Maharashtra Breaking News LIVE: पंतप्रधान मोदींच्या विदर्भ दौऱ्यानंतर अमित शाहांचा मराठवाडा दौरा

विधानसभा निवडणुकींच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. पुण्यातील विसर्जन मिरवणुकी दरम्यान तिघांचा आकस्मित मृत्यू झालाय. पुण्यात विसर्जनाच्या दिवशी मेट्रोने प्रवास करण्याची संख्या अधिक होती ..तब्बल साडेतीन लाख प्रवाशांनी प्रवास केला.राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया.

Maharashtra Breaking News LIVE: पंतप्रधान मोदींच्या विदर्भ दौऱ्यानंतर अमित शाहांचा मराठवाडा दौरा

Maharashtra Breaking News LIVE: विधानसभा निवडणुकींच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. पुण्यातील विसर्जन मिरवणुकी दरम्यान तिघांचा आकस्मित मृत्यू झालाय. पुण्यात विसर्जनाच्या दिवशी मेट्रोने प्रवास करण्याची संख्या अधिक होती ..तब्बल साडेतीन लाख प्रवाशांनी प्रवास केला.राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया.

19 Sep 2024, 10:11 वाजता

जरांगेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. काल जरांगे यांच्या तपासणीसाठी 3 वेळा डॉक्टरांचं पथक आलं तीन वेळा त्यांची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली.दोन दिवसांपासून जरांगे यांनी अन्न पाण्याचा त्याग केल्यामुळे त्याची शुगर लेव्हल 70 वर आली होती, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

19 Sep 2024, 09:59 वाजता

लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीला होणार नाही- पवार 

लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीला होणार नसल्याचं मोठं विधान शरद पवारांनी केलंय.. आगामी विधानसभेत मविआ जिंकणार असल्याचा विश्वासही त्यांनी एका मुलाखतीत व्यक्त केलाय..  तसेच कोरोना काळात ठाकरेंनी चांगलं काम केल्याचं शरद पवार म्हणालेत तर सुप्रिया सुळे दिल्लीत खुश असल्याचं पवार म्हणालेत.

19 Sep 2024, 09:58 वाजता

नव्या आघाडीसाठी आज प्रमुख नेते एकत्र येणार 

महाराष्ट्रातील नव्या आघाडीसाठी आज प्रमुख नेते एकत्र येणार आहेत. महाराष्ट्राला नवीन सुसंस्कृत पर्याय देण्यासाठी संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, बच्चू कडू, तसंच इतर घटक पक्षांची आज पुणे शहरात एकत्र बैठक होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू, भारतीय जवान किसान पक्षाचे नारायण अंकुशे आणि इतर घटक पक्षाच्या नेत्यांची चौथी बैठक आज पुण्यात होईल. यात राज्यातील महत्त्वाचे प्रश्न, तसंच आगामी निवडणुकीतील अजेंडा, यावर सखोल विचारमंथन केलं जाईल. 

19 Sep 2024, 09:53 वाजता

मविआचं मुंबईतील 36 जागांचं वाटप जवळपास पूर्ण

मविआच्या बैठकीचा आजचा दुसरा दिवस आहे. मुंबईतल्या बीकेसीमध्ये कालपासून हे बैठकांचं सत्र सुरु आहे. मुंबईतील 36 जागांचं वाटप जवळपास पूर्ण झालं असून आणखी 6-7 जागांवर तिढा कायम असल्याचं समजतंय...त्याचबरोबर राज्यातीलही जागावाटपावर चर्चा सुरू असून उद्याही यावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय.