Ganesh Visarjan Live Blog : मुंबई, पुणेसह राज्यभरात गणपती बाप्पाला भक्तीभावाने निरोप

Maharashtra Ganesh Visarjan 2023 LIVE : गेल्या 10 दिवसांपासून गणराया पाहुणचार घेऊन आज गावी निघणार आहे. पुण्यातील मानाचे गणपती, नागपूरचा राजासह महाराष्ट्रातील गणेश विसर्जनची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर   

Ganesh Visarjan Live Blog : मुंबई, पुणेसह राज्यभरात गणपती बाप्पाला भक्तीभावाने निरोप

Maharashtra Ganesh Visarjan 2023 LIVE : यथासांग पाहुचार घेतल्यावर पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी गावी निघणार आहे. अख्खा देश गेल्या काही दिवसांमध्ये बाप्पामय झाला आहे. वाजत गाजत बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील गणेश विसर्जनाची प्रत्येक दृष्य आणि पोलीस बंदोबस्तासह वाहतूक व्यवस्थेबद्दल प्रत्येक अपडेट...

 

28 Sep 2023, 08:05 वाजता

Ganesh Visarjan 2023 Nashik LIVE : नाशिकच्या (Nashik) गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी (Ganesh Visarjan) सार्वजनिक मंडळासह महापालिका, पोलिसांनी कंबर कसली आहे. बाप्पाला निर्विघ्न निरोप देण्यासाठी मिरवणूक मार्गावर जवळपास 70 कॅमेरेसह चार ड्रोनद्वारे लक्ष ठेवून असणार आहे. 

28 Sep 2023, 07:55 वाजता

Ganesh Visarjan 2023 Chhatrapati Sambhajinagar LIVE : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरातील खालील दिलेले रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहे.  

सिटीचौक ते जुनाबाजार मार्गे भडकलगेट.
जिन्सी चौक ते संस्थान गणपती, जाफरगेट- मोंढा ते राजाबाजार.
निजामोद्दीन दर्गा रोड ते निजामोद्दीन चौक व डावीकडे शहागंज चमन.
भुरे पहेलवान यांचे घर ते निजामोद्दीन चौक व उजवीकडे शहागंज चमन..
चेलीपुरा चौक ते गांधी पुतळा, मंजुरपुरा चौक ते गांधीपुतळा.
लोटाकारंजा ते सराफा रोड, रोहिला गल्ली ते सराफा रोड.
कामाक्षी लॉज ते सिटीचौक व पुढे गुलमंडी, बाराभाई ताजिया, गोमटेश मार्केट मार्गे पैठणगेट या रस्त्यावरील सर्व पुर्व-पश्चिम गल्ल्या बंद राहतील.
सिटीचौक पोलीस स्टेशन पश्चिमेकडील बु-हाणी हायस्कूलकडे जाणारी गल्ली.
बुढीलाईन, जूने तहसिल कार्यालय, जुना बाजार, बारुदगरनाला.
सिल्लेखाना चौक, पैठणगेट, बाराभाई ताजिया, रंगारगल्ली, सिटीचौक.
सावरकर चौक, एम. पी. लॉ कॉलेज, महात्मा फुले पुतळा/ बळवंत वाचनालय चौक.
अंजली टॉकीज, महात्मा फुले चौक ते बाबुराव काळे चौक.
रॉक्सी कॉर्नर, जिजामाता कॉलनी ते बाबुराव काळे चौक.

28 Sep 2023, 07:54 वाजता

Ganesh Visarjan 2023 Chhatrapati Sambhajinagar LIVE : अनंत चतुर्दशीसाठी (Ananta Chaturdashi) छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात गणेश विसर्जनासाठी (Ganesh Visarjan) काही विशिष्ट मार्ग आज बंद आहेत. विसर्जन सुरळीत पार पडण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोस्तर लावण्यात आला आहे. 

28 Sep 2023, 07:50 वाजता

Maharashtra Ganesh Visarjan 2023 LIVE : बंदोबस्तावर असणा-या पोलिसांनी कुटुंबासमवेत गणेश विसर्जन मिरवणूकीत मनसोक्त डान्स केला..शिर्डी (Shirdi Ganesh Visarjan) पोलीस ठाण्यातील गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी पोलिसांनी ढोल ताशांच्या तालावर ठेका धरला.

28 Sep 2023, 07:35 वाजता

Maharashtra Ganesh Visarjan 2023 LIVE : मनमाड-मुंबई (Manmad Ganesh Visarjan) गोदावरी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांनी बसवलेल्या गणेशाचं अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला वाजत गाजत विसर्जन करण्यात आलं... तीनचाकी सायकलवर विराजमान गणेशाचं वाहन मूषक सायकल चालवताना पाहायला मिळाला... दरवर्षी या गोदावरी एक्स्प्रेमधले मनमाड-मुंबई असा नियमित प्रवास करणारे प्रवासी गाडीतच गणपतीची स्थापना करतात. 

28 Sep 2023, 07:33 वाजता

Pune Dagdusheth miravnuk : पुण्यात (Pune Ganeshotsav 2023) गणपती विसर्जन मिरवणुकीत दगडूशेठ गणपती मंडळ चार वाजता सहभागी होणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 131व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक थाटात काढणार आहे. 

28 Sep 2023, 07:20 वाजता

Pune Dagdusheth Ganesh 2023 LIVE : पुण्यात दगडूशेठ गणपतीची मूर्ती मुख्य मंदिरात नेण्यात येत आहे. आज सकाळीच दत्त चौकातल्या अयोध्या मंदिराच्या देखाव्यातून मूर्ती मुख्य मंदिरात नेऊन स्थानापन्न करण्यात येत आहे. दरवर्षी मूर्ती मुख्य मंदिरात नेण्याची क्रिया खूप उशिरा सुरू होते. मात्र यावर्षी मूर्ती पहाटेच मुख्य मंदिरात नेण्याची सुरूवात केलीय. गणेशमूर्तीसमोर सालाबादप्रमाणे दाक्षिणात्य वादकांनी वादन केलं.