Maharashtra APMC Election Results LIVE Updates : अजित पवारांचा दबदबा! पुणे जिल्ह्यात भाजपचा सुपडा साफ

Maharashtra APMC Election Results Updates : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची निकाल हाती येत आहे. हाती आलेल्या निकालात महाविकास आघाडीने सरशी मारली आहे. तर सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. 

Maharashtra APMC Election Results LIVE Updates : अजित पवारांचा दबदबा! पुणे जिल्ह्यात भाजपचा सुपडा साफ

Maharashtra APMC Election Results Updates : राज्यातील  कृषी उत्पन्न बाजार समितीत 25 पैकी 18 बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीची  सरशी तर 5 बाजार समित्या भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. दिग्रस बाजार समितीवर मविआचं वर्चस्व, मंत्री संजय राठोडांना धक्का. तर पुण्यातील भोर तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेसनं 18 पैकी 18 जागांवर विजय मिळवलाय.

29 Apr 2023, 12:18 वाजता

Ahmednagar Karjat APMC Election Results  : पुणे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीला ते सुरुवात झाली असून मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित.  माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप शिंदे गट शिवसेना विरुद्ध बंडखोर राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत

29 Apr 2023, 12:16 वाजता

चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल

Chandrapur Chimur APMC Election Results  : चंद्रपूरमधील चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला आहे. 18 पैकी भाजप समर्थित शेतकरी सहकार विकास पॅनलला 17 जागा तर काँग्रेस समर्थित महाविकास आघाडी परिवर्तन पॅनलला एक जागा मिळाली. भाजप आमदार बंटी भांगडिया यांचा मोठा विजय झालाय.

29 Apr 2023, 12:16 वाजता

कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती

Ahmednagar Karjat APMC Election Results  : अहमदनगर कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती भाजपचे राम शिंदे यांच्या पॅनलला सर्वसाधारण गटामध्ये आघाडी. भाजपच्या राम शिंदे गटाच्या 7 पैकी 5 जागा आघाडीवर तर राष्ट्रवादीच्या रोहित पवार गटाच्या 2 जागा आघाडीवर

29 Apr 2023, 12:12 वाजता

Amgaon APMC Election Results  : आमगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप, राष्ट्रवादीचा विजय झाला. 18 पैकी भाजप, राष्ट्रवादी 12 जगात विजय आमगाव कृषी उत्पन्न बाजार समिती वर भाजप राष्ट्रवादीचे कब्जा केला आहे. 

गोंदिया 
निवडणूक निकाल जाहीर - 18 जागा   
बिनविरोध - 
भाजप - राष्ट्रवादी - 1
काँग्रेस  - चाबी - 6
इतर - 1

अर्जुनी मोरगाव
निवडणूक निकाल जाहीर - 18 जागा   
बिनविरोध - 
भाजप - 9
महाविकास आघाडी - 4 

आमगाव
निवडणूक निकाल जाहीर - 18 जागा   
बिनविरोध -
भाजप - राष्ट्रवादी - 12
काँग्रेस - 05

तिरोडा 
निवडणूक निकाल जाहीर - 18 जागा   
बिनविरोध -
भाजप - 4
महाविकास आघाडी - 1

29 Apr 2023, 11:22 वाजता

 केज निवडणुकी मुंदडा-आडसकर गटाला यश

Beed APMC Election Results  : बीड केज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकी मुंदडा-आडसकर गटाला यश. केज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंदडा-आडसकर यांच्या ताब्यात. ग्रामपंचायत मतदार संघातील 4 पैकी 4 जागा बजरंग बप्पा सोनवणे यांच्याकडे तर केज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत 18 पैकी 14 जागा मुंदडा-आडसकर गटाचे सर्व उमेदवार विजयी.

29 Apr 2023, 11:21 वाजता

Ramtek APMC Election Results  : रामटेक भाजप प्रणित शेतकरी विकास सहकार पॅनल 4 जागांवर विजयी. शेतकरी सहकार पॅनल 7 जागांवर विजयी. सुनील केदार आणि आशिष जयस्वाल यांच्या सहकार पॅनल एकही जागा मिळालेली नाही.

29 Apr 2023, 11:19 वाजता

गोंदिया आमगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निकाल 

Gondia Mango APMC Election Results  :  आमगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप आणि राष्ट्रवादी कॉगेस पक्ष युतीत लढले असून या ठिकाणी भाजपचे 5 उमेदवार तर राष्ट्रवादी कॉग्रेसचे 4  भारतीय कॉग्रेस चा 1 असे एकूण 18 पैकी 10 निकाल आता पर्यंत हाती आले असून यात आमगाव कृषी उत्पन्न बजार समितीत भाजप जिल्हा अध्यक्ष केशवराव मानकर हे स्वतः या निवडणुकीत विजयी झाले आहेत.

29 Apr 2023, 11:16 वाजता

चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती निकाल

Chandwad APMC Election Results  :  चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकारी संस्था भटक्या जमाती प्रवर्गात लोकमान्य परीवर्तन पॅनलचे विक्रम मार्कंड हे 515 मते मिळवून विजयी. चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकारी संस्था महिला राखीव गटात लोकमान्य परीवर्तन पॅनलचे  वैशाली जाधव व मिना शिरसाठ विजयी तर ग्रामपंचायत गटातील अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात शेतकरी विकास पॅनलचे वाल्मिक वानखेडे विजयी

29 Apr 2023, 10:34 वाजता

Pandharpur APMC Election Results  :  पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक मतमोजणीमध्ये विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघात भाजप माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या पॅनलचे वर्चस्व. सोसायटी मतदारसंघात 10 जागेवर परिचारक पॅनलचे उमेदवार विजयी. अद्याप तीन जागांची मतमोजणी सुरु । 18 जागा पैकी 5 जागा बिनविरोध झाल्या होत्या 13 जागा साठी आज मत मोजणी सुरु आहे. 13 पैकी 10 जागेवर भाजप माजी आमदार परिचारक पॅनल विजयी

29 Apr 2023, 10:30 वाजता

Sangli APMC Election Results : सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती 18 जागांचे निकाल. 18 पैकी 4 जागांवर महाविकास आघाडी तर 1 अपक्ष उमेदवार विजयी.