Maharashtra Breaking News LIVE: पंतप्रधान मोदींच्या विदर्भ दौऱ्यानंतर अमित शाहांचा मराठवाडा दौरा

विधानसभा निवडणुकींच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. पुण्यातील विसर्जन मिरवणुकी दरम्यान तिघांचा आकस्मित मृत्यू झालाय. पुण्यात विसर्जनाच्या दिवशी मेट्रोने प्रवास करण्याची संख्या अधिक होती ..तब्बल साडेतीन लाख प्रवाशांनी प्रवास केला.राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया.

Maharashtra Breaking News LIVE: पंतप्रधान मोदींच्या विदर्भ दौऱ्यानंतर अमित शाहांचा मराठवाडा दौरा

Maharashtra Breaking News LIVE: विधानसभा निवडणुकींच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. पुण्यातील विसर्जन मिरवणुकी दरम्यान तिघांचा आकस्मित मृत्यू झालाय. पुण्यात विसर्जनाच्या दिवशी मेट्रोने प्रवास करण्याची संख्या अधिक होती ..तब्बल साडेतीन लाख प्रवाशांनी प्रवास केला.राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया.

19 Sep 2024, 21:49 वाजता

अमित शाह यांचा मराठवाडा दौरा

पंतप्रधान मोदींच्या विदर्भ दौऱ्यानंतर अमित शाहांचा मराठवाडा दौरा आहे. २३ सप्टेंबरला संभाजीनगर मध्ये घेणार बैठक, यावेळी राज्याचे प्रभारी भूपेंद्र यादव बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मराठवाड्यातील भाजपाच्या 1 हजार पदाधिकाऱ्यांची बैठक अमित शाह घेणार आहेत. रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे हे देखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मराठवाड्यात पार्टी विस्तार आणि बूथ रचना संदर्भात घेणार बैठक

19 Sep 2024, 19:41 वाजता

महाविकास आघाडीची जागावाटपासाठी बैठक

राष्ट्रवादी शरद पवार गटाची आणि उद्धव ठाकरे गटाची विधानसभा जागावाटप संदर्भातील बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल

19 Sep 2024, 18:29 वाजता

पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीच्या कालखंडात केलेल्या प्रगतीला अधोरेखित करण्यासाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि कर्ज वितरित करतील.

19 Sep 2024, 16:41 वाजता

जळगाव जिल्हा परिषदच्या इमारतीत ठिय्या आंदोलन

ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्हा परिषदच्या इमारतीत ठिय्या आंदोलन सुरु आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वेळ न दिल्याने कर्मचारी आक्रमक, जिल्हा परिषदेचे कुलूप तोडून शेकडो कर्मचाऱ्यांचा जिल्हा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात प्रवेश केला.माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वाखाली तासाभरापासून जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन सुरू आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेतील कामकाज बंद करुन सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले. जळगाव जिल्हा परिषदेमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. जोपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी येऊन कर्मचाऱ्यांची मागण्यांबाबत चर्चा करत नाही तोपर्यंत जिल्हा परिषदेत या आंदोलन करण्यावर कर्मचारी ठाम आहेत.

19 Sep 2024, 14:02 वाजता

राजरत्न आंबेडकरांनी घेतली मनोज जरांगेंची भेट 

राजरत्न आंबेडकर यांनी आज अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची भेट घेतली. याचवेळी जरांगेंची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचं पथक आलं होतं. तपासणी सुरू असताना राजरत्न आंबेडकर भावुक झाले.जरांगेंची परिस्थिती पाहून राजरत्न आंबेडकरांचे डोळे पाणावले. जरांगेंच्या केसाला धक्का लागला तर निवडणुकीत सत्ताधारी असेल किंवा विरोधक कुणालाही रस्त्यावर फिरता येणार नाही असा इशारा राजरत्न आंबेडकरांनी यावेळी दिला.

19 Sep 2024, 14:01 वाजता

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पालेभाज्याची आवक वाढली

नवी मुंबईमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पालेभाज्याची आवक 20 टक्क्यांनी वाढलीये..  60 रूपयांवर गेलेला पालेभाजीच्या जुडीचे दर 15 टक्क्यांनी  कमी झालेय.. यात गणेशोत्सवामध्ये कोथिंबीर 50 ते 60 रूपयांवर गेली होती, त्याचप्रमाणे ,मेथी ,शेपू ,चवळी या सारख्या भाज्यांची जुडी देखील  40 रूपये इतकी होती.. आता याच जुड्या 25 ते 30 रुपये इतक्या झाल्याय..  अजून हे दर काही दिवस राहतील तसंच दिवाळीत दर आणखी कमी होतील असा विश्वास व्यापारी व्यक्त करतायेत..

19 Sep 2024, 12:25 वाजता

बुलढाण्यात 26 महापुरुषांच्या पुतळ्याचे लोकार्पण

बुलढाणा शहरात तब्बल 26 महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आलेय.. या पुतळ्यांचं लोकार्पण खुद्द मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्यानं शहरात त्याची तयारी करण्यात आलीये.... तसेच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत लाडक्या बहीण योजनेचा मोठा सोहळाही आयोजित केलाय... ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने महिला याठिकाणी उपस्थित असणारे.

19 Sep 2024, 11:36 वाजता

काँग्रेस पक्ष खूप व्यस्त आहे, संजय राऊतांचा काँग्रेसला टोला

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधलाय. जागावाटपाच्या दिरंगाईवरून प्रत्येक वेळी काँग्रेस पक्ष तारीख पे तारीख देतात असं राऊतांनी म्हटलंय. इतकंच नाहीतल काँग्रेस पक्ष खूप व्यस्त असल्याचा टोलाही संजय राऊतांनी लगावलाय

19 Sep 2024, 11:32 वाजता

संजय दिना पाटलांच्या खासदारकीला आव्हान

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय दिना पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे.. त्यांच्या खासदारकीला अपक्ष उमेदवार शहाजी थोरात यांच्याकडून हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय.. निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रात आईच्या नावाचा उल्लेख नसल्यानं संजय दिना पाटील यांना अपात्र ठरवण्यात यावं, अशी मागणी हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेतून करण्यात आलीये..दरम्यान याप्रकरणी मिहीर कोटेंचा यांच्यासह अन्य उमेदवारांना समन्स बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत.

19 Sep 2024, 11:31 वाजता

नागपुरातील काही भागात उद्यापासून 30 तास पाणी पुरवठा बंद

नागपुरात शहरातल्या काही भागात उद्यापासून 30 तास पाणी पुरवठा बंद असणारेय.  पूर्व नागपुरातील भरतवाडा, कळमना भाग, नंदनवन, सक्करदरा, इंदोरा या भागातील अनेक जलकुंभावर 30 तास पाणी पुरवठा होणार नाहीय.  अंतर्गत पाईपलाईन जोडणी काम आणि मुख्य लाईनवर गळती रोखण्यासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. उद्या सकाळी 10 वाजल्यापासून 21 सप्टेंबरला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पाणीपुरवठा  खंडित असणारेय.