Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासाठी मोठी बातमी, वाढवण बंदराला मंजुरी मिळाली

Today Breaking News LIVE Updates : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घडामोडींसहीत देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी...

Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासाठी मोठी बातमी, वाढवण बंदराला मंजुरी मिळाली

Today Breaking News LIVE Updates : महाराष्ट्रातील राजकारणाच्या दृष्टीने आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन (Shiv Sena Foundation Day) आहे. 58 वर्षांमध्ये पक्ष फुटीनंतरची ही दुसरी वेळ आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाश शिंदे हे वेगवेगळे वर्धापन दिन साजरा करणार आहेत. राजकीय घडामोडींबरोबर देशातील तसंच राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपेड्टस आपण या लाइव्ह ब्लॉगमधून पाहणार आहोत...

19 Jun 2024, 20:31 वाजता

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी, वाढवण बंदराला मंजुरी मिळाली

पालघर जिल्ह्यातील ७६ हजार कोटी योजनेच्या वाढवण बंदराला केंद्रीय मंत्रीमंडळाचा हिरवा कंदील

मागील 25 वर्षांपासून या बंदराला विरोध 

25 फेब्रुवारीला मोदींच्या हस्ते भूमिपूजन झालं होतं.

19 Jun 2024, 20:08 वाजता

मोदी जन्माला येतानाच 400 खुळखुळे घेवून आले; संजय राऊत कडाडले

देशाच्या राजकारणातील हिरो उद्धव ठाकरे..आजचा दिवस ऐतिहासिक. 19 जून 1966 ne जे महत्व होते तेच आजही आहे. जिंकलेल्यांबरोबच लढले त्यांचाही सत्कार केला. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, तो फडतूस लोकांसमोर झुकणारा नाही. उद्धव ठाकरेंकडे देश आशेने पाहतोय. मोदी जन्माला येतानाच 400 खुळखुळे घेवून आले. सेना संपणार नाही असं संजय राऊत म्हणाले आहेत. 

19 Jun 2024, 19:28 वाजता

59 व्या वर्धापन दिनी शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल- अंबादास दानवे

59 व्या वर्धापन दिनी शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल, विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांचं मोठ विधान. त्यांना केवळ 2 वर्ष झाली आणि 58 वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. त्यांची गद्दार सेना आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे. 

19 Jun 2024, 18:38 वाजता

राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल

- मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरेंचं नाशिकमध्ये आगमन
- राज ठाकरे यांचा कुटुंबासह दोन दिवसाचा दौरा
- उद्या संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीला राज ठाकरे कुटुंबासह राहणार उपस्थित
- यानंतर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे उद्या घेतील दर्शन
- राज ठाकरे यांच्या दौऱ्याने मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

19 Jun 2024, 17:37 वाजता

'बारामतीकर माझी साथ सोडणार नाहीत'

बारामती लोकसभा निवडणुकीची न्यूयॉर्कमध्ये चर्चा सुरु आहे. बारामतीकर माझी साथ सोडणार नाहीत याचा मला विश्वास होता. यावेळी संघर्षाची निवडणूक होती असं शरद पवार बारातमीमधील सभेत म्हणाले आहेत. 

19 Jun 2024, 17:10 वाजता

नरसिंगराव उदगिकर यांच्या मुलाची सोशल मीडिया पोस्ट, ट्रोलर्सना दिले उत्तर 

आलिशान गाड्या घेतल्यानं वंचितचे उमेदवार चांगलेच ट्रोल झालेत.. लातूर लोकसभा मतदारसंघातील वंचित आघाडीचे उमेदवार नरसिंगराव उदगीरकर यांच्या मुलानं सोशल मीडियावर दोन नव्या आलिशान गाड्या खरेदी केल्याचं पोस्ट टाकली.. एक फॉर्च्युनर आणि एक रेंज रोव्हर खरेदी केल्याची पोस्ट उदगीरकरांच्या मुलानं केली.. त्यानंतर नेटक-यांनी उदगीरकरांना चांगलंच ट्रोल केलंय.. काहींनी तर उदगीरकांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेलं उत्पन्नाचं शपथपत्रच सोशल मीडियावर पोस्ट केलंय.. यात उदगीगरकांनी त्यांचं वार्षिक उत्पन्न 5 लाखाच्या आत असल्याचं नमूद केलंय.. त्यामुळे इतके कमी उत्पन्न असणारी व्यक्ती इतक्या महाग गाड्या कशा घेऊ शकते असा सवाल नेटक-यांनी उपस्थीत केलाय..वंचितच्या उमेदवाराने गाडी घेऊ नये का असा सवाल नरसिंगराव उदगिरकर यांचा मुलगा योगेश उदगीरकर यांनी फेसबूकवर व्हिडीओ पोस्ट करत सवाल केलाय...

19 Jun 2024, 15:17 वाजता

महाराष्ट्राच्या वाधवन बंदर प्रकल्पाला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळू शकते. सुमारे 76000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.

19 Jun 2024, 13:08 वाजता

लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातील अनेक भागांमधून शेकडो गाड्यांचं कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी वडीगोद्रीकडे निघाले आहेत राज्य शासन ओबीसींच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे प्राध्यापक लक्ष्मण हाके हे गेल्या सहा दिवसापासून उपोषणाला बसले आहेत. परंतु अद्याप त्यांच्याकडे मुख्यमंत्री गेलेले नाहीत. सरकारचे हे दुट्टपी वागणे असून हे आम्ही सहन करणार नाही. आता शासनाने ओबीसी आरक्षणाबाबतची भूमिका तात्काळ स्पष्ट न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ओबीसी समाज बांधवांनी दिलाय. 

19 Jun 2024, 13:02 वाजता

लोणावळ्यात पर्यटकांची प्रचंड, सहा चाकी आणि अवजड वाहतुकीला शहरात बंदी 

पावसाळ्यात लोणावळ्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी होते, अशात शहरात मोठी वाहतूक कोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाने सहा चाकी पुढील अवजड वाहतुकीला शहरात बंदी घातली आहे. सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत हा नियम लागू असेल. या दरम्यान जुन्या पुणे-मुंबई महामार्गाऐवजी या वाहनांनी पुणे-मुंबई एक्सप्रेस-वे वरून प्रवास करावं, असं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे. आजपासूनचं या नव्या नियमांची अंमलबजावणी करायला सुरुवात होत आहे.

19 Jun 2024, 13:00 वाजता

मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातल्या संरक्षक भिंतीला तडा

मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातल्या संरक्षक भिंतीला अपघात ग्रस्त वाहने धडकून कमकुवत झालीय. मुसळधार पावसात भिंत खचण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भोस्ते घाट हा अपघात प्रवण क्षेत्र असून भोस्ते घाटात आतापर्यंत 50 हून अधिक अपघात झाले आहेत. पावसाचा जोर वाढल्यास भेगा आणखी वाढून संरक्षण भिंतीसह महामार्गाचा भाग दरीत कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.