Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासाठी मोठी बातमी, वाढवण बंदराला मंजुरी मिळाली

Today Breaking News LIVE Updates : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घडामोडींसहीत देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी...

Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासाठी मोठी बातमी, वाढवण बंदराला मंजुरी मिळाली

Today Breaking News LIVE Updates : महाराष्ट्रातील राजकारणाच्या दृष्टीने आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन (Shiv Sena Foundation Day) आहे. 58 वर्षांमध्ये पक्ष फुटीनंतरची ही दुसरी वेळ आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाश शिंदे हे वेगवेगळे वर्धापन दिन साजरा करणार आहेत. राजकीय घडामोडींबरोबर देशातील तसंच राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपेड्टस आपण या लाइव्ह ब्लॉगमधून पाहणार आहोत...

19 Jun 2024, 12:57 वाजता

'सोशल मीडियात भाजपविरोधात केलेल्या प्रचाराला उत्तर देण्यात राज्यातील नेते कमी पडले'

दिल्लीतील कालच्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सोशल मीडियातील प्रचारासंदर्भात देखील चर्चा झाली. सोशल मीडियात भाजपविरोधात केलेल्या प्रचाराला उत्तर देण्यात राज्यातील नेते कमी पडल्याची चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिलीय. विरोधकांकडून जे मुद्दे सोशल माध्यमांमध्ये मांडले गेलेत, त्याला उत्तर देण्यात भाजप कमी पडल्याची देखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. येत्या काळात निवडणुका तोंडावर असताना सोशल मीडियातून देखील विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देणार असं ठरलं आहे. 

19 Jun 2024, 12:57 वाजता

'सोशल मीडियात भाजपविरोधात केलेल्या प्रचाराला उत्तर देण्यात राज्यातील नेते कमी पडले'

दिल्लीतील कालच्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सोशल मीडियातील प्रचारासंदर्भात देखील चर्चा झाली. सोशल मीडियात भाजपविरोधात केलेल्या प्रचाराला उत्तर देण्यात राज्यातील नेते कमी पडल्याची चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिलीय. विरोधकांकडून जे मुद्दे सोशल माध्यमांमध्ये मांडले गेलेत, त्याला उत्तर देण्यात भाजप कमी पडल्याची देखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. येत्या काळात निवडणुका तोंडावर असताना सोशल मीडियातून देखील विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देणार असं ठरलं आहे. 

19 Jun 2024, 12:53 वाजता

'हमारे बारह' चित्रपटाच्या प्रदर्शनाला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'हमारे बारह' चित्रपटाला अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं हिरवा कंदील दाखवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर, उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठानं चित्रपट पाहिला. त्यानंतर मंगळवारी सुमारे चार तास सुनावणी झाल्यानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी देण्यात आली. याबाबत सविस्तर निकाल बुधवारी देण्यात येणार आहे. न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरोझ पुनीवाला यांच्या खंडपीठानं दोन्ही पक्षांना सामंजस्य करार करण्याचं निर्देश दिले आहेत. त्यामुळे येत्या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होण्यामधील अडथळे संपुष्टात आले.

19 Jun 2024, 12:37 वाजता

'मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत खाणीचे काम बंद'

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरालगतच्या कर्नाटक -एमटा कोळसा खाण व्यवस्थापकाला नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत आंदोलना करण्यात आले. स्थानिकांच्या 16 मागण्यांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनाची हाक दिलीय. आंदोलनस्थळी आज खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भेट दिली. यावेळी आंदोलक आणि व्यवस्थापक यांच्यात मागण्याच्या पुर्ततेवरून शाब्दिक चकमक आणि मारहाण झाली. मारहाणीनंतर पोलिसांनी जमावाला पांगविले. दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत खाणीचे काम बंद पाडले आहेत. 

19 Jun 2024, 12:30 वाजता

 NDA चे अनेक खासदार संपर्कात, राहुल गांधी मोठा दावा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजप आणि नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. गांधी म्हणाले की 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर लोकसभेतील संख्या 'खूप कमकुवत' असेल आणि 'एक छोटीशी चूक देखील एनडीए सरकार पाडू शकते'. फायनान्शिअल टाईम्सशी बोलताना राहुल म्हणाले, 'मुळात एका मित्राला दुसऱ्या बाजूला वळवावे लागते.' कोणाचेही नाव न घेता राहुल यांनी दावा केला की एनडीएचे लोक 'आमच्या संपर्कात आहेत' आणि मोदी छावणीत 'खूप असंतोष' आहे.

 

19 Jun 2024, 12:23 वाजता

राज्यात 3 हजार 749 तलाठी नियुक्तीच्या प्रतीक्षेत 

तलाठ्यांची निवड करुन सरकारला नियुक्तीचा विसर पडला आहे का? असा प्रश्न उपस्थितीत होतोय. राज्यात 3 हजार 749 तलाठींची निवड झाली आहे. पण अद्याप या तलाठ्यांची निवड करण्यात आलेले नाही. 

19 Jun 2024, 12:08 वाजता

...तर राज्य सरकार कसं हातात येत नाही मी बघतो - शरद पवार 

;'आज केंद्र आणि राज्य सरकार आमच्या हातात नाही. उद्या निवडणुका येतील कालच्या निवडणुकीत झालं तसं काम झालं तर राज्य सरकार कसं हातात येत नाही मी बघतो,' असं शरद पवारांनी बारामतीच्या नीरावागजमध्ये जाहीर सभेत वक्तव्य केलं. 'राज्य सरकार हातात आलं तर ही दुखणी दुरुस्त करायला वेळ लागणार नाही', असंही ते यावेळी म्हणाले. 'नेत्यांनी काही केलं नाही पण मी तुमच्या पाठीशी उभा राहणार' असं आवाहन शरद पवारांनी केलंय.

19 Jun 2024, 10:52 वाजता

अजित पवारांच्या आमदाराचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा; 'त्या' रिकाम्या चौकटीने 'वेगळ्या निर्णयाची' चर्चा

लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. लोकसभेच्या निकालानंतरपासून अजित पवार गटामध्ये अस्वस्थता असल्याचा दावा केला जात आहे. विरोधकांनी तर अजित पवार गटातील काही आमदार बाहेर पडतील आणि पुन्हा शरद पवारांकडे येतील अशी शक्यता व्यक्त केलेली आहे. अशातच मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र आता आणखीन एक आमदाराने स्वत:च्या वाढदिवासानिमित्त घेतलेल्या एका निर्णयामुळे आणि या आमदाराच्या वाढदिवसाच्या जाहिरातींमुळे हा आमदार अजित पवार गट सोडणार का याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त...

19 Jun 2024, 09:17 वाजता

जळगावात पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा 

जळगावच्या चोपडा तालुक्यातील कमळगावमधील आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने सुमारे 80 जणांना विषबाधा झालीय. विषबाधा झालेल्या रुग्णांमध्ये चोपडा तालुक्यातील पिंप्री, चांदसणी कमळगावमधील ग्रामस्थांचा समावेश आहे. पाणीपुरी खाल्यानंतर सकाळी उलट्या, जुलाब, पोट दुखण्याचा त्रास पीडितांना झाला. 70 पैकी 30 रुग्ण चोपडामधील उपजिल्हा रुग्णालयात तसंच इतर रुग्ण खासगी आणि जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तर 10 रुग्णांवर चोपड्याच्या अडावदमध्ये उपचार सुरू आहेत. बाधित रुग्णामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. 

19 Jun 2024, 09:12 वाजता

राज्यात पोलीस भरतीला सुरूवात 

राज्यात आज सर्वत्र पोलीस भरती सुरू झाली आहे अहमदनगर येथे सकाळी पाच वाजेपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून शहरातील पोलीस परेड मैदानावर भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची पात्रता चाचणीला सुरुवात झाली आहे अहमदनगर पोलीस दलासाठी 25 पदे पोलीस शिपाई बँड्समन पदे तर 39 पदेचालक पोलीस शिपाई पदे आहेत एकूण 64 जागांसाठी होत असलेल्या भरती प्रक्रियेला 5 हजार 856 उमेदवारां चे अर्ज पात्र ठरले आहेत पहिल्या दिवशी चाचणी प्रक्रियेत शारीरिक पात्रता आणि मैदानी चाचणी होणार असून त्यानंतर कागदपत्राची छाननी होईल यानंतर पात्र झालेल्या उमेदवारांना लेखी परीक्षा ही द्यावी लागणार आहे.