3 Oct 2023, 13:26 वाजता
नांदेड, संभाजीनगर मृत्यूंची केंद्राकडून दखल
Bharti Pawar On Nanded, Sambhajinagar Incident : नांदेड आणि संभाजीनगरमधील रुग्णांच्या मृत्यूप्रकरणाची केंद्राकडून दखल घेण्यात आलीय. झी २४ तासने सातत्याने ही बातमी लावून धरल्यावर अखेर केंद्र सरकारचा त्याची गंभीर दखल घ्यावी लागलीय. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांनी रुग्णालय प्रशासनाकडून अहवाल मागवला आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
3 Oct 2023, 12:27 वाजता
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार
Prime Minister Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौ-यावर येणार आहेत. 14 किंवा 17 ऑक्टोबरला नरेंद्र मोदी मुंबईत येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. मुंबईतल्या विकास कामाचं उदघाटन तसंच बीपीटी कार्यक्रमानिमित्त मोदी यांचा हा मुंबई दौरा असणार आहे. लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महाराष्ट्र आणि मुंबईवर विशेष लक्ष आहे. त्याचनिमित्तानेही हा दौरा होणार असल्याचंही बोललं जातंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
3 Oct 2023, 11:53 वाजता
विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar On Nanded Incident : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नांदेड प्रकरणावरून सरकारवर घणाघात केलाय..लोणी खाण्यासाठी मृत्यू घडवून आणणारे राज्यकर्ते आज महाराष्ट्रात सत्ता चालवताय अशी टीका वडेट्टीवारांनी केलीय...आधी ठाणे, आता नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात मृत्यूचं थैमान झालंय...किती वेळा मंत्र्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाठीशी घालणार आहेत...आरोग्य खात्याचे हजारो कोटींची टेंडर निघतायत त्याचा पैसा कुणाच्या खिशात चाललाय? असे सवाल विचारत मुख्यमंत्र्यांनी तातडीने आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री दोघांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी वडेट्टीवारांनी केलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
3 Oct 2023, 11:24 वाजता
नांदेडमध्ये मृत्यूचं तांडव, 48 तासांत 31 मृत्यू
Nanded Hospital Death Update : नांदेडमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात गेल्या 48 तासांत 31 रूग्णांचा मृत्यू झालाय. 24 तासांत 24 मृत्यू झाल्यावर काल पुन्हा 7 जणांचा बळी गेला अशी माहिती ट्विट करत अशोक चव्हाण यांनी उघड केलीय. मृतांमध्ये ४ बालकांचाही समावेश आहे असं चव्हाण यांनी म्हटलंय. राज्य सरकारने जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी त्यांनी केलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
3 Oct 2023, 11:21 वाजता
नांदेड प्रकरणावरुन विरोधकांचा सरकारवर घणाघात
Sanjay Raut & Supriya Sule On Nanded Incident : नांदेड मृत्यू प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय...आरोग्य मंत्र्यांना त्यांच्या खात्यात रस नसल्याने ते वेगळ्याच कामात अडकलेयत...त्यामुळे माणुसकी शिल्लक असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी राऊतांनी केलीय...तर या प्रकरणाला सरकारच जबाबदार असून, हे तीन इंजिनचं खुनी सरकार असल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
3 Oct 2023, 10:46 वाजता
सरकारी यंत्रणाचं हे अपयश - शरद पवार
Sharad Pawar On Nanded Incident : नांदेड इथल्या शासकीय रूग्णालयातले मृत्यू ही मन हेलावून टाकणारी आहे असं शरद पवारांनी म्हटलंय. कळव्यातले मृत्यू गांभीर्याने न घेतल्यानेच या घटनेची पुनरावृत्ती झाली असं पवारांनी म्हटलंय. सरकारी यंत्रणांचं हे अपयश असल्याची टीका त्यांनी केलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
3 Oct 2023, 10:44 वाजता
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची राज्य सरकारवर टीका
Raj Thackeray On Nanded Incident : राज्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे अशी टीका राज ठाकरेंनी केलीय. नांदेडमधील मृत्यूंनंतर राज ठाकरेंनी टीका करणारी पोस्ट लिहिलीय. तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? असा सवाल त्यांनी केलाय. स्वतःचं आयुर्मान वाढवण्याची सरकारची धडपड आहे अशी टीका त्यांनी केलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
3 Oct 2023, 09:43 वाजता
काँग्रेस खासदार राहुल गांधींचा भाजपवर निशाणा
Rahul Gandhi On Nanded Incident : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही नांदेड रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी ट्वीट करत भाजपवर निशाणा साधलाय...नांदेडच्या शासकीय रुग्णालयात औषधांच्या कमतरतेमुळे 12 नवजात बालकांसह 24 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दु:खद आहे. मी सर्व शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. भाजप सरकार हजारो कोटी रुपये प्रचारावर खर्च करते. पण मुलांच्या औषधांसाठी पैसे नाहीत? भाजपच्या नजरेत गरिबांच्या जीवाला किंमत नाही...असं सवाल राहुल गांधींनी उपस्थित केलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
3 Oct 2023, 09:07 वाजता
नांदेडमध्ये 24 मृत्यू कशामुळं?
Nanded Hospital Update : नांदेडच्या शासकीय रुग्णालयानं मात्र या मृत्यूबाबत अजब दावा केलाय. 24 मृत्यू हे वैद्यकीय सेवेअभावी नाहीत तर अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्यानं आकडा वाढल्याचं रुग्णालय प्रशासनानं म्हटलंय. तर दुसरीकडे रुग्णालयात वेळेवर उपचार दिले जात नाहीत...औषध पुरवठा होत नाही...रुग्णांची काळजी घेतली जात नाही असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केल्याने रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
3 Oct 2023, 08:55 वाजता
घाटी रुग्णालयात 24 तासांत 10 जणांचा मृत्यू
Sambhajinagar Ghati Hospital : छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात गेल्या 24 तासांत 2 शिशूंसह 10 जणांचा मृत्यू झालाय. घाटी हॉस्पिटलमध्ये औषध टंचाई आहे. केवळ 15 दिवस पुरेल इतकाच औषध साठा सध्या रूग्णालयात आहे. त्यामुळं औषधसाठी हातात प्रिस्क्रिप्शन घेऊन भटकणारे रूग्ण हे चित्रं नेहमीच तिथे दिसतं. औषधांच्या कमतरतेमुळे मृत्यू होत असल्याचं प्रमाण वाढलंय असा आरोप करण्यात येतोय. तर अनेक रूग्ण अखेरच्या क्षणी घाटीत दाखल होतात. त्यामुळे मृत्यूचं प्रमाण अधिक आहे असं डॉक्टर्स खासगीत सांगतात.
बातमीचा व्हिडीओ पाहा -