Ganesh Visarjan Live Blog : मुंबई, पुणेसह राज्यभरात गणपती बाप्पाला भक्तीभावाने निरोप

Maharashtra Ganesh Visarjan 2023 LIVE : गेल्या 10 दिवसांपासून गणराया पाहुणचार घेऊन आज गावी निघणार आहे. पुण्यातील मानाचे गणपती, नागपूरचा राजासह महाराष्ट्रातील गणेश विसर्जनची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर   

Ganesh Visarjan Live Blog : मुंबई, पुणेसह राज्यभरात गणपती बाप्पाला भक्तीभावाने निरोप

Maharashtra Ganesh Visarjan 2023 LIVE : यथासांग पाहुचार घेतल्यावर पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी गावी निघणार आहे. अख्खा देश गेल्या काही दिवसांमध्ये बाप्पामय झाला आहे. वाजत गाजत बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील गणेश विसर्जनाची प्रत्येक दृष्य आणि पोलीस बंदोबस्तासह वाहतूक व्यवस्थेबद्दल प्रत्येक अपडेट...

 

28 Sep 2023, 16:23 वाजता

Ganesh Visarjan 2023 Maharashtra LIVE : 1 किलोचा पर्यावरण पूरक चॉकलेटच्या गणपतीचा दुधात विसर्जन

दहा दिवसानंतर आता गणपती बाप्पांना निरोप देण्यात येत आहेय..अकोल्यातही श्रींच्या विसर्जनाला सुरुवात झालीय..तर भुइंदर छतवाल या गणेश भक्ताच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या 31 किलोचा पर्यावरण पूरक चॉकलेटच्या गणपतीचा दुधात विसर्जन करण्यात आलं..प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यामुळं प्रदूषण होतं ही बाब आत्मसाध करून हा चॉकलेटचा गणपती तयार आला होता..गणेशाची ही मूर्ती दुधात विसर्जित करण्यात आली असून हे दूध प्रसाद स्वरूपात भक्तांमध्ये वितरित करण्यात आल..

28 Sep 2023, 15:38 वाजता

Ganesh Visarjan 2023 Maharashtra LIVE : मिरजेत ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

सांगलीच्या मिरजेत ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकींना मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली आहे.ढोल-ताश्याचा गजरात आणि लेझीमच्या ठेक्यावर वाजता गाजत मिरवणुकीने आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देण्यात येत आहे.पारंपरिक वेशभूषा आणि टाळ-मृदुंगच्या गजरासह महिलांनी देखील सहभाग घेतला होता.भव्य-दिव्य मिरवणुकीने गणेश विसर्जन करण्याची परंपरा असून विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरात प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली ,जिल्ह्यातील दोन हजार 300 गणेश मंडळांचे गणेश विसर्जन होत असून मिरज शहरात 250 मंडळाचं विसर्जन पार पडत असून यानिमित्ताने तगडा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे,अशी माहिती पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली आहे

28 Sep 2023, 15:37 वाजता

Ganesh Visarjan 2023 Maharashtra LIVE : सोलापुरात मानाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

- भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी देखील लेझीम खेळण्याचा आनंद घेतला

- सोलापुरातील गवळी वस्ती तालीम मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला थाटात सुरुवात

- पारंपरिक लेझीम खेळत लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत मिरवणुकीत सहभाग नोंदवला

- शारीरिक आणि बौद्धिक क्षमता सिद्ध करणारा लेझीम खेळ अनेकांना आकर्षित करतोय

28 Sep 2023, 14:47 वाजता

Ganesh Visarjan 2023 Maharashtra LIVE : नागपूरच्या (Nagpur News) राजाची विसर्जन मिरवणुकी दुपारी एकच्या सुमारास निघाली. मंडपातून बाहेर पडल्यानंतर बाप्पाची मिरवणूक वाजत गाजत गणेशभकतांच्या जयघोषात मार्गस्थ झाली. तुळशीबाग, महाल असं मार्गक्रमण करत नागपूरच्या राजाची मिरवणूक संध्याकाळपर्यंत कोराडी येथील विसर्जन स्थळापर्यंत पोहोचेल. यावेळी बाप्पाला निरोप देताना गणेश भक्तही भावूक झाले होते.

28 Sep 2023, 12:42 वाजता

Ganesh Visarjan 2023 Maharashtra LIVE : संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) मानाच्या आणि ग्रामदैवत असलेल्या आराध्य संस्था गणपतीची आरती शहरातील सर्व मंत्र्यांनी एकत्रित येत केली. यावेळी सांदीपान भुमरे, भागवत कराड, अतुल सावे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या गणपतीची आरती केली आणि मिरवणुकीला सरुवात केली. यावेळी मिरवणुकीत बँड च्या तालावर या मंत्र्यांनी ताल धरला इतकच नाही तर विरोधी पक्षा नेत्याने मंत्र्यांना ओढत त्यांच्यासोबत फुगडी सुद्धा घातली.. या मिरवणुकीच्या सुरुवातीनंतर आता शहरात गणेश विसर्जनाची सुरुवात होते.

28 Sep 2023, 12:40 वाजता

Ganesh Visarjan 2023 Maharashtra LIVE : राज्यात लाडक्या गणरायाला उत्साहात निरोप दिला जात असतांनाच नाशिकच्या (Nashik News) मनमाडमध्येही (Manmad News) गणेश विसर्जनाला सुरवात झाली. मनमाडचे आराध्य दैवत वेशातील निलमणी गणेश मूर्तीच्या पालखी मिरवणूक काढण्यात आली.अश्वस्वार युवती, सनई चौघडा ,ढोल - ताश्यांच्या गजर, पारंपरिक संबळ,खंजीर तालावरील मराठमोळं वाघ्या मुरळीचा गोंधळ अश्या थाटात निघालेल्या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

28 Sep 2023, 12:38 वाजता

Ganesh Visarjan 2023 Maharashtra LIVE : अहमदनगर (Ahmednagar News) शहरांमध्ये सकाळपासूनच गणेश विसर्जनाची तयारी सुरू झाली आहे महापौर रोहिणी शेंडगे यांच्या बागरोजा परिसरातील शिवप्रतिष्ठ गणेश मंडळाची विसर्जन तयारी सुरू झाली असून रुद्रांश ढोल पथकाचे पारंपारिक ढोल आणि ताशाचे वादन सुरू झाले आहे या पथकामध्ये तरुणांसोबत तरुणींचा आहे मोठा सहभाग असून मंडळासमोर पथकाचे वादन सुरू आहे दुपारी तीन नंतर या मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे

28 Sep 2023, 12:37 वाजता

Ganesh Visarjan 2023 Maharashtra LIVE : गेल्या दहा दिवस गणरायाचे मनोभावे प्रार्थना करत गणेश उत्सव येवलेकरांनी (Yeola news) मोठ्या उत्साहात साजरा केला. आज घरगुती गणपती विसर्जनास सकाळपासूनच सुरुवात झाली असून येवला शहरातील अंगणगाव येथील अहिल्याबाई होळकर घाटावर आपल्या घरगुती गणरायाचे विसर्जन करण्याकरता येवलेकर येताना दिसत असून नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी गणपती विसर्जनाची पुरेपूर व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात देखील प्रशासनाच्या वतीने विविध ठिकाणी गणेश कुंड तयार करण्यात आले असून या ठिकाणी देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

 

28 Sep 2023, 12:36 वाजता

Ganesh Visarjan 2023 Maharashtra LIVE : अकोल्यात (Akola news) ही गणेश विसर्जनाला सुरुवात झाली आहेय ...मानाचा गणपती बाराभाई गणेशाच्या पूजे नंतर सार्वजनिक गणेश मिरवणुकीला सुरुवात झालीय..सोबतच घरगुती गणेश विसर्जनाला सुद्धा सुरुवात झालीय..घरघुती गणेश विसर्जनाचा वैशिष्टय म्हणजे गणेश विसर्जन हे अकोला महापालिकेच्या वातिने बांधण्यात आलेल्या कुंडात विसर्जन करण्यात येतं , आपण पाहत आहो अकोल्याचे हे दृष्य जिथे भाविकांनी गणेश विसर्जनाला सुरुवात केली आहेय ...शहरातील मोर्णा नदीत प्रदूषण थांबविण्यासाठी या सात कुंडांची निर्मिती केलीय..तर येथील विसर्जित केलेल्या श्रींच्या मूर्ती एकत्र करून १७ कि.मी च्या अंतरावर असलेल्या गांधीग्राम येथील पूर्णा नदीत विसर्जित केल्या जातात....दरम्यान अकोल्यातील गणेश उत्सवादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय.

28 Sep 2023, 11:05 वाजता

Ganesh Visarjan 2023 Maharashtra LIVE : दहा दिवसाच्या पाहुणचारानंतर वाशीम (Washim news) जिल्ह्यात तीन टप्प्यामध्ये श्री चे विसर्जन होणार आहे पहिल्या टप्प्या मध्ये आज वाशीम शहरतील बाप्पाचे मिरवणुकीला सुरुवात झाली आहे पहिला मानाचा असलेला शिवशंकर गणेश मंडळाच्या गणपतीची खासदार भावना गवळी यांनी पूजा आरती करून स्थानिक शिवाजी चौकातून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.शिवाजी चौकातून या मिरवणूक  बालू चौक,मन्नासिंग चौक, बाहेती गल्ली, काटीवेश मार्गे देव तलावात विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गणेश विसर्जन शांततेत पार पडावे यासाठी विविध उपाय योजनांसह पोलीस दल सज्ज आहे.मिरवणूकी साठी गणेशभक्तामध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.