Breaking News LIVE: ओबीसी आंदोलक आणि राज्य सरकारची सह्याद्रीवर बैठक सुरू

Breaking News LIVE: आज दहावा आंतरराष्ट्रीय योगदिन...देशभरात योगदिन साजरा केला जातोय. देशाच्या कानाकोपऱ्यात इतरही अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत असून, त्याच्या सर्व अपडेट एका क्लिकवर   

Breaking News LIVE: ओबीसी आंदोलक आणि राज्य सरकारची सह्याद्रीवर बैठक सुरू

Breaking News LIVE:  आज दहावा आंतरराष्ट्रीय योगदिन. पंतप्रधान नरेंद्र मोदींही काश्मीरमध्ये योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. श्रीनगरमधील दल सरोवरच्या किनारी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात मोदी सहभागी होत असून, मोदींसोबत जवळपास 7 हजार लोक योगा करताना दिसतील. यंदा स्वतःसाठी आणि समाजासाठी योग’ अशी योग दिनाची थीम आहे. या थीमचा अर्थ योगाद्वारे आपण आपली आंतरिक शक्ती वाढवू शकतो आणि त्यातून समाजाचे कल्याणही शक्य आहे.

योददिनाशिवाय महाराष्ट्रासह संपूर्ण देशात राजकीय क्षेत्रासह इतर अनेक विभागांमध्ये विविध घडामोडी घडत असून त्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम नागरिकांवर होत असतात. पाहूया अशाच काही घडामोडी.... LIVE 

21 Jun 2024, 08:58 वाजता

Breaking News LIVE: नागपूर-छत्रपती संभाजी नगर महामार्गावर विचित्र अपघात 

नागपूर-छत्रपती संभाजी नगर महामार्गावर वाशिम च्या पेडगाव जवळ सकाळी ट्रेलर व दोन ट्रॅव्हल्सचा विचित्र अपघात. नागपूर कडून संभाजीनगर कडे जात असलेल्या टेलर व पुण्याकडून अमरावतीला जाणाऱ्या 2 ट्रॅव्हल्स मध्ये वाशिमच्या पेडगाव गावाजवळ झाला अपघात. या अपघातात चार ते पाच जण गंभीर जखमी इतर 15 जण किरकोळ जखमी असल्याची प्राथमिक माहिती. अपघातानंतर जखमींना कारंजा येथिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. 

21 Jun 2024, 08:35 वाजता

Breaking News LIVE: अवजड वाहतुकीसाठी तिलारी घाट बंद

अरुंद रस्ता असल्याने वाहतूकीसाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचं कारण पुढे करत अवजड वाहतुकीसाठी तिलारी घाट बंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या आदेशानंतर घाट वाहतुकीसाठी बंद झाला असून, 13 ऑक्टोबरपर्यंत इथून जाणारी एस टी वाहतूकही बंद रहाणार आहे. 

21 Jun 2024, 08:27 वाजता

Breaking News LIVE: आतापर्यंत सर्वात कमी पेरण्या कोकणात... 

मान्सून गेल्या आठवडाभरापासून विदर्भातच रेंगाळल्याने केवळ १२ टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. सर्वात कमी पेरण्या नागपूर आणि कोकणामध्ये तर सर्वाधिक पेरण्या लातूर संभाजीनगर विभागामध्ये झाल्या आहेत. कापूस, सोयाबीन आणि मका या प्रमुख पिकांच्या पेरण्या सरासरी 15 ते 16 टक्क्यांपर्यंत गेल्या. येत्या आठवडाभरात पाऊस जोर धरेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. त्यानंतरच पेरण्या मार्गी लागतील, अशी शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे पेरण्यांची आकडेवारी अपडेट होण्यासाठी वेळ लागत असल्याने अद्याप चित्र स्पष्ट नसलं तरी दोन चार टक्क्याने यामध्ये फरक होऊ शकतो असेही विभागाने स्पष्ट केला आहे बीज पावसानंतरच शेतकरी खऱ्या अर्थाने सुरुवात करेल त्यानंतर वेग घेतला जाईल असे तज्ञांचे म्हणणे आहे

21 Jun 2024, 07:56 वाजता

Breaking News LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा 

21 Jun 2024, 07:50 वाजता

Breaking News LIVE: नेते आणि अभिनेत्यांची योगसाधना... 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून देशाच्या संरक्षणार्थ सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांपर्यंत, संपूर्ण देश योगसाधनेत रमला... पाहा काही खास क्षण... 

21 Jun 2024, 07:47 वाजता

Breaking News LIVE: आता महाराष्ट्र भाजपची बैठक 

दिल्लीत कोअर कमिटीच्या बैठकीतनंतर आता महाराष्ट्र भाजपची बैठक होणारेय. महाराष्ट्र भाजपची आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक आहे.. प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत विधान परिषदेच्या 11 जागांसंदर्भात चर्चा होणारेय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडेंसह कोअर कमिटीतील सदस्य यावेळी उपस्थित राहणार आहेत. 

21 Jun 2024, 07:36 वाजता

Breaking News LIVE:  विधानसभेत एकत्र लढून 155 जागा जिंकू - शरद पवार 

लोकसभेप्रमाणेच विधानसभेत एकत्र लढून 155 जागा जिंकू असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केलाय... लोकसभेत 3 पक्ष एकत्र लढून 31 जागा जिंकल्या... यात 288 विधानसभा मतदारसंघापैकी 155 मतदारसंघात आमचा विजय झालाय... त्यामुळे लोकसभेसारखी रणनीती आम्हाला विधानसभेला आखावी लागेल असं पवार म्हणाले.

21 Jun 2024, 07:26 वाजता

Breaking News LIVE:  मुंबईतही जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा 

मुंबईतही जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. मरीन ड्राईव्ह याठिकाणी योगदिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित केलाय. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणारेत. योगा बाय द बे असं या कार्यक्रमाचं नाव आहे. यासाठी मरीन ड्राईव्हला विशेष तयारी करण्यात आलीये. अनेक जण याठिकाणी योग दिवस साजरा करण्यासाठी आले आहेत.

 

21 Jun 2024, 07:23 वाजता

Breaking News LIVE:  वडेट्टीवारांना अश्रू अनावर 

विरोधा पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल हाकेंची आंदोलस्थळी जाऊन भेट घेतली. यावेळी वडेट्टीवारांना अश्रू अनावर झाले. त्यांनी हाकेंच्या प्रकृतीची विचारपूस केली, तसंच मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चाही केली. 

 

21 Jun 2024, 07:22 वाजता

Breaking News LIVE: स्वतःसाठी आणि समाजासाठी योग

 यंदा स्वतःसाठी आणि समाजासाठी योग’ अशी योग दिनाची थीम आहे...या थीमचा अर्थ योगाद्वारे आपण आपली आंतरिक शक्ती वाढवू शकतो आणि त्यातून समाजाचे कल्याणही शक्य आहे...योगामुळे शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक विकास होतो...त्यामुळे योगा खूप महत्त्वाचा आहे, असा संदेश दिला जात आहे.