Shinde-Fadanvis-Pawar together : गडचिरोलीत शिंदे-फडणवीस-पवार एकत्र

Maharashtra BreakinNews Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  

Shinde-Fadanvis-Pawar together : गडचिरोलीत शिंदे-फडणवीस-पवार एकत्र

8 Jul 2023, 23:49 वाजता

आदिवासी रेला नृत्यात शिंदे-फडणवीस-पवारांचा सहभाग

 

Shinde-Fadnavis-Pawar together : गडचिरोलीत शासन आपल्या दारी या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्थानिक आदिवासी रेला नृत्यात भाग घेतला.. देवेंद्र फडणवीसांनी आदिवासींसोबत स्वतःही नृत्य केलं. राष्ट्रवादीचे मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनीही रेला नृत्याचा मनसोक्त आनंद लुटला. फडणवीस इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी ढोल वाजवत कलाकारांचा उत्साह वाढवला. त्याची खास झलक तुम्ही 'झी २४ तास'वर पाहू शकता...

बातमी पाहा - गडचिरोलीत फडणवीसांनी आदिवासी रेला नृत्यावर धरला ठेका, पाहा व्हिडिओ

8 Jul 2023, 23:37 वाजता

शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार गडचिरोलीत शासकीय कार्यक्रमात एकत्र

 

Shinde-Fadnavis-Pawar together : शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पहिल्यांदाच गडचिरोलीत शासकीय कार्यक्रमात एकत्र दिसले. कोटगल एमआयडीसी क्रीडांगणावर पार पडलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात गडचिरोलीतील लाभार्थ्यांना विविध सरकारी योजनांचे दाखले देण्यात आले. यावेळी तिन्ही नेत्यांनी आदिवासी वेशभूषा परिधान केली होती... 
दरम्यान, अहंकार असल्यानं उद्धव ठाकरे केंद्राकडे काही मागत नव्हते, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी केला. तर अजित पवार सोबत आल्याने राज्यात विकासाचा त्रिशूळ निर्माण झालाय, असं फडणवीसांनी सांगितलं. राज्याच्या विकासासाठीच सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय राष्ट्रवादीनं घेतल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

बातमी पाहा - उद्धव ठाकरे अहंकारी असल्याने केंद्राकडे काही मागत नव्हते- शिंदे

8 Jul 2023, 20:54 वाजता

राष्ट्रवादीवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करा... शरद पवारांचं पंतप्रधानांना आव्हान

 

Sharad Pawar Live | Yeola Sabha : राष्ट्रवादीतल्या बंडानंतर शरद पवारांनी आज पहिली जाहीर सभा घेतली ती छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघात... यावेळी केलेल्या भाषणात पवारांनी येवलेकरांची माफी मागितली... माझा अंदाज चुकला म्हणून माफी मागतो, अशा शब्दांत छगन भुजबळांचं नाव न घेता त्यांनी जोरदार चपराक लगावली... राष्ट्रवादीवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करा... शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना आव्हान.. वय झाल्यानं निवृत्त होण्याचा सल्ला देणाऱ्यांनाही त्यांनी चांगलंच फटकारलं. वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल, असा इशारा त्यांनी दिला.

बातमी पाहा - वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल- शरद पवारांचा थेट इशारा

8 Jul 2023, 19:54 वाजता

दिल्लीतला एक अदृश्य हात हे सगळं षडयंत्र आखतोय - सुप्रिया सुळे

 

Yeola Sharad Pawar's Sabha : राष्ट्रवादीतील बंडानंतर येवल्यात झालेल्या जाहीर सभेत कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपवर निशाणा साधला... महाराष्ट्राच्या विरोधात दिल्लीचं षडयंत्र सुरूय... दिल्लीतला एक अदृश्य हात हे सगळं षडयंत्र आखतोय, असा हल्ला सुळेंनी चढवला... तर भावाभावांमध्ये मिठाचा खडा शकुनी मामानं टाकला, अशा शब्दांत फडणवीसांचं नाव न घेता कोल्हेंनी टीका केली.

8 Jul 2023, 15:20 वाजता

नागपुरात दूषित पाणीपुरी खाल्ल्यानं तरुणीनं गमवला जीव 

 

Nagpur Panipuri : नागपुरात दूषित पाणीपुरी खाल्ल्यानं एका तरुणीला जीव गमवावा लागलाय... पाणीपुरी खाल्यानं नागपुरात तीन तरुणींना गॅस्ट्रोची लागण झाली होती.. यातील एका तरुणीचा उपचारा दरम्यान मृत्यू झालाय... मृत मुलगी मुळची जम्मू-काश्मीरची असून ती शिक्षणासाठी नागपूरला आली होती.. गॅस्ट्रो झाल्यानंतरही त्यांनी उपचारास दिरंगाई केल्यानं तिघींचीही प्रकृती बिघडली.. यात एकीचा मृत्यू झाला असून दोघींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु आहेत... अद्याप याप्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाहीये. दोन्ही मुली शुद्धीवर आल्यांतर त्यांनी कोणत्या ठिकाणी पाणीपुरी खाल्ली होती हे स्पष्ट होणार आहे

8 Jul 2023, 15:13 वाजता

ठाकरेंपैकी एक भाऊ सत्तेत बसला पाहिजे- अमित ठाकरे 

 

Amit Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणावर सर्वसामान्य जनतेमध्ये संतापाचं वातावरण आहे.. या पार्श्वभूमीवर मनसेकडून एक सही संतापाची ही मोहीम राबवली जात आहे.. अमित ठाकरेंच्या उपस्थितीत दादर रेल्वे स्थानक इथून या मोहिमेला सुरुवात झालीये. यावेळी दोन भाऊ एकत्र येण्यापेक्षा राज ठाकरे सत्तेत बसले पाहिजेत अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली.  

बातमी पाहा- दोन ठाकरे बंधू पैकी एक ठाकरे सत्तेत बसला पाहिजे...; अमित ठाकरे यांचे मोठं विधान

8 Jul 2023, 14:27 वाजता

Eknath Shinde Live | Marathi News LIVE Today :  'ट्रिपल इंजिन राज्याचा विकास करेल', 'हातात खंजीर ठेवणारी माणसं बेभरवश्याची', 'अजित म्हणजे जीत आपला विजय नक्की', 'सगळ्यांना वस्तूस्थिती समजली पाहिजे', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. 

8 Jul 2023, 14:17 वाजता

Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'ना टायर्ड हू, ना रिटायर्ड हू', शरद पवार यांनी दिला वाजपेंयीच्या कवितेला उजाळा.  'चांगल्या कामासाठी वय अडथळा आणत नाही', अजित पवार यांच्या प्रश्नाला शरद पवार यांचं उत्तर. 'प्रफुल्ल पटेलांना 10 वर्ष केंद्रात मंत्रिपद', 'पराभवानंतर पटेलांना राज्यसभेत पाठवलं','सुप्रिया सुळेंना मंत्रिपद दिलं नाही', 
सर्व बंडखोरांचा पराभव होईल', शरद पवार यांचं वक्तव्य. 

बातमी पाहा- ना टायर्ड हूं ना रिटायर हूं; वयाच्या मुद्द्यावर शरद पवार यांचा अजित पवार यांना टोला

8 Jul 2023, 14:04 वाजता

Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'नाशिकमध्ये येताना वरुणराजाकडून स्वागत', 'वस्तूस्थिती मांडण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा करणार', 'महाराष्ट्रासह 3 राज्यांचा दौरा करणार', 'नाशिक शहराला ऐतिहासिक महत्त्व','यशवंतराव चव्हाण आमचे आदर्श','जनतेसमोर वस्तूस्थिती मांडणार', 'भुजबळांना येवल्यात मीच पर्याय दिला', 'ओळखीचे चेहरे दिसल्यानं आत्मविश्वास वाढला', शरद पवार यांचं वक्तव्य.
 

8 Jul 2023, 13:49 वाजता

Devendra Fadnavis Live | Marathi News LIVE Today : 'अजित पवार आमचे नवे साथी, जुने मित्र', 'गडचिरोलीच्या पावणे सात लाख लोकांना लाभ', 'लोकांच्या दारी आपलं सरकार', 'अतिदुर्गम भागातील लोकांपर्यंत योजनांचा लाभ',गडचिरोलीत 20 हजार कोटींची गुंतवणूक आणली  'विकासाचा त्रिशूळ राज्याची गरीबी दूर करणार',  'विरोधकांचा खाक करणार त्रिशूळ', उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका.