Uddhav Thackeray Group State Leaders Meeting : उद्धव ठाकरे गट विधानसभा संपर्कप्रमुखांची उद्या बैठक

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर  

Uddhav Thackeray Group State Leaders Meeting : उद्धव ठाकरे गट विधानसभा संपर्कप्रमुखांची उद्या बैठक

12 Jun 2024, 17:14 वाजता

द. कुवेतमध्ये इमारतीला भीषण आग, 41 जणांचा मृत्यू

 

Kuwait Fire : दक्षिण कुवेतमध्ये एका इमारतीला भीषण आग लागलीय.. यात 41 लोकांचा दुर्देवी मृत्यू झालाय.. मृतांमध्ये बहुतांश भारतीयांचाही समावेश आहे.. ज्या इमारतीला आग लागली त्या इमारतीत भारतीय मजूर राहत असल्याची माहिती मिळतेय. मंजफ शहरात ही घटना घडलीय. आगीत इमारत पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती आहे... या आगीत 50 पेक्षा जास्त जण जखमी झालेत..

11 Jun 2024, 19:36 वाजता

पार्थ पवार राज्यसभेसाठी इच्छुक?

 

Parth Pawar :  पार्थ पवार राज्यसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय...पार्थ पवारांनी राष्ट्रवादी कार्यालयात गेले होते...तेथे त्यांना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी भेट घेतली...राज्यसभेसाठी छगन भुजबळ, बाबा सिद्दीकी आणि आनंद परांजपेही इच्छुक असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये रस्सीखेच दिसून येतेय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

11 Jun 2024, 19:21 वाजता

'बजरंग सोनवणेंनी अजित पवारांना फोन केला', आमदार अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट

 

Amol Mitkari on Bajrang Sonwane : बीडमधले शरद पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केल्याचा गौप्यस्फोट, अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला. बीडच्या बाप्पाचा दादांना फोन अशी पोस्ट अमोल मिटकरींनी एक्स समाजमाध्यमावर करुन याबाबतची माहिती दिली. तसंच सोनवणेंनी अजित पवारांना फोन केला असून, मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता, मिटकरी यांनी वर्तवली. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

11 Jun 2024, 18:34 वाजता

उद्धव ठाकरेंनी बोलावली उद्या सर्व 288 विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक

 

Uddhav Thackeray Group State Leaders Meeting : उद्धव ठाकरे यांनी उद्या सर्व 288 विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक बोलावली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे संपर्कप्रमुखांशी संवाद साधणार आहेत. उद्या दुपारी साडेबारा वाजता सेना भवनात ही बैठक होणार आहे. यात राज्यभरातील संपर्कप्रमुखांकडून विधानसभानिहाय आढावा घेतला जाणार आहे.

 

11 Jun 2024, 18:22 वाजता

लोकसभा निवडणुकीतील यशानिमित्त उद्धव ठाकरे गटाचा उद्या मेळावा

 

Uddhav Thackeray Group Meeting : शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांचा उद्या मेळावा. बांद्रा येथील रंगशारदा सभागृहात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन, आदित्य ठाकरेंसह प्रमुख नेतेही राहणार उपस्थित. लोकसभा निवडणुकीत मुंबईत मिळालेल्या चांगल्या यशाच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचे आयोजन. विधानसभा आणि बीएमसी निवडणूक तयारीसाठी सज्ज राहण्याचे दिले जाणार आदेश. मुंबईतील माजी नगरसेवक, पदाधिकारी यांचा उद्या सायंकाळी 5 वाजता मेळावा.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

11 Jun 2024, 17:37 वाजता

सुनेकडून सासऱ्याच्या हत्येची 1 कोटीची सुपारी, तपासात कट उघड

 

Nagpur Hit and Run Case : नागपूरच्या हिट अँड रन केसमध्ये धक्कादायक खुलासा समोर आला आहे. संपत्तीच्या हव्यासापोटी सुनेनंच सास-याच्या हत्येची 1 कोटी रुपयांना सुपारी दिल्याचं, पोलीस तपासात उघड झालं. विशेष म्हणजे सुपारी म्हणून तब्बल 1 कोटी रुपये, तसंच जागेसहित बारचं लायसन्स देण्याचं ठरलं होतं. सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीवर सून अर्चना पुट्टेवार हिचा डोळा होता. यासाठी तिनं नवऱ्याच्या ड्रायव्हरलाच हत्येची सुपारी दिली होती. तर 17 लाख रुपये ऍडव्हान्स म्हणून दिले गेले होते. त्यानुसार नागपूरच्या बालाजीनगर परिसरात झालेल्या 22 मे रोजी पुरुषोत्तम पुट्टेवार यांना गाडीखाली चिरडण्यात आलं. त्यात त्यांचा मृत्यू झाला. हा सारा प्रकार अपघात म्हणून दाखवण्यात आला. मात्र नागपूर क्राईम ब्रँचच्या युनिट चारनं कसून तपास करुन, सूत्रधार सून अर्चनासह 3 आरोपींना बेड्या ठोकल्या. अर्चना ही सरकारी कर्मचारी आहे.

 

11 Jun 2024, 14:12 वाजता

चंद्रकांत पाटलांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक

 

Chandrakant Patil On Uddhav thackeray : लोकसभेसाठी सर्वात जास्त मेहनत ही उद्धव ठाकरेंनी घेतली...आजारपणा असताना ते खूप फिरले आणि 9 सीट मिळवल्या...भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलंय...2019 ला सरकार कंटिन्यू झाल असतं तर युती कंटिन्यू झाली असती...मात्र उद्धव ठाकरेंनी देखील याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे असा सल्ला पाटलांनी दिलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11 Jun 2024, 13:24 वाजता

Supreme Court On Neet Exam : सुप्रीम कोर्टात आज NEET परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी करणा-या याचिकांवर सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टानं NEET परीक्षा आयोजित करणा-या 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी' म्हणजेच NTA ला नोटीस बजावली आणि पेपर फुटीबाबत उत्तर मागितलंय. एनटीएच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय, त्यामुळे आम्हाला उत्तर हवं असल्याचं कोर्टानं म्हटलं. नीट परीक्षेच्या निकालाबाबत वाद सुरूच आहे. याप्रकरणी दाखल याचिकेच्या सुनावणीदरम्यान निकालाच्या आधारे समुपदेशनावर बंदी घालण्यासही सुप्रीम कोर्टानं नकार दिला. उत्तर मिळाल्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 जुलै रोजी होईल. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 4 जून रोजी NEET UG-2024 परीक्षेचा निकाल जाहीर केला होता आणि त्यात 67 विद्यार्थी टॉपर्स आहेत. याबाबत विद्यार्थ्यांनी निकालात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार व अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11 Jun 2024, 13:21 वाजता

मनोज जरांगेंचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

 

Manoj Jarange : सरकारकडून गोड बोलून माझा काटा काढण्याचा डाव आहे...असा अंदाज दिसतोय... असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय...सरकारकून माझ्या आंदोलनाची दखल घेतली जात नसून केवळ मला खेळवणं सुरु आहे...जर या आंदोलनाची दखल सरकारनं घेतली नाही तर मराठे यांना चांगला कचका दाखवतील असा इशाराही जरांगे यांनी दिलाय...दरम्यान जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरही त्यांनी उपचार घेण्यास नकार दिलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11 Jun 2024, 12:26 वाजता

राज्यात पालेभाज्यांचे दर गगनाला

 

Nashik Vegetable Price : पालेभाज्यांचे दर गगनाला भिडलेत. कोथिंबिरीचा दर  प्रतिजुडी 100 रुपयांवर गेलाय. तर इतर पालेभाज्यादेखील महागल्यात. महिना भरापासून भाज्यांची दरवाढ सुरुच आहे. महिनाभरापूर्वी नाशिक जिल्ह्याचं तापमान चाळिशीपार गेलं होतं. त्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे भाज्यांची आवक कमी होतेय. पुढील दोन ते तीन आठवडे पालेभाज्यांचे दर असेच चढे राहण्याची शक्यताय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -