Maharashtra Breaking News LIVE UPDATES : राज्यातून आजपर्यंत 3259 उमेदवारांचे 4426 नामनिर्देशन पत्र दाखल

Maharashtra Breaking News LIVE UPDATES : महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडींना आता वेग आला असून, आजचा दिवसही अनेक बदलांचा आणि घडामोडींचा आहे...   

Maharashtra Breaking News LIVE UPDATES : राज्यातून आजपर्यंत 3259 उमेदवारांचे 4426 नामनिर्देशन पत्र दाखल

Maharashtra Breaking News LIVE UPDATES : विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर नेतेमंडळीच्या प्रतिक्रिया आणि त्यांचे निर्णय या साऱ्याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. राज्याच्या राजकीय पटलावर नेमके कोणते बदल होतात आणि कोणता पक्ष या बदलांतून तरुन पुढे जातो यासंदर्भातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर... 

 

28 Oct 2024, 07:28 वाजता

राज्याच्या राजकारणात काका पुतण्याचा नवा वाद

राज्याच्या राजकारणात काका पुतण्याचा नवा वाद. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या बंडाची चिन्ह. बीड जिल्ह्यात सोळंके कुटुंबात फूट पडण्याची शक्यता. माजलगांव विधानसभा मतदारसंघात तिकिटावरून प्रकाश सोळंके विरुद्ध जयसिंह सोळंके यांच्यात वाद. प्रकाश सोळंके यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी तर आमदारकीसाठी इच्छूल असलेल्या पुतण्या जयसिंह सोळंकेकडून बंडखोरीचे संकेत. जयसिंह सोळंके समर्थक आज घेणार पक्षाध्यक्ष अजित पवारांची भेट. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्यावर जयसिंह सोळंके समर्थक ठाम. 

28 Oct 2024, 07:11 वाजता

स्नेहल जगताप भरणार उमेदवारी अर्ज 

रायगडच्या महाडमधील ठाकरेंच्या पक्षाच्या उमेदवार स्नेहल जगताप आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत अर्ज भरणारेय. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीसह जाहीर सभेचं  ही आयोजन करण्यात आलंय. तर स्नेहल जगताप या शिवसेनेचे  आमदार भरत गोगावले यांच्या विरुद्ध लढणारे. त्यामुळे  आदित्य ठाकरे आज गोगावलेंवर काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय..

 

28 Oct 2024, 07:11 वाजता

आज दिग्गज नेते उमेदवारी अर्ज भरणार 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोपरी पाचपाखाडी विधानसभेसाठी  उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर अजित पवार  बारामतीमधून उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहे. मनसेकडून अमित ठाकरे दादर-माहिमसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ते अर्ज भरणार आहे. तर विरोधी पक्षनेते  विजय वडेट्टीवारही उमेदवारी अर्ज दाखल करणार  आहेत. बारामतीतून युगेंद्र पवार उमेदवारी अर्ज भरणार आहे तर सदा सरवणकरही उमेदवारी अर्ज भरणार आहे.