Breaking News LIVE : मध्य पुण्यात अंधार; वीज पुरवठा सुरळीत होण्यास तीन तास लागणार

Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी पाहुया एका क्लिकवर 

Breaking News LIVE : मध्य पुण्यात अंधार; वीज पुरवठा सुरळीत होण्यास तीन तास लागणार

Maharashtra Breaking News LIVE: भाजपचे खासदार नारायण राणे सिंधुदुर्गात दाखल झालेत.. आज मालवणमध्ये जाऊन शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेच्या घटनास्थळाला ते भेट देणार आहेत. पुतळा अपघात प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी महायुतीवर टीका केलीये.आज सकाळी मविआचे नेते मालवणमध्ये धडक मोर्चा काढून शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं त्याचा निषेध करणार आहे.. सकाळी 11 वाजता मालवण तहसील कार्यालयाबाहेर मोर्चा काढणार आहेत.

28 Aug 2024, 12:32 वाजता

एचपी गॅस टँकरमधून गॅस चोरी

हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस टँकर मधून स्वयंपाकाच्या गॅसची जीवघेण्या पद्धतीने चोरी केल्या जात आहे. झी 24 तास च्या प्रतिनिधींनी ही गॅस चोरी उजेडात आणली आहे. यवतमाळहुन जाणाऱ्या नागपूर हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर दहेगाव जवळ राजरोसपणे हा काळा बाजार सातत्याने चालतो. रोज 200 हुन अधिक व्यावसायिक गॅस सिलेंडर मध्ये टँकर मधील गॅस एका वेळी पाच सिलेंडर मध्ये नोझल कनेक्टर द्वारे भरला जातो. त्यानंतर या सिलेंडरची अवैध विक्री धाबा आणि हॉटेलमध्ये व्यवसायिकांना केली जाते. राष्ट्रीय महामार्गावर वडकी पोलीस स्टेशन सह महामार्ग पोलिसांची सतत गस्त सुरू असताना देखील चोरीचा हा प्रकार कसा काय चालतो शिवाय अन्न व नागरी पुरवठा विभाग या गोरखधंद्याबाबत अनभिज्ञ कसा? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

28 Aug 2024, 10:59 वाजता

युती-आघाडीच्या राजकारणात नवा प्रयोगाची नांदी, थोड्याच वेळात महत्वाची बैठक 

युती-आघाडीच्या राजकारणात नवा प्रयोगाची नांदी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीसाठी संभाजी छत्रपतींनी पुढाकार घेतलाय. आघाडीच्या दृष्टीने आज मुंबईत महत्वाची बैठक होणार आहे. वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये थोड्याच वेळात बैठक होणार आहे. स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती, प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर व इतर छोट्या पक्षांची मिळून तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न होणार आहे.

28 Aug 2024, 10:04 वाजता

मुंबईतील 36 जागांसाठी काँग्रेसकडे 200 पेक्षा जास्त अर्ज 

निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारी मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरु झालीय. त्याच वेळी योग्य उमेदवार कोण असेल याचीही चाचपणी काँग्रेसने सुरु केलीय. विशेष म्हणजे मुंबईतील 36 जागांसाठी काँग्रेसकडे 200 पेक्षा जास्त अर्ज आले आहेत. त्यामुळे कुणाला संधी द्यायची याची चाचपणी आज मधुसूदन मिस्त्री टिळक भवन मध्ये करणार आहेत. मिस्त्री दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर आसल्याने या उमेदवाराशी चर्चा करुन त्याचा अहवाल हाय कमांडला देणार आहेत.

28 Aug 2024, 10:03 वाजता

पोर्शे कार अपघातातील आरोपीला प्रौढ ठरवण्याबाबतच्या अर्जावर आज सुनावणी

कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला प्रौढ ठरवण्याबाबतच्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे. मद्यपान करून सुसाट वेगाने कार चालवत असताना झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेला तीन महिने पूर्ण झाले आहेत. या प्रकरणात कार चालवणाऱ्या अल्पवयीन आरोपीला त्याने केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेऊन प्रौढ ठरवण्यात यावं यासाठी पुणे पोलिसांनी बाल न्यायमंडळात अर्ज दाखल केलेला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन आरोपी विरोधातील दोषारोपपत्र आधीच दाखल केलेल आहे.  अपघाताच्या गुन्ह्यात मुलाला जामीन मिळालेला आहे. तर त्याचे आई-वडिलांनी ससून मधील डॉक्टर अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत.

28 Aug 2024, 10:01 वाजता

मविआच्या आजच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

बदलापूर घटनेसह राज्यात वाढते बाल लैंगिक अत्याचार,पुण्यात पोलिसांवर कोयता गँगचा हल्ला,मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळणे यासह बिघडलेली कायदा सुव्यवस्था,यामुळं राज्य सरकारविरोधात जनतेत पसरलेला असंतोष. यावर मविआ सरकारविरोधात आक्रमक होण्यासंदर्भात रणनिती ठरवली जाईल. मुंबईतील जागावाटप काही जागांवरून अडले आहे.यावर मविआच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होवून मार्ग काढला जाईल.विधानसभा निवडणुकीचे राज्यातील जागावाटप चर्चेला विलंब होतोय.ते लवकर होण्यासाठी रोडमॅप तयार केला जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

28 Aug 2024, 08:44 वाजता

दहीहंडी फोडताना तब्बल 238 गोविंदा जखमी 

दहीहंडी फोडताना तब्बल 238 गोविंदा जखमी झालेत.. ठाण्यातही 19 गोविंदांना दुखापत झाल्याची माहिती समोर आलीय.. जखमी गोविंदांवर सरकारी, खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.. दोन गोविंदांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळतेय..  कुणाल पाटील याच्या पाठीच्या मणक्याला तर मनू खारवी  याच्या डोक्याला मार लागला आहे.राज्यात अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा झाला असला तरीही जखमी झालेल्या गोविंदांची संख्या पाहिल्यास उत्सहाला गालबोट लागल्याचं दिसतंय.

28 Aug 2024, 08:43 वाजता

मला लोकसभेत पाडण्यासाठी बच्चू कडूंनी सुपारी घेतली- नवनीत राणा 

बच्चू कडू हे सुपारीबाज नेते असल्याचा घणाघात नवणीत राणा यांनी केलाय.. मला लोकसभेत पाडण्यासाठी बच्चू कडूंनी सुपारी घेतली असल्याचा घाणाघातही त्यांनी केलाय.. ते ढोंगी आणि तोडी बाहदर असल्याचा आऱोपही त्यांनी केलाय.पुढील  निवडणुकीत त्यांचा हिशोब चुकता करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. त्यामुळे आता पुन्हा राणा विरुद्ध कडू असा वाद अमरावतीत रंगण्याची चिन्ह आहेत.

28 Aug 2024, 08:43 वाजता

महाविकास आघाडीची तातडीची बैठक आज  'मातोश्री' निवासस्थानी 

महाविकास आघाडीची तातडीची बैठक आज  'मातोश्री' निवासस्थानी होणारेय. . शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणारेत. गेल्या काही दिवसांत राज्यात घडलेल्या गंभीर घटना, राजकीय आणि सामाजिक घडामोडी यांवर या बैठकीत चर्चा केली जाणार असून महाविकास आघाडीची पुढची रणनीती आणि दिशा ठरवली जाणारेय.

28 Aug 2024, 08:41 वाजता

अजित दादांच्या कट्टर समर्थकाने शरद पवार गटांकडून मागितली उमेदवारी 

अजित पवारांचे कट्टर समर्थक पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंविरोधात शरद पवार गटांकडून साकी गायकवाड यांनी उमेदवारी मागितलीय.साकी गायकवाड यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेऊन निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. साकी गायकवाड यांनी आपला कार्य अहवाल शरद पवारांना देऊन मतदार संघाची रचना आणि जिंकण्याची संधी याबद्दल चर्चा केली. अण्णा बनसोडे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची संधी साकी गायकवाड यांनी शरद पवारांकडे मागितली.

28 Aug 2024, 08:40 वाजता

पुण्यातील शाळांमध्ये तक्रार पेटीसह सखी समिती होणार स्थापन 

पुण्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये तक्रार पेटीसह सखी समिती स्थापन करण्याचे आदेश शिक्षण विभागानं दिलेत.. शाळेचे मुख्याध्यापक या सखी समितीचा आढावा घेतील.. बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय.. शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी तसंच निकोप वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर सखी समिती स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्यात.