Maharashtra Politics : मंत्रिमंडळाच्या 6-8 फॉर्म्युलावरुन अजित पवार नाराज ?

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर  

 Maharashtra Politics :  मंत्रिमंडळाच्या 6-8 फॉर्म्युलावरुन अजित पवार नाराज ?

3 Oct 2023, 17:25 वाजता

उपमुख्यमंत्री अजित पवार-मुख्यमंत्री शिंदेंमध्ये तणाव ?

 

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये तणाव असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.. मुख्यत: पालकमंत्री-मंत्रिपदावरुन पवार-शिंदेंमध्ये तणाव असल्याचं समजतंय.. य़ाच तणावपूर्ण परिस्थितीत फडणवीस-शिंदे दिल्ली वारीवर आहेत. अजित पवारांनी मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारली.. त्यानंतर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.. 

 

3 Oct 2023, 17:02 वाजता

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका जाहीर

 

Grampanchayat Election Declared : राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तारीख जाहीर झालीय. 5 नोव्हेैंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. याचबरोबर 2 हजार 950 सदस्यपदांसाठी पोटनिवडणूक तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांसाठीही निवडणूक होणार आहे. तर गडचिरोली गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तेथे 07 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होईल.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

3 Oct 2023, 16:27 वाजता

Devendra Fadnavis Live | Marathi News LIVE Today : '2 पक्षांना सोबत घेऊन चालायचंय', 'योग्य मेहनत केल्यास यंदा रेकॉर्ड तोडू', '3 पक्षांचं सरकार असलं तरी ध्येय सोडणार नाही', '3 पक्षांच्या सरकारमध्ये भाजप मोठा भाऊ', 'युती सरकार असलं तरी भाजपच्या अजेंड्यात बदल नाही', 'सरकारमध्ये सर्वाधिक जागा भाजपकडे', 'ओबीसी कल्याणाचे 26 GR मी काढले','राहुल गांधींना आता ओबीसी का आठवलं?','सुवर्णाक्षरांनी निवडणूक लिहिली जाईल','मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील','मोदी पंतप्रधान होताच भारताची प्रगती', उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य.

3 Oct 2023, 16:14 वाजता

Devendra Fadnavis Live | Marathi News LIVE Today : 'मोदींच्या स्वागताला कायम मोठी गर्दी', 'एकही जण दुसऱ्याला मत देऊ शकत नाही', 'आपली लढाई इंडिया आघाडीविरोधात नाही','वेगवेगळी शकलं एकत्र येऊन इंडिया आघाडी', 'मोदींना विरोध एवढाच इंडियाचा संकल्प','काही शक्तींना अराजक तयार करायचंय', 'देशात अराजक माजवण्यासाठी इंडिया आघाडी', 'भारताच्या शत्रूंना देशातील लोकांची मदत','भारताच्या शत्रूंना राजकीय अराजकीय लोकांची मदत','यांची दुकानं बंद होतील म्हणून मोदींना विरोध', उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची इंडिया आघाडीवर निशाणा.

3 Oct 2023, 16:09 वाजता

Devendra Fadnavis Live | Marathi News LIVE Today : 'भारताच्या जनतेचा मोदींवर विश्वास','देशात भारतविरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न','राजकीय आणि अराजकीय लोकांचा यात समावेश','राहुल गांधींबद्दल विश्वासार्हता नाही','राहुल, ममता नेतृत्व देऊ शकत नाही','इंडिया आघाडी आपल्याशी लढू शकत नाही','इंडिया आघाडीत राष्ट्रीय नेता नाही','इंडिया आघाडीत कुणीही नेतृत्त्व देऊ शकत नाही', उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
 

 

3 Oct 2023, 16:02 वाजता

Devendra Fadnavis Live | Marathi News LIVE Today : 'मोदींना जिंकवण्यासाठी 2024 विजय संकल्प','अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर', 'भाजपसाठी नव्हे भारतासाठी 2024चा विजय महत्त्वाचा','जगातील देशांचा भारताजवळ यायचा प्रयत्न', 'मोदींना जिंकवण्यासाठी भाजपचा महासंकल्प', 'शेजारच्या राष्ट्रांची अवस्था वाईट', 'मोदींना जगात कुणी बॉस म्हणतं' उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य.

3 Oct 2023, 15:54 वाजता

दिल्ली भूकंपानं हादरली

 

Earthquake in Delhi : दिल्लीला पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के बसले. 6 पॉईंट 2 रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता नोंदवली गेली. दुपारी 2 वाजून 51 मिनिटांनी भूकंपाच्या धक्क्यांनी दिल्ली हादरली. काही मिनिटं मोठ्या स्वरुपाचे धक्के दिल्लीकरांना जाणवले. नेपाळमध्ये या भूकपांचं केंद्रबिंदू होतं. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

3 Oct 2023, 15:15 वाजता

Eknath Shinde Live | Marathi News LIVE Today : 'नांदेड प्रकरणी अहवाल सादर करा','पुरेसा औषध साठा होता', 'नांदेड मृत्यू प्रकरणाची चौकशी होईल','नांदेड हॉस्पिटलमध्ये औषधांची कमतरता नव्हती', 'मुख्यमंत्र्यांचे कृषी, मदत पुनर्वसन विभागाला निर्देश','9 जिल्ह्यात सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव', 'रोग पडलेल्या सोयाबीन पिकांचे पंचनामे करा','सोयाबीनचे पंचनामे करण्याचे आदेश','इमारत पुनर्विकासाला चालना देणार', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. 'दिवाळीनिमित्त आनंदाचा शिधा देणार','दिवाळीला मिळणार 100 रुपयांचा आनंदाचा शिधा', 'आनंदाचा शिधामध्ये मैदा, पोह्यांचाही  समावेश', कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

3 Oct 2023, 13:38 वाजता

खा. हेमंत पाटलांनी डीनला स्वच्छतागृह करायला लावलं साफ

 

Nanded Hemant Patil : नांदेड शासकीय रूग्णालयात आज डीनला खा.हेमंत पाटलांनी स्वच्छतागृह साफ करायला लावलं. नांदेड रूग्णालयात 2 दिवसांत तब्बल 31 मृत्यू झालेत. शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी या रूग्णालयाला आज भेट दिली. यावेळी पाहणी करताना रूग्णालयाच्या स्वच्छतेची भीषण अवस्था त्यांच्या लक्षात आली. टॉयलेटची तर अतिशय वाईट अवस्था होती. यामुळे संतापलेल्या खासदार पाटील यांनी डीनच्या हाती झाडू देत टॉयलेट साफ करायला लावलं. रूग्णालयात 260 स्वच्छता कर्मचारी असताना टॉयलेटची ही अवस्था का असा सवाल पाटील यांनी केला. अनेक विभागप्रमुख स्वतःच्या घरची कामं करण्यासाठी या कर्मचा-यांना वापरतात असा आरोप यावेळी पाटील यांनी केला.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

3 Oct 2023, 13:35 वाजता

गोव्यात मासे पकडण्याची झुंबड

 

Goa Fish : गोव्याच्या बीचवर माशांचा खच पडलाय.. गोव्यातील शापोरा बीचवर अचानक हजारो मासे आढळून आलेत.. हे मासे पकडण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडालीये.. वातावरणातील बदलांमुळे हे मासे किना-यावर आल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवलीये. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -