कैलाश मानसरोवर यात्रेत चमत्कार! भारतातून पहिल्यांदाच दिसला कैलास पर्वत, आता तिबेटला जायची गरज नाही

कैलास पर्वत हे अनेक रहस्य असेलले सर्वात पवित्र ठिकाण मानले जाते. कैलास पर्वत स्वर्ग हा आणि पृथ्वी दरम्यान एक जिना मानला जातो.

वनिता कांबळे | Updated: Oct 5, 2024, 04:55 PM IST
कैलाश मानसरोवर यात्रेत चमत्कार! भारतातून पहिल्यांदाच दिसला कैलास पर्वत, आता तिबेटला जायची गरज नाही title=

Mount Kailash darshan from India  : पृथ्वीतलावरील सर्वात रहस्यमयी ठिकाण म्हणजे कैलास पर्वत (Kailash Mountain).  कैलास पर्वत माउंट उंचीने एव्हरेस्टपेक्षा  कमी आहे. अले असताना आजवर कोणीही कैलास पर्वतावर चढाई करु शकलेले नाही.  बौद्ध आणि हिंदूधर्मीय कैलास पर्वता अति पवित्र मानतात. भारतातून प्रमथच  कैलास पर्वताचे दर्शन झाले आहे. कैलास पर्वत पाहण्यासाठी तिबेटला जावे लागते. 

कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान पहिल्यांदाच 3 ऑक्टोबरला भारतीय हद्दीतून पवित्र कैलास पर्वताचे दर्शन झाले. जुन्या लिपुलेख खिंडीतून कैलास पर्वताचे दर्शन झाले. उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यातील व्यास खोऱ्यात ही खिंड आहे. कैलास पर्वताला भगवान शिवाचे निवासस्थान मानले जाते. यात्रेकरूंना कैलास पर्वत पाहण्यासाठी तिबेटला जावे लागते.

हे देखील वाचा... भारतातील पहिली 4 लेअर वाहतूक व्यवस्था आपल्या महाराष्ट्रात; महामार्गावर रेल्वे ब्रीज, ब्रीाजवर फ्लायओव्हर त्यावर धावते मेट्रो

उत्तराखंड पर्यटन विभाग, बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (BRO) आणि इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) च्या अधिकाऱ्यांच्या पथकांना कैलास पर्वताचे दर्शन घडवणारे ठिकाण शोधले आहे. यात्रेकरू  2 ऑक्टोबरला गुंजी कॅम्पमध्ये पोहोचले. दर्शनासाठी त्यांना 2.5 किलोमीटर चढाई करावी लागते. एवढ्यात भाविकांना उत्तराखंडमधूनच कैलास पर्वत दिसला आहे. 

रहस्यमयी कैलास पर्वत

प्रसिद्ध कैलास पर्वत तिबेटच्या नैऋत्य कोपऱ्यात आहे.  बलाढ्य हिमालयाच्या कुशीत वसलेला आहे. भारतातून उत्तराखंडमार्गे कैसाल पर्वताच्या दिशेने जाता येते. आजपर्यंत एकाही मानवाने कैलसा पर्वत सर केलेला नाही. अगदी  रशिया आणि चीनसारख्या महाशक्तीशाली देशांनीही कैलास पर्वतासमोर पराभव स्वीकारला आहे.

हिंदू, बौद्ध, जैन धर्मीयांमध्ये कैलास पर्वत अति पवित्र स्थान मानले जाते. हिंदूंच्या धार्मिक मान्यतानुसार कैलास पर्वत भगवान शिवचे घर आहे. येथे मोक्ष प्राप्ती होते असे मानले जाते. तिबेटी बौद्ध हे कैलास पर्वताला पृथ्वीवरील बौद्ध विश्वविज्ञानाचे केंद्रबुिंदु मानतात. जैन धर्माचे संस्थापक, ऋषभ यांना येथे आध्यात्मिक जागृति मिळाल्याचा दावा केला जातो. 

कैलास पर्वत अत्यंत किरणोत्सर्गी आहे. पर्वताचा उतार 65 अंशांपेक्षा जास्त आहे. माउंट एव्हरेस्टवर हा उतार 40 ते 60 अंशांपर्यंतचा आहे. यामुळेच गिर्यारोहक देखील येथे चढण्यास घाबरतात. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे येथे हेलीकॉप्टर देखीव भरकटतात. कैलास पर्वत सर करताना चुकीच्या दिशेने वळणे आणि दिशाभूल करणाऱ्या पायवाटा लागतात.येथील हवामानात मानवाची प्रकृती बिघडते.    

हे देखील वाचा...ताजमहालात एक दोन नव्हे तब्बल 22 सिक्रेट खोल्या, त्यात दडलंय तरी काय?

सध्या कैलास पर्वतावर चढाई करण्यास पूर्णपणे बंदी आहे. कारण भारत आणि तिबेटसह जगभरातील लोकांचा असा विश्वास आहे की हा पर्वत एक पवित्र स्थान आहे, म्हणून कोणालाही त्यावर चढू दिले जाऊ नये. बौद्ध भिक्षू योगी मिलारेपा 11 व्या शतकात कैलास पर्वतावर चढाई केली होती. पवित्र आणि रहस्यमय पर्वतावर भेट देऊन जिवंत परत येणारा तो जगातील पहिला माणूस होता असा दावाही केला जातो.  

अनेकांनी कैलास पर्वत सर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, येथे चढाई करताना नेव्हिगेशन करणे खूप अवघड होते. कारण दिशा भरकटते, रस्ता चुकतो. येथे असलेल्या अलौकिक शक्तीमुळे येथे दिशानिर्देश बदलत असल्याचा दावा येथे चढाई करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी केला आहे.