट्यात..', आशा नेगीनं सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कदायक अनुभव
omg????? alia bhatt at alan walker concert and how radiant she looks pic.twitter.com/2Yz6k9By3v
— s. (@sunteioles) October 4, 2024
चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी त्याच्या निर्मात्यांनी काही गाणी प्रदर्शित केली आहेत. ज्यात आलिया आणि दिलजीत दोसांझ एका गाण्यात एकत्र असल्याचे दिसते. या गाण्याचं नाव चल कुडिये असं आहे. या आधी आलिया आणि दिलजीत हे दोघं 'उडता पंजाब' चं गाणं 'इक्क कुडी' गाण्यासाठी एकत्र आले होते. या गाण्याला सगळे पसंत करत आहेत.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.