Maharashtra APMC Election Results Updates : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत 25 पैकी 18 बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीची सरशी तर 5 बाजार समित्या भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. दिग्रस बाजार समितीवर मविआचं वर्चस्व, मंत्री संजय राठोडांना धक्का. तर पुण्यातील भोर तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेसनं 18 पैकी 18 जागांवर विजय मिळवलाय.
29 Apr 2023, 09:10 वाजता
लातूर जिल्ह्यात महाविकास आघाडीची आघाडी
Latur APMC Election Results 2023 : लातूर जिल्ह्यातील चार बाजार समित्यांपैकी दोन ठिकाणी भाजप तर दोन ठिकाणी महाविकास आघाडीने वर्चस्व मिळवले आहे. लातूर आणि उदगीरवर मविआने आघाडी घेतलीय. तर चाकूर आणि औसामध्ये भाजपनं मविआला धक्का देत दोन्ही बाजार समित्या ताब्यात घेतल्यात. याठिकाणी आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवण्यात आली होती.
29 Apr 2023, 08:58 वाजता
6 बाजार समितीच्या मतमोजणीला सुरुवात
Maharashtra APMC Election Results 2023 : भंडारा गोंदिया जिल्ह्यातील 6 बाजार समितीच्या मतमोजणीला सुरुवात झालीय. गोंदिया जिल्ह्यात 4 तर भंडारा जिल्ह्यात 2 बाजार समितीची निवडणूक पार पडली. भंडाऱ्यातून नाना पटोले यांची प्रतिष्ठा पणाला लागली. त्यांना रोखण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी, शिंदे गटानं एकत्र पॅनल उभारलंय. तर काँग्रेस स्वबळावर लढत आहे. निवडणुकीत कोण बाजी मारेल हे मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.
29 Apr 2023, 08:09 वाजता
अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडीला मोठे यश
Maharashtra APMC Election Results 2023 : अमरावती जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडी मिळवलीय. तिवसा बाजार समितीत काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात 18 पैकी 18 उमेदवार निवडून आलेत. चांदूर रेल्वेत 18 पैकी 17 उमेदवार निवडून आलेत. या ठिकाणी भाजपला एका ठिकाणी समाधान मानावे लागले. मोर्शीमध्ये खासदार अनिल बोंडे यांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या पॅनलचा पराभव झालाय. इथं मविआचे 10 उमेदवार विजयी झालेत. नांदगाव खंडेश्वरमध्ये अपक्ष अभिजित ढेपे यांच्या गटाचे 18 पैकी 11 उमेदवार निवडून आलेत. अंजनगाव सुर्जीमध्ये काँग्रेसनं विजय मिळवलाय...((असून 18 पैकी 17 जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेत. तर 1 जागेवर भाजपला समाधान मानावे लागले. इथं भाजप, शिंदे गट, प्रहार पॅनलचा पराभव झाला. भातकुली बाजर समितीचा निकाल येणार असून यामध्ये आमदार रवी राणा यांचे बंधू निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.))
29 Apr 2023, 08:04 वाजता
काँग्रेसला मोठे यश, 18 पैकी 18 जागांवर विजय
Maharashtra APMC Election Results 2023 : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेसनं 18 पैकी 18 जागांवर विजय मिळवलाय. काँग्रेसच्या संग्राम थोपटे यांनी भाजप, शिवसेना दोन्ही गट, भाजपला धोबीपछाड दिला आहे. या विजयानंतर कार्यकर्त्यांनी भोरमध्ये मोठा जल्लोष साजरा केला.
29 Apr 2023, 08:01 वाजता
Maharashtra APMC Election Results Updates : राज्यात एकूण 253 बाजार समित्यांपैकी 18 बाजारसमित्या बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरीत 235 बाजार समित्यांसाठी काल निवडणूक झाली आहे. तर 30 तारखेला 88 बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे. राज्यात काल 147 बाजार समित्यांची निवडणूक झाली आहे. या निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का बसल्याचे चित्र दिसून येत आहे. ( APMC Elections News)
बाजार समितीच्या निवडणूक निकालात सुरुवातीला 9 ठिकाणी महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. तर, 4 बाजार समित्या भाजप-सेना युतीच्या ताब्यात आल्या आहेत. एक बाजार समिती इतरांच्या ताब्यात गेली आहे. 147 पैकी 14 बाजार समित्यांचे निकाल हाती आले आहे. दिग्रसमध्ये मंत्री संजय राठोडांना धक्का बसलाय तिथं मविआची सत्ता आलीय. यवतमाळ, लातूर, तिवसा, पुसद, भोर, सिन्नरमध्ये मविआची विजयी झालीय. यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मंगळवेढा, यवतमाळ जिल्ह्यातील महागाव या बाजार समित्या भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात आल्या आहेत.
यवतमाळच्या बाभुळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाचे माजी मंत्री आमदार अशोक उईके यांना पराभवाचा धक्का बसलाय. त्यांना फक्त 4 जागा मिळाल्या. तर महाविकास आघाडीने माजी मंत्री वसंत पुरके यांच्या नेतृत्वात 17 पैकी 13 जागांवर विजय मिळवला आहे. यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस शिवसेना ठाकरे गट युतीने आपला गड कायम ठेवला आहे. तब्बल अकरा जागा जिंकित महाविकास आघाडीने भाजप शिवसेना युतीला धोबीपछाड दिला आहे. भाजपचे माजी मंत्री मदन येरावार व जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात युतीने मविआ पुढे सर्व शक्ती पणाला लावून आव्हान उभे केले होते. परंतु भाजप शिवसेना युतीला केवळ चारच जागांवर समाधान मानावे लागले. तर तीन जागावर अपक्षांनी विजय मिळविला.