Maharashtra Breaking News LIVE UPDATES : विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर नेतेमंडळीच्या प्रतिक्रिया आणि त्यांचे निर्णय या साऱ्याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. राज्याच्या राजकीय पटलावर नेमके कोणते बदल होतात आणि कोणता पक्ष या बदलांतून तरुन पुढे जातो यासंदर्भातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर...
28 Oct 2024, 14:15 वाजता
अमित ठाकरेंनी भरला उमेदवारी अर्ज
मनसेचे उमेदवार अमित ठाकरे माहिममधून निवडणूक रिंगणात उतरलेत. त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय. याआधी अमित ठाकरेंनी पत्नीसोबत देवदर्शन केलं. दादरच्या शिवाजी पार्कात बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरेंच्या स्मृतिस्थळाला भेट देत अभिवादन केलं. त्यानंतर चैत्यभूमीवर जाऊन आंबेडकरांना अभिवादन केलं. तसंच तिथल्या समुद्रकिना-याची पाहणी केली. त्यानंतर अनवाणी पायाने जात सिद्धीविनायकाच्या चरणी नतमस्तक झालेत.
28 Oct 2024, 13:54 वाजता
कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांनी भरला उमेदवारी अर्ज
कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमेदवारी अर्ज भरलाय... तर त्यांच्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केदार दिघेंना उमेदवारी दिलीय. केदार दिघेही आजच अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात एकनाथ शिंदे विरुद्ध आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे असा सामना रंगणारेय. अर्ज दाखल करण्याआधी दोन्ही नेत्यांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात नेमकी कोणाची वर्णी लागतेय हे पाहणं महत्त्वाचं ठरणारेय.
28 Oct 2024, 12:31 वाजता
पंढरपूर विधानसभा मतदारसंघात शरद पवारांची खेळी
पंढरपूर विधानसभा मतदारसंघात शरद पवारांची खेळी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांचे पुतणे भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांना अर्ज भरण्यासाठी दिली परवानगी. पंढरपूर विधानसभेच्या जागेवरून भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांच्यामध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली काँग्रेसने भालकेना उमेदवारी जाहीर केली असताना आज सकाळी अनिल सावंत यांनी शरद पवारांची बागेमध्ये भेट घेतली त्यानंतर अनिल सावंत सुद्धा आज दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत
28 Oct 2024, 11:42 वाजता
एकनाथ शिंदे यांना संत एकनाथ महाराजांच्या वंशजांचे शुभाशीर्वाद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संत एकनाथ महाराजांचे वंशज योगीराज महाराज गोसावी यांनी येऊन शुभाशीर्वाद दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजयी व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री शिंदे यांनी पंढरपूरच्या वारी निर्मळ वारी व्हावी यासाठी भगीरथ प्रयत्न केले. तसेच वारकरी दिंड्यांना 20 हजारांचे अनुदान दिले. त्यामुळे आज नऊ संतांचे पूर्वज त्यांना आशीर्वाद देण्यासाठी ठाणे येथे येत आहेत. त्याची सुरुवात एकनाथ महाराजांचे वंशज योगीराज महाराज गोसावी यांच्यापासून झाली.
28 Oct 2024, 11:38 वाजता
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात बंडखोरी
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात बंडखोरी करत राजाभाऊ फड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. बीडच्या खासदारामुळे मला डावलण्यात आलं राजाभाऊ फड यांचा खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर आरोप. पोस्टर फाडणारे माझे कार्यकर्तेच नाही विरोधकांच षडयंत्र. मी पक्षाचा आणि अपक्ष दोन्हीही फॉर्म भरणार आहे, अशी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया... महाविकास आघाडीमध्ये तिकीट जाहीर होतात बंडाचा झेंडा.
28 Oct 2024, 10:54 वाजता
जनतेच्या हिताची जपणूक करणारं सरकार देऊ हे वचन देतो- शरद पवार
युगेंद्र पवार या तरुण उमेदवाराचा आम्ही फॉर्म भरला असं सांगताना शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. मविआच्या जागावाटपाच्या समीकरणाविषयी बोलचाना सगळे मिळून एकवाक्यता करण्याचा प्रयत्न करत आहोत या परिस्थिती जनतेच्या हिताची जपणूक करणारं सरकार देऊ हे वचन देतो असं ते म्हणाले. महायुतीविषयी बोलताना पक्षफुटी,सत्तेचा गैरवापर लोकांना आवडला नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय.
28 Oct 2024, 10:53 वाजता
धंगेकर आज भरणार उमेदवारी
कसबा पेठ विधान सभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. कसबा गणपतीचे दर्शन घेऊन ते अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत.
28 Oct 2024, 10:47 वाजता
भाजपच्या 6 उमेदवारांच्या हातात धनुष्यबाण
भाजपं आतापर्यंत 121 जागांवरी उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेना शिंदे गटाला गेलेल्या 6 जागांवर भाजपमधून आयात उमेदवार शिवसेना शिंदे गटानं दिले आहेत.
निलेश राणे - कुडाळ मालवण
राजेंद्र गावीत - पालघर
विलास तरे - बोईसर
मुरज पटेल - अंधेरी पूर्व
संतोष शेट्टी - भिवंडी पूर्व
राजेंद्र राऊत - बार्शी
28 Oct 2024, 09:56 वाजता
एकनाथ शिंदे यांच्या बंडातील एकमेव सीटिंग आमदाराचा पत्ता कट?
बंडातील 40 आमदारांपैकी पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांच्या उमेदवारीवर अजूनही टांगती तलवार. वनगा यांच्या जागी पालघरचे माजी खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिल्याने वनगा यांच्या उमेदवारी बाबत अजूनही सस्पेन्स कायम. बंडावेळी गुजरात कडे जाण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासह सहकाऱ्यांनी श्रीनिवास वनगा यांच्या मुलाच्या वाढदिवसाच कारण केलं होतं पुढे. महायुतीकडून डहाणू विधानसभेसाठी अजूनही उमेदवार जाहीर नाही.
28 Oct 2024, 09:49 वाजता
भांडुप मधून उबाठा गटाचे सुनील राऊत आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत हे आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत दुपारी एक वाजता ते त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत दरम्यान सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानी भांडुप तमिल संघाकडून तामिळनाडू मधील पारंपारिक वाद्य वाजविली जात आहेत.. उमेदवारी अर्ज दाखल करताना सुनील राऊत यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे.