Maharashtra APMC Election Results Updates : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत 25 पैकी 18 बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीची सरशी तर 5 बाजार समित्या भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. दिग्रस बाजार समितीवर मविआचं वर्चस्व, मंत्री संजय राठोडांना धक्का. तर पुण्यातील भोर तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेसनं 18 पैकी 18 जागांवर विजय मिळवलाय.
29 Apr 2023, 18:48 वाजता
पुणे जिल्ह्यातील बारामती आणि पुरंदर तालुक्यासाठी कार्यक्षेत्र असलेल्या निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरंदर तालुक्याचे आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आघाडीने 18 जागांवर विजय संपादन करत बाजार समितीवर आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. बाजार समितीवर काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आल्याने पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी कार्यकर्त्यांसह जल्लोष केला. शिंदे गटाच्या शिवसेनेचे गटनेते माजी राज्यमंत्री पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांना मोठा धक्का बसला आहे.
29 Apr 2023, 16:37 वाजता
काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदार संघातील भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेस राष्ट्रवादीने झेंडा फडकावलाय. काँग्रेस राष्ट्रवादी ला 15 जागांवर विजय मिळालाय. काँग्रेस ने 13 तर राष्ट्रवादीने 2 जागांवर विजय मिळवला. भाजपने 3 जागा खेचून आणल्या. अशोक चव्हाण यांचा मतदार संघ असलेल्या भोकर बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. अशोक चव्हाणांना शह देण्यासाठी भाजपने मोठी ताकद लावली होती. अशोक चव्हाणांनी या बाजार समितीसाठी पूर्ण वेळ देत व्युव्हरचना आखली होती. बी आर एस ने निवडणुकीत एंट्री घेत आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. अखेर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी च्या पॅनल ने 15 जागा मिळवत बाजार समितीवर झेंडा फडकावला. भाजपला 3 जागांवर समाधान मानावे लागले. नवख्या असलेल्या बी आर एस ला एकही जागा मिळाली नाही. विजयानंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
29 Apr 2023, 16:08 वाजता
वाशिम बाजार समितीवर काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, भाजपा,वंचित बहुजन आघाडी यांच्या शेतकरी विकास पॅनलची सत्ता स्थापन करणार असल्याचा निकाल समोर आला आहे. 18 पैकी 12 जागेवर विजय मिळवला आहे. तर, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जी प अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे व ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापारी याच्या पॅनल 6 जागेवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत भाजप व शिंदे गटाला प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवता आला असल्याने भाजप आमदार लखन मलिक व खासदार भावना गवळी याना धक्का मानला जात आहे.
29 Apr 2023, 15:50 वाजता
Baramati APMC Election Results : बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती
संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत रयत पॅनल
विजयी उमेदवार पुढील प्रमाणे :
कृषी पतसंस्था महिला सर्वसाधारण मतदार संघ
1) विनायक महादेव गावडे-1178
2) सतीश सर्जेराव जगताप-1143
3)रामचंद्र शामराव खलाटे-1153
4)बापूराव दौलतराव कोकरे-1166
5)दयाराम सदाशिव महाडिक-1148
6)सुनिल वसंतराव पवार -1131
7)दत्तात्रय शंकरराव तावरे-1116
08) शुभम प्रताप ठोंबरे 1210
09) सौ.शोभा विलास कदम- 1109
10) सौ.प्रतिभा दिलीप परकाळे-1229
ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ
11) विशाल ज्ञानदेव भोंडवे - 449
12) विश्वास तानाजी आटोळे -419
13) युवराज कैलास देवकाते -447
अनु.जाती / जमाती मतदार संघ
14) अरुण गणपत सकट -448
15) नितीन शंकर सरक 141
अनुज्ञप्तीधारक व आडते
16) संतोष पांडुरंग आटोळे-204
17) मिलिंद अशोक सालपे-220
29 Apr 2023, 15:41 वाजता
Pandharpur APMC Election Results : पंढरपूर विभाग कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक निकाल
APMC संख्या - 4
भाजप - 3
राष्ट्रवादी काँग्रेस - 1
मंगळवेढा - 18 जागा
भाजप - 18 ( आमदार समाधान आवताडे पॅनल)
पंढरपूर - 18 जागा
भाजप - 18( माजी आमदार प्रशांत परिचारक पॅनल)
अकलूज - 18 जागा
भाजप - 17 जागा ( आमदार रणजितसिंह मोहिते पाटील पॅनल)
राष्ट्रवादी काँग्रेस - 1
कुर्डूवाडी - 18 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस. 18 ( आमदार बबनराव शिंदे पॅनल)
29 Apr 2023, 14:36 वाजता
थोरात यांचा दणदणीत विजय, विखे पाटील यांचा धुव्वा
Sangamner APMC Election Results : संगमनेर बाजार समितीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची सत्ता आली आहे. भाजपचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या गटाला खातेही उघडता आले नाही. सर्व 18 जागा थोरात गटाने मिळवल्या. प्रतिष्ठेच्या लढतीत थोरातांची सरशी झाली आहे. विखे पाटील यांच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला आहे. संगमनेरातील जनता थोरातांच्या पाठिशी आहे. संगमनेर बाजार समितीवर थोरातांनी फडकवला झेंडा. संगमनेरात थोरातांच्या कार्यकर्त्यांचा विजयाचा जल्लोष केला आहे.
29 Apr 2023, 14:21 वाजता
चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती भाजप-सेना-रिपाईचे वर्चस्व
Chalisgao APMC Election Results : चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे, शिवसेना, रिपाई पुरस्कृत पॅनलची आघाडीचे वर्चस्व. कार्यकर्त्यांनीं फटाके फोडून गुलाल उधळत केला एकच जल्लोष केला. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत वर्चस्व कायम होते. 18 पैकी 15 जागांवर भाजप शिवसेना पॅनलचा विजय झाला. आमदार मंगेश चव्हाण यांना खांद्यावर घेत कार्यकर्त्यांनी धरला ढोल ताशाचा तालावर ठेवा धरला. मंगेश चव्हाण समर्थकांची यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.
29 Apr 2023, 13:59 वाजता
कर्जतमध्ये मोठी चुसर; रोहित पवार गट, राम शिंदेना समान जागा
Karjat APMC Election Results : अहमदनगरमधील कर्जत बाजार समिती निवडणुकीचा 18 जागेचा निकाल हाती आला आहे. याठिकाणी मोठी चुरस पाहाला मिळाली आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही आमदारांना समान कौल मिळाला आहे. भाजप आमदार राम शिंदे गटाला 9 तर रोहित पवार यांच्या गटाला 9 जागा मिळाल्या आहेत.
29 Apr 2023, 13:48 वाजता
अलिबाग बाजार समितीवर महाविकास आघाडीची निर्विवाद सत्ता
Raigad APMC Election Results : रायगड जिल्ह्यातील अलिबाग बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीची निर्विवाद सत्ता आली असून सर्व 18 जागांवर मविआचे उमेदवार विजयी झालेत. 7 जागा यापूर्वीच मविआने बिनविरोध जिंकल्या होत्या. उर्वरित 11 जागांसाठी निवडणूक झाली होती. अलिबाग बाजार समितीत प्रवेश करण्याचा शिवसेना शिंदे गटाचा प्रयत्न असफल
29 Apr 2023, 13:39 वाजता
भुजबळ समर्थकांकडून येवल्यात फटाक्यांची आतिषबाजी
Yewla APMC Election Results : येवला बाजार समितीवर भुजबळ गटाच्या शेतकरी विकास पॅनलचा झेंडा. 18 पैकी 13 जागेवर उमेदवार विजयी झालेत तर दराडे गटाच्या शेतकरी समर्थक पॅनलचा धुवा. अवघ्या तीन जागेवरच उमेदवार विजयी झाल्याने समाधान मानावे लागले. दोन जागेवर अपक्ष उमेदवार विजयी असून भुजबळ समर्थकांकडून येवल्यात फटाक्यांची आतिषबाजी गुलाल उधळत जोरदार जल्लोष केला आहे.