Maharashtra APMC Election Results LIVE Updates : अजित पवारांचा दबदबा! पुणे जिल्ह्यात भाजपचा सुपडा साफ

Maharashtra APMC Election Results Updates : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची निकाल हाती येत आहे. हाती आलेल्या निकालात महाविकास आघाडीने सरशी मारली आहे. तर सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. 

Maharashtra APMC Election Results LIVE Updates : अजित पवारांचा दबदबा! पुणे जिल्ह्यात भाजपचा सुपडा साफ

Maharashtra APMC Election Results Updates : राज्यातील  कृषी उत्पन्न बाजार समितीत 25 पैकी 18 बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीची  सरशी तर 5 बाजार समित्या भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. दिग्रस बाजार समितीवर मविआचं वर्चस्व, मंत्री संजय राठोडांना धक्का. तर पुण्यातील भोर तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेसनं 18 पैकी 18 जागांवर विजय मिळवलाय.

29 Apr 2023, 10:20 वाजता

Pimpalgaon Nashik APMC Election Results  :  नाशिकमधील पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे आणि  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांच्या पॅनलने खाते उघडले. शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्या परिवर्तन विकास पॅनेलची सध्या पीछेहाट हमाल गटातून 1 - नारायण काशिनाथ पोटे 211मतांनी विजयी, मापारी गटातून 2 - सोहन  भंडारी 429 मतांनी विजयी, शंकरलाल ठक्कर यांचा विजय निश्चित तर  अपक्ष यतीन रावसाहेब कदम हे सातव्या फेरीत आघाडीवर

29 Apr 2023, 10:18 वाजता

Nashik APMC Election Results  :  नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी असलेल्या अनुसूचित जाती जमाती गटातून भास्कर गावित 361 मतांनी विजयी झालेत. माजी खासदार देविदास पिंगळे गटाच्या आपलं पॅनलने पहिले खाते उघडले.  शिवाजी चुंबळे गटाच्या शेतकरी पॅनलच्या यमुना जाधव यांचा केला पराभव तर अपक्ष उमेदवार आणि बाद मतांची संख्या मोठ्या प्रमाणात

29 Apr 2023, 09:44 वाजता

पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, राष्ट्रवादीचे वर्चस्व

Beed APMC Election Results : बीड जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपचा धुव्वा उडाला आहे. वडवणी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी विकास महाआघाडीचे 18 पैकी 18 सदस्य निवडून आले आहेत. तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे राजाभाऊ मुंडे यांच्या शेतकरी विकास पॅनलचा धुव्वा उडाला आहे. या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने वडवणी बाजार समितीवर एकहाती वर्चस्व मिळवले आहे.

29 Apr 2023, 09:37 वाजता

Yeola APMC Election Results  :  येवला बाजार समितीचा व्यापारी गटाचा निकाल हाती आला आहे. छगन भुजबळ यांच्या शेतकरी विकास पॅनलचा व्यापारी गटातील नंदकिशोर शिवनारायण अट्टल यांचा विजय झाला.  301 मते मिळवत विजयी झालेत तसेच अपक्ष उमेदवार भरत समदडिया विजयी झाले असून त्यांना 250 मते मिळाली आहेत.

29 Apr 2023, 09:33 वाजता

Dharashiv APMC Election Results  : धाराशिव जिल्ह्यातील भूम कृषी उत्पन्न बाजार समिती निकालात भाजप-शिवसेना युतीची आघाडी. एकूण जागा 18 पैकी 7 जागेचा निकाल घोषित. युतीला 6 जागा तप महाविकास आघाडी एका जागेवर विजयी

29 Apr 2023, 09:28 वाजता

अमरावती-भातकुली बाजार समिती निवडणूक निकालाची उत्सुकता

Amravati-Bhatkuli APMC Election Results 2023 : अमरावती-भातकुली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजनीला सुरुवात झाली आहे. 9 टेबलवर मतमोजणीला सुरुवात व्हिएमव्ही कॉलेजमध्ये मतमोजणीला सुरुवात झालेय. 18 जागेसाठी मतमोजणी सुरु आहे. नागपूरनंतर विदर्भातील सर्वात मोठी अमरावती बाजार समिती आहे. आमदार यशोमती ठाकूर आणि आमदार रवी राणा यांच्या पॅनलमध्ये थेट लढत होत आहे. आमदार रवी राणा यांचे बंधु सुनील राणा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आमदार रवी राणा यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

29 Apr 2023, 09:25 वाजता

 यवतमाळ जिल्ह्यात महाविकास आघाडीची बाजी

Yavatmal APMC Election Results 2023 : यवतमाळ जिल्ह्यातील एपीएमसी निकाल.
यवतमाळ - महाविकास आघाडी
दिग्रस - महाविकास आघाडी
पुसद - महाविकास आघाडी
बाभूळगाव - महाविकास आघाडी
वणी - भाजप -शिवसेना युती
महागाव - भाजप -शिसेना युती
नेर - शिवसेना (शिंदे गट)

29 Apr 2023, 09:24 वाजता

संजय राठोड यांच्या पॅनलचा निसटता विजय

Yavatmal Ner APMC Election Results 2023 : यवतमाळ नेर कृषी उत्पन्न बाजार समिती शिवसेनेकडे (शिंदे गट) गेली आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेला  -  10 जागा तर महाविकास आघाडीला 8 जागा मिळाल्या आहेत. पालकमंत्री संजय राठोड यांच्या पॅनलचा निसटता विजय झाला आहे.

29 Apr 2023, 09:21 वाजता

Bhandara Gondia APMC Election Results 2023 : भंडारा गोंदिया जिल्ह्यात आज सहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. भंडारा जिल्ह्यात भंडारा, लाखनी, तर गोंदिया जिल्हयात गोंदिया, तिरोडा, आमगाव, अर्जुनी मोरगाव या बाजार समितीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. 

1 ) भंडारा - काँग्रेसची सत्ता
2) लाखनी - भाजपा राष्ट्रवादी युती

1) गोंदिया - राष्ट्रवादी काँग्रेस
2) तिरोडा - भाजप
3) अर्जुनी मोरगाव - भाजप

29 Apr 2023, 09:20 वाजता

Nandurbar APMC Election Results 2023 :  नंदुरबार जिल्ह्यातील तीन बाजार समितीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतपेट्या मतमोजणी कक्षाकडे करण्यात आल्या आहेत. नंदुरबार आणि शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मतमोजणी केंद्राबाहेर उमेदवार आणि समर्थकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.