Weather Update : बाप्पाच्या विसर्जनानंतर पाऊस सक्रिय, 'या' जिल्ह्यांना IMD चा इशारा

Maharashtra Rain Alert : गणरायाच्या निरोपानंतर महाराष्ट्रत पुन्हा एकदा पावसाचं आगमन होणार आहे. हवमान खात्याने काही जिल्ह्यांना अलर्ट जाहीर केला आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Sep 19, 2024, 11:28 AM IST
Weather Update : बाप्पाच्या विसर्जनानंतर पाऊस सक्रिय, 'या' जिल्ह्यांना IMD चा इशारा  title=

Maharashtra Weather News :  गणेशोत्सवादरम्यान छोटा ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा एकदा पाऊल अ‍ॅक्टिव मोडवर येणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कमी दाबाचा पट्टा झारखंड आणि छत्तीसगडच्या भागात सक्रीय झाला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात धुवादार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने हलकी हजेरी लावली आहे. पुढील पाच दिवस हलक्या आणि मध्य स्वरुपाचा पाऊस बरसणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. 

48 तासांत पावसाची शक्यता 

हवामान खात्याने राज्यात पुढील 48 तासांत पावसाचा जोर वाढणार असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची दाट शक्यता वर्तवली आहे. तसेच महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भ  आणि काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जाहीर केला आहे. 

कुठे आहे यलो अलर्ट 

20 सप्टेंबर रोजी जळगाव जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
21 सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भ, मराठवाड्याला यलो अलर्ट देण्यात आला असून मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 
22 सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित भागात पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज आहे.

राज्यात पुन्हा एकदा पावसाला पोषक हवामान होत आहे. कोकण, मध्य, महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. विदर्भासह बाकीच्या भागातही पाऊस बरसेल. तसेच पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

अतिवृष्टीचा विस्तार महाराष्ट्राच्या पलीकडे आहे. अपेक्षित तीव्र पावसामुळे IMD ने पश्चिम बंगाल आणि ओडिशासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. झारखंडमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. गंगा डेल्टा आणि बांगलादेशाजवळील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पर्जन्यवृष्टीमध्ये वाढ झाली आहे, ज्यामुळे या प्रदेशांमध्ये अतिवृष्टी होत आहे.

महाराष्ट्र आणि इतर प्रभावित राज्ये चालू असलेल्या पावसाची तयारी करत असताना, नागरिकांना हवामानाच्या परिस्थितीबद्दल माहिती ठेवण्यासाठी आणि आवश्यक खबरदारी घेण्याची माहिती दिली आहे.