Breaking News LIVE: ओबीसी आंदोलक आणि राज्य सरकारची सह्याद्रीवर बैठक सुरू

Breaking News LIVE: आज दहावा आंतरराष्ट्रीय योगदिन...देशभरात योगदिन साजरा केला जातोय. देशाच्या कानाकोपऱ्यात इतरही अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत असून, त्याच्या सर्व अपडेट एका क्लिकवर   

Breaking News LIVE: ओबीसी आंदोलक आणि राज्य सरकारची सह्याद्रीवर बैठक सुरू

Breaking News LIVE:  आज दहावा आंतरराष्ट्रीय योगदिन. पंतप्रधान नरेंद्र मोदींही काश्मीरमध्ये योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. श्रीनगरमधील दल सरोवरच्या किनारी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात मोदी सहभागी होत असून, मोदींसोबत जवळपास 7 हजार लोक योगा करताना दिसतील. यंदा स्वतःसाठी आणि समाजासाठी योग’ अशी योग दिनाची थीम आहे. या थीमचा अर्थ योगाद्वारे आपण आपली आंतरिक शक्ती वाढवू शकतो आणि त्यातून समाजाचे कल्याणही शक्य आहे.

योददिनाशिवाय महाराष्ट्रासह संपूर्ण देशात राजकीय क्षेत्रासह इतर अनेक विभागांमध्ये विविध घडामोडी घडत असून त्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम नागरिकांवर होत असतात. पाहूया अशाच काही घडामोडी.... LIVE 

21 Jun 2024, 11:35 वाजता

Breaking News LIVE: बीड - सरकारने दंगल घडवण्यासाठी आंदोलन उभे केले, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

सरकारने ओबीसी आंदोलन जाणीवपूर्वक उभा केले आहे, या माध्यमातून त्यांना दंगली घडवायचे आहेत. परंतु सरकारचा हा डाव मी यशस्वी होऊ देणार नाही. गाव गाड्यातील एकाही ओबीसी आणि मराठा बांधवावर हात पडू देणार नाही, प्रसंगी एक पाऊल मी मागे घेईन परंतु सरकारचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही. जर सरकारने आम्हाला दिलेले 13 तारखेची आश्वासन पाळले नाही, तर आम्ही सरकार डुबवणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

21 Jun 2024, 11:34 वाजता

Breaking News LIVE: हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जवळपास दीडशे ते दोनशे गाड्यांचा ताफा रवाना

प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील लोहा येथून जवळपास दीडशे ते दोनशे गाड्यांचा ताफा रवाना झाला आहे. लोहा आणि कंधार तालुक्यातून ह्या गाड्या वडी गोद्री कडे रवाना झाल्या आहेत. हाके यांच्या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद वाढत आहे. लोहा कंधार तालुक्यात मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज आहे. लोहा कंधार सकल ओबीसी समाजातर्फे ह्या गाड्या निघाल्या आहेत. वडीगोद्री येथील आंदोलनात हे ओबीसी बांधव सामील होणार आहेत.

 

21 Jun 2024, 11:28 वाजता

पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, 20 ते 25 गुंडांचा तरुणावर हल्ला

पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, किरकिटवाडीमध्ये टोळक्यांचा धुडगूस, 20 ते 25 गुंडांचा तरुणावर हल्ला, तरुण गंभीर जखमी, हवेली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

 

21 Jun 2024, 10:46 वाजता

Breaking News LIVE: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूच्या नियामक मंडळाच्या बैठकीला अजित पवार यांची दांडी 

पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूच्या नियामक मंडळाची नववी सभा बैठक पुण्यातील साखर संकुल इथे सुरू झाला आहे. मात्र इथं अजित पवार यांनी मात्र या बैठकीला दांडी मारली आहे. मागील बैठकीलाही त्यांची अनुपस्थिती लक्ष वेधून गेली होती. दरम्यान या सदस्य बैठकीसाठी शरद पवार, दिलीप वळसे पाटील, रोहित पवार, जयंत पाटील असे 8 सदस्य उपस्थित आहेत. 

21 Jun 2024, 10:42 वाजता

Breaking News LIVE: हाकेंचं आंदोलकांना आवाहन 

कुणीही रास्ता रोको किंवा आंदोलनाला गालबोट लावू नका असं आवाहन कार्यकर्त्यांना हाकेंनी केलं असून, मी पाण्यावरच जगणार, मी पाणी अधून मधून पीत आहे असं सांगितलं. दरम्यान, उपोषणस्थळी असणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्याशी मुख्यमंत्री दूरध्वनीवरून संपर्क साधत असून, तिथं गिरीश महाजनही उपस्थित आहेत. 

21 Jun 2024, 10:22 वाजता

Breaking News LIVE: जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी

कोकणात झालेल्या आतापर्यंतच्या पावसामुळं अनेक जलस्त्रोत प्रवाहित झाले असून, रत्नागिरी - खेड तालुक्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. खेड परिसरात जोरदार पाऊस झाल्यामउळं नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. सध्या जगबुडी नदिची पाणीपातळी 5.25 मीटर इतकी असून, खेड आणि चिपळूण परिसरात सध्या जोरदार पाऊस पाहता इथं एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे. 

21 Jun 2024, 10:08 वाजता

Breaking News LIVE: आरक्षणावरून होणारा वाद हा महायुती सरकारच्या नाकर्तेपणाचा परिणाम- विजय वडेट्टीवार 

आरक्षणावरून होणारा वाद हा महायुती सरकारच्या नाकर्तेपणाचा परिणाम आहे. आमचा कोणालाही विरोध नाही, पण, समाज एकत्र येण्यासाठी प्रयत्न करा. सरकारनं तुमची फसगत केली आहे असं म्हणत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात नसल्याची भूमिता वडेट्टीवारांनी स्पष्ट केली. मराठा समाजाच्या नेतृत्त्वात आम्ही काम केलं असून, त्या नेत्यांनी आम्हाला जपलं आहे हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. 

21 Jun 2024, 10:01 वाजता

21 Jun 2024, 09:44 वाजता

Breaking News LIVE: माझ्या जिवीताला धोका- बच्चू कडू 

प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून खळबळ उडवलीय. गोपनीय माहितीनुसार माझ्या जिवीताला धोका असल्याच बच्चू कडू यांनी पोलिसांना पत्राद्वारे माहिती दिलीय. माझा अपघात झाला अश्या प्रकारचे नागरिकांचे फोन येत असून अपघात झाल्याची अफवा पसरवत असल्याची बच्चू कडू यांनी पोलिसांना माहिती दिलीय. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधीतावर गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करण्याची बच्चू कडू यांनी मागणी केलीय. सध्या बच्चू कडू यांना पोलिसांची वाय प्लस सुरक्षा आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्या जीवाला धोका असल्याच्या बातमीने खळबळ उडालीय. 

21 Jun 2024, 09:18 वाजता

Breaking News LIVE: पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन होणार?

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्याची हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याची माहिती असून, बीडमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर मुंडे यांचं पुनर्वसन करण्यात येईल असं म्हटलं जात आहे. राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरू आहे याचमुळे ओबीसी नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घ्या असा सूर राज्यातील काही नेत्यांचा आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातील काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना राज्यसभेवर घेण्याची विनंती केंद्रीय नेतृत्वाला केल्याचं समजतंय.