3 Oct 2023, 21:38 वाजता
वाघनखांसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी
Shivaji Maharaj Waghnakha : छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखं परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि लंडनचं म्युझियम यांच्यात सामंजस्य करार झालाय.. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची राज्य सरकारच्या वतीनं करारावर स्वाक्षरी केली. उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील यावेळी उपस्थित होते. लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममधून ही वाघनखं लवकरच मुंबईला आणली जाणार आहेत.. याच वाघनखांच्या मदतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सरदारांचा खात्मा केला, असा उल्लेख वाघनखांच्या या लाल पेटीवर आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
3 Oct 2023, 21:16 वाजता
पुण्यातील ड्रग्ज रॅकेटप्रकरणी 9 जणांचं निलंबन
Pune Drugs Case : पुण्यातील ड्रग्ज रॅकेटप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आलीय. पुणे शहर पोलीस दलातील एका अधिका-यासह ९ पोलिसांचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलंय. यात ड्रग्जमाफिया ललित पाटीलशी ड्रग्ज विक्रीत संबंध असल्याप्रकरणी चार पोलिसांना निलंबित करण्यात आलंय. तर ससूनमधून ललित पाटील पलायनप्रकरणी महिला अधिका-यासह 5 जणांचं निलंबन करण्यात आलंय. ललित पाटील हा पुण्यातील ड्रग्ज रॅकेटचा सूत्रधार आहे... येरवडा जेलमधील कैदी असलेल्या ललितवर गेल्या ३ जूनपासून ससूननमध्ये उपचार सुरू होते... मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ललित सोमवारी रात्री आठच्या सुमारास फरार झाला...दोन दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाच्या गेटवर 2 कोटींचं ड्रग्ज सापडलं होतं. ससून रुग्णालयातून तो ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
3 Oct 2023, 21:05 वाजता
Sunil Tatkare Live | Marathi News LIVE Today : 'अजित पवारांच्या अनुपस्थित बैठक झाली', 'बैठकीला अजित पवार नव्हते', 'मंत्र्यांच्या मागण्यांच्या निवेदनावर बैठकीत चर्चा', 'प्रकृती अस्वास्थ्यामुळे अजित पवार अनुपस्थित', सुनील तटकरे यांची माहिती.
3 Oct 2023, 20:38 वाजता
अजित पवार गटाचा महायुतीला अल्टिमेटम
Ajit Pawar on Mahayuti : अजित पवार गटानं महायुतीला अल्टिमेटम दिलाय.. '7 दिवसात पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवा' असा अल्टिमेटम अजित पवार गटानं दिलाय.. पालकमंत्रिपदावरुन अजित पवार आक्रमक झालाय.. दरम्यान पालकमंत्रिपदाबाबत दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत चर्चा करणार आहेत.
3 Oct 2023, 20:18 वाजता
महायुतीतील एक इंजिन नाराज- सुप्रिया सुळे
Supriya Sule on Ajit Pawar : महायुतीतलं एक इंजिन नाराज आहे, असं मोठं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलंय. नाराज अजित पवारांच्या देवगिरीवर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची गेल्या दोन तासांपासून बैठक सुरूय. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अनिल पाटील, संजय बनसोडे देवगिरीवरच्या बैठकीला उपस्थित आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
3 Oct 2023, 20:04 वाजता
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा फॉर्म्युला ठरला?
Maharashtra Politics : राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ आमदारांसंदर्भात महायुतीचा अंतिम फॉरम्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या फॉर्म्युल्यानुसार भाजपला ६ जागा, राष्ट्रावागीच्या अजित पवार गटाला तीन जागा आणि शिवसेनेच्या शिंदे गटालाही ३ जागा देण्यावर सहमती झाल्याचं समजतंय. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागा भरण्याबाबत हालचालींना वेग आलाय.
3 Oct 2023, 19:30 वाजता
कल्याण मारहाणप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल
Kalyan MNS Beating Case : कल्याणमधील मारहाण प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय... मनसे कार्यकर्त्यांकडून परप्रांतीय फेरीवाल्यांना मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी २४ तासानंतर महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय... पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. खरेदीसाठी गेलेल्या मराठी तरुणाला परप्रांतीय फेरीवाल्यानी मारहाण केली होती. त्याचा जाब विचारताना मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना चोप दिला...
3 Oct 2023, 19:05 वाजता
अखेर रोहित आर आर पाटलांचं उपोषण मागे
Rohit Patil : अखेर सुमन पाटील आणि रोहित आर. आर. पाटील यांनी उपोषण मागे घेतलंय. टेंभू सिंचन योजनेत सांगलीच्या तासगाव आणि कवठे महाकाळमधील 19 गावांचा समावेश करण्यात आलाय.. या मागणीसाठी उपोषण सुरू करणा-या राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटील यांना तसं पत्र देण्यात आलं. एवढंच नव्हे तर त्याबाबतचा जीआरही काढण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर सुमन पाटील आणि रोहित पाटलांनी उपोषण मागे घेतलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
3 Oct 2023, 18:33 वाजता
मंत्रिमंडळाच्या 6-8 फॉर्म्युलावरुन अजितदादा नाराज ?
Maharashtra Politics : मंत्रिमंडळ विस्तारात यात भाजप 8 तर शिवसेना 6 मंत्री पद ,,असा फॉर्म्युला असणार आहे ...सूत्र अजित दादा यांना आणखी काही मंत्रिपद पाहिजे होती त्याच बरोबर सातारा आणि पुणे पालकमंत्री पद ही हवे होतें ,त्याच बरोबर त्यांच्या त्यांच्या मंत्र्यांन पालकमंत्री पद हवी होती आणि या बाबतच काही गणिते शिंदे व फडवणीस यांच्या बरोबर जुळली नाही त्यामुळे अजित दादा नाराज असल्याची सूत्रांची माहिती
बातमीचा व्हिडीओ पाहा-
3 Oct 2023, 18:04 वाजता
अजित पवार GST काऊन्सिल बैठकीला जाणार नाहीत?
Ajit Pawar : अजित पवार जीएसटी कौन्सिल बैठकीस दिल्लीला जाणार नाहीत. येत्या 7 ऑक्टोबरला बैठक दिल्लीत होत आहे त्याला दीपक केसरकर बैठकीला जाणार. त्या दिवशी दिल्ली ऐवजी नाशिक येथे नियोजित कार्यक्रमाला अजित पवार जाणार असल्साची सूत्रांची माहिती.
बातमीचा व्हिडीओ पाहा-