Breaking News LIVE: आज दहावा आंतरराष्ट्रीय योगदिन. पंतप्रधान नरेंद्र मोदींही काश्मीरमध्ये योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. श्रीनगरमधील दल सरोवरच्या किनारी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात मोदी सहभागी होत असून, मोदींसोबत जवळपास 7 हजार लोक योगा करताना दिसतील. यंदा स्वतःसाठी आणि समाजासाठी योग’ अशी योग दिनाची थीम आहे. या थीमचा अर्थ योगाद्वारे आपण आपली आंतरिक शक्ती वाढवू शकतो आणि त्यातून समाजाचे कल्याणही शक्य आहे.
योददिनाशिवाय महाराष्ट्रासह संपूर्ण देशात राजकीय क्षेत्रासह इतर अनेक विभागांमध्ये विविध घडामोडी घडत असून त्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम नागरिकांवर होत असतात. पाहूया अशाच काही घडामोडी.... LIVE
21 Jun 2024, 18:44 वाजता
ओबीसी आंदोलक आणि राज्य सरकारची बैठक सुरु
ओबीसी आंदोलक आणि राज्य सरकारची सह्याद्रीवर बैठक सुरू, पंकजा मुंडे, छगन भुजबळही बैठकीत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिष्टमंडळाशी चर्चा करणार, मंत्री अतुल सावे, मंत्री संजय बनसोडे, आमदार गोपीचंद पडळकरही बैठकीला उपस्थित
21 Jun 2024, 18:38 वाजता
यवतमाळमध्ये सरकार विरोधात काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन
यवतमाळमध्ये काँग्रेसने राज्य व केंद्र शासनाच्या विरोधात चिखलफेक आंदोलन केले. संविधान चौकात केलेल्या या आंदोलनात महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. भाजप नेतृत्वातील सरकार शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, महिला, युवक तसेच गरीब व सामान्य जनतेच्या विरोधात आहे, महागाई, भ्रष्टाचार व सरकारी यंत्रणांचा अवैध वापर केल्या जात असल्याची टीका यावेळी काँग्रेसने केली.
21 Jun 2024, 18:02 वाजता
Breaking News LIVE : पावसाळी सहलीसाठी गेलेल्या मुंबईतील 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू
रायगडात पावसाळी पर्यटनाचे 4 बळी, मुंबईतील येथील रिझवी कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांच्या बुडून मृत्यू, पावसाळी सहलीतील दुर्घटना, खालापूर तालुक्यातील वावर्ले गावच्या पोखरवाडी येथील घटना, सत्य साई बाबा धरणात चार युवक बुडाले, एकूण 37 युवक युवती गेलेले पावसाळी सहलीला,
21 Jun 2024, 16:02 वाजता
जरांगे सल्लागाराकडून योग्य सल्ला घेऊन बोलत जा - लक्ष्मण हाके
मंडल आयोग सहजासहजी आलेला नाही, अनेक लोकांच्या रेट्यामुळे मंडल आयोग लागू झाला, जरांगे सल्लागाराकडून योग्य सल्ला घेऊन बोलत जा. जरांगे यांनी लोकशाहीत धमक्या देऊ नये, मंडल आयोग चॅलेंज होणं सोपं वाटत का? देशाचा पंतप्रधान ठिकाण्यावर राहणार नाही. जरांगे लोकसभेत तुम्हाला मुसलमान चालले नाहीत, दलित चालले नाहीत. शेतकऱ्यांच्या चळवळी वेगवेगळ्या जातींच्या लोकांनी लढल्या, असे लक्ष्मण हाके म्हणाले.
21 Jun 2024, 16:01 वाजता
जरांगेंच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला सक्षम - लक्ष्मण हाके
जरांगेंच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला सक्षम, जरांगेंची बोलायची लायकी नाही. मुंडे, भुजबळांना टार्गेट करु नका, खाडाखोड करुन जरांगेंनी नोंदी मिळवल्या, लक्ष्मण हाकेंचा आरोप
21 Jun 2024, 15:44 वाजता
मनोज जरांगे पुन्हा रुग्णालयात दाखल
मनोज जरांगे पुन्हा हॉस्पिटल दाखल, तब्येत अस्वस्थ वाटत असल्याने संभाजी नगरच्या रुग्णालयात दाखल, अंतरवली दौरा टाळून परत संभाजी नगरात
21 Jun 2024, 12:44 वाजता
Breaking News LIVE: राज्याच्या प्रमुखांनी तिथे जाऊन भेट द्यावी, पंकजा मुंडेंचे ट्वीट
राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांना वडीगोद्री येथे जाऊन भेटल्याचे समजते. ते योग्यच आहे. हाकेंचे उपोषण हे त्यांचे नसून हा कायद्याच्या चौकटीत सर्वाना समान न्याय व सन्मान देण्यासंदर्भातील आवश्यकता आहे. सत्तेचा गैरवापर करुन किंवा दबावाखाली चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले आहेत का? असल्यास त्याची चौकशी करावी, तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी. या साध्या त्यांच्या दोन मागण्या इतर मागण्यांसमवेत आहेत. शिष्टमंडळाने उपोषणास भेट दिली असली तरी राज्याच्या प्रमुखांनी तिथे जाऊन भेट द्यावी, म्हणजे या समस्त राज्यातील बहुजनांना सन्मान दिल्यासारखे होईल अशी माझी आग्रहाची विनंती आहे आणि ती मान्यच कराल हा मला विश्वास आहे, पंकजा मुंडे यांचे ट्वीट
21 Jun 2024, 12:22 वाजता
Breaking News LIVE: सोलापुरात फटाक्यांच्या कारखान्याला आग, आजूबाजूच्या परिसराला बसला हादरा
सोलापूर : बार्शी तालुक्यातील घारी गावात फटाका कारखान्याला लागली आग, कारखान्याला आग लागून झालेल्या स्फोटामुळे आजूबाजूतील परिसराला बसला हादरा, युन्नूस मुलाणी यांच्या मालकीचा आहे फटाका कारखाना, या कारखान्यात जवळपास 15 महिला मंजूर काम करतात. सुदैवाने आज वटपौर्णिमेची सुट्टी असल्याने कोणतीही महिला गेली नव्हती कामाला, या स्फोटात कुठल्याही पद्धतीची जीवितहानी झालेली नाही. पण कारखाना मालकाला बसला मोठा आर्थिक फटका, घटनेची माहिती मिळताच पांगरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते पुढील कारवाई करत आहेत.
21 Jun 2024, 11:52 वाजता
Breaking News LIVE: बीड जिल्ह्यात ओबीसी आंदोलक महिला आक्रमक; रस्त्यावर उतरत जाळले टायर
बीड जिल्ह्यात आता ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी ओबीसी आंदोलक महिला आक्रमक, बीडच्या आष्टी तालुक्यातील हातोला येथे रस्त्यावर उतरत महिलांनी टायर जाळले आहेत. बीड - अहमदनगर - कल्याण महामार्ग ओबीसी आंदोलक महिलांनी टायर जाळून अडवला. तर सरकारने आमच्या भावनांचा विचार केला नाही, तर दुर्गेचे आवतार धारण करू असा इशारा आंदोलक महिलांनी दिला. तर यावेळी पंकजा मुंडे यांनी सरकारला जे लेखी पत्र दिले आहे, त्याची सरकारने तात्काळ दखल घ्यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे
21 Jun 2024, 11:45 वाजता
Breaking News LIVE: हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ओबीसी आंदोलकांचा रस्ता रोको
सांगोला मिरज महामार्ग ओबीसी आंदोलकांनी रोखला, अनकढाळ टोल नाक्याजवळ ओबीसी बांधवांनी अडवला रस्ता, लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ओबीसी आंदोलनात रस्त्यावर