Maharashtra Breaking News LIVE: पंतप्रधान मोदींच्या विदर्भ दौऱ्यानंतर अमित शाहांचा मराठवाडा दौरा

विधानसभा निवडणुकींच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. पुण्यातील विसर्जन मिरवणुकी दरम्यान तिघांचा आकस्मित मृत्यू झालाय. पुण्यात विसर्जनाच्या दिवशी मेट्रोने प्रवास करण्याची संख्या अधिक होती ..तब्बल साडेतीन लाख प्रवाशांनी प्रवास केला.राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया.

Maharashtra Breaking News LIVE: पंतप्रधान मोदींच्या विदर्भ दौऱ्यानंतर अमित शाहांचा मराठवाडा दौरा

Maharashtra Breaking News LIVE: विधानसभा निवडणुकींच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. पुण्यातील विसर्जन मिरवणुकी दरम्यान तिघांचा आकस्मित मृत्यू झालाय. पुण्यात विसर्जनाच्या दिवशी मेट्रोने प्रवास करण्याची संख्या अधिक होती ..तब्बल साडेतीन लाख प्रवाशांनी प्रवास केला.राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया.

19 Sep 2024, 11:30 वाजता

गडकरी आणि पवार येणार एकाच मंचावर 

केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या उपस्थितीत 4 ऑक्टोबरला सांगलीत मराठा समाज संस्थेचा कार्यक्रम पार पडणारेय.  भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी ही माहिती दिली. संस्थेच्यावतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण यानिमित्ताने होणारेय..संस्थेला 75 वर्ष पूर्ण होत असल्याने अमृतमहोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाचं सर्वपक्षीय व सर्वधर्मीय नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आलंय.  

19 Sep 2024, 11:28 वाजता

शाहू विकास आघाडी पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता 

जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकरांच्या शाहू विकास आघाडी पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगानं मान्यता दिलीये.. संजय पाटील हे शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे भाऊ आहेत.. पक्षाला मान्यता मिळाल्यामुळे आता आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर शाहू विकास आघाडीकडूनच निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

19 Sep 2024, 11:27 वाजता

विधानसभेसाठी आठवलेंकडून 10 ते 12 जागांची मागणी 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी 10 ते 12 जागांची मागणी केलीये.  देवेंद्र फडणवीस हे आमचा विचार करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.ते लातूर जिल्ह्यातील औसा शहरात तक्षशिला बौद्धविहार विकासकामांसाठी आले होते.

19 Sep 2024, 11:26 वाजता

वन नेशन-वन इलेक्शन या निर्णयाचं मुख्यमंत्र्यांकडून स्वागत 

वन नेशन-वन इलेक्शन या निर्णयाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वागत केलंय.. या मुळे निवडणूक प्रक्रिया आणखी प्रभावी आणि सोयीची होईल तसंच वेळ आणि पैशाची बचत होईल असं शिंदे म्हणालेत.

19 Sep 2024, 11:25 वाजता

पुण्यात ध्वनिप्रदूषण रोखण्याच्या नियमांची पायमल्ली

पुण्यात ध्वनिप्रदूषण रोखण्याच्या नियमांची पायमल्ली झाल्याचं पाहायला मिळालं...पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी आवाहन करूनही  डिजेचा दणदणाट पाहायला मिळाला. ध्वनिप्रदूषणाच्या सर्व मर्यादा ओलांडून यंदाच्या मिरवणुकीत लक्ष्मी रोड आणि दहा प्रमुख चौकांत सरासरी 90 डेसिबलपेक्षा जास्त नोंदवली गेली. 
सरासरी ध्वनिपातळी 94.8 डेसिबल असून, त्यातही बेलबाग चौक आणि होळकर चौकातील ध्वनीपातळी सर्वाधिक 118 डेसिबल इतक्या धोकादायक पातळीवर पोहचली होती.

19 Sep 2024, 11:24 वाजता

गणपती विसर्जनानंतर मुंबईत स्वच्छता ही सेवा अभियान

गणपती विसर्जनानंतर मुंबईत स्वच्छता ही सेवा अभियान मोहीम राबवण्यात आलीय.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: हाती झाडू घेऊन गिरगाव चौपाटीत स्वच्छता अभियान राबवलं. यावेळी ट्रॅक्टर चालवूनही शिंदेंनी गिरगाव चौपाटी स्वच्छ केलीय. त्यांच्यासह दीपक केसरकर, मंगल प्रभात लोढा यांचाही या मोहीमेत सहभाग असेल..या अभियानाअंतर्गत आजपासून पुढील 15 दिवस राज्यभर ही स्वच्छता मोहिम राबली जाणार आहे.

19 Sep 2024, 10:25 वाजता

संजय पांडे काँग्रेसमध्ये करणार प्रवेश 

माजी पोलीस महासंचालक संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. संजय पांडे माजी पोलीस महासंचालक आहेत. आज संध्याकाळी त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. ते वर्सोवा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

19 Sep 2024, 10:19 वाजता

पुण्यातील विसर्जन मिरवणुकी दरम्यान तिघांचा आकस्मित मृत्यू 

पुण्यातील विसर्जन मिरवणुकी दरम्यान तिघांचा आकस्मित मृत्यू झालाय.मृत्यू नेमक्या कशामुळे हे शवविच्छेदन अहवालातून समोर येणार असल्याची माहिती ससून रुग्णालयाने दिली आहे. नयन ढोके, विशाल बल्लाळ आणि अन्य एक 45 वर्षीय व्यक्तीचा यात मृत्यू झालाय.लक्ष्मी रोड, टिळक रोड व एकाचा कसबा गणपती मंडळाजवळ मृत्यू झालाय. तिघांचेही मृतदेहांचे ससून रुग्णालयामध्ये शवविच्छेदन केले असून काही वेळात त्याचा अहवाल येणार आहे.गणेशोत्सवादरम्यान  582 जणांना डीजे चा आवाज, गर्दी आणि उन्हाचा तडाका यामुळे त्रास झाला आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार ही करण्यात आला आहे. 

19 Sep 2024, 10:14 वाजता

म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठी अर्ज भरण्याची आज शेवटची संधी

म्हाडाच्या मुंबईतील 2030 घरांसाठी अर्ज भरण्याची आज शेवटची संधी आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. तर रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अनामत रक्कम भरता येणारेय.  येत्या 8 ऑक्टोबरला यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये संगणकीय सोडत काढली जाणारेय. 

19 Sep 2024, 10:12 वाजता

2 ते 4 दिवसात मागण्या मान्य करा- जरांगे 

आमच्या मागण्या 2 ते 4 दिवसात मान्य करा अशी मागणी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी केलीय.. मागणी मान्य न झाल्यास 2024च्या विधानसभा निवडणुकीत आमच्या नावानं बोटं मोडू नका असा इशाराही जरांगेंनी दिलाय..  आरक्षणासाठीचे तिन्हीही गॅझेट 2-4 दिवसात लागू करा ही सरकारची जबाबदारी असल्याचं जरांगे म्हणालते.