W,W,W,W,W... 'या' विदेशी गोलंदाजाने भारताचा उडवला धुव्वा, टीम इंडियाला केले 46 धावांवर ऑल आऊट

IND vs NZ 1st Test: बेंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय संघाची फलंदाजी उद्ध्वस्त केली. 

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 17, 2024, 03:31 PM IST
W,W,W,W,W... 'या' विदेशी गोलंदाजाने भारताचा उडवला धुव्वा, टीम इंडियाला केले 46 धावांवर ऑल आऊट  title=

IND vs NZ 1st Test, Matt Henry: बेंगळुरू येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी न्यूझीलंडने टीम इंडियाला मोठा धक्का देत अवघ्या  46 धावांत गुंडाळले. बेंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय संघाच्या फलंदाजाचा धुव्वा उडवला. न्यूझीलंड टीमच्या एका गोलंदाजाने भारतीय फलंदाजांना एकापाठोपाठ एक आपले बळी बनवले. बेंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी नाणेफेक झाली तेव्हा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

'या' परदेशी गोलंदाजाने केले वादळासारखे काम  

न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी बेंगळुरूच्या खेळपट्टीवर असलेल्या ओलावा आणि ढगाळ वातावरणाचा पुरेपूर फायदा घेतला. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री पुन्हा एकदा टीम इंडियासाठी सर्वात मोठा खलनायक ठरला आहे. मॅट हेन्रीने टीम इंडियाची बॅटिंग लाईनअप उद्ध्वस्त केली. एक एक करत त्याने भारताच्या बेस्ट फलंदाजांचा धुव्वा उडवला.  भारत विरुद्ध बंगळुरू येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात  मॅट हेन्रीने 13.2 षटकात 15 धावा देत 5 बळी घेतले.

टीम इंडियाचे कोणते फलंदाज झाले आउट?

मॅट हेन्रीने भारताच्या 5 मोठ्या फलंदाजांची शिकार केली. मॅट हेन्रीने सरफराज खान (0), ऋषभ पंत (20), रवींद्र जडेजा (0), रविचंद्रन अश्विन (0) आणि कुलदीप यादव (2) यांना पॅव्हेलियनमध्ये परतवले. टीम न्यूझीलंडचा आणखीन एक गोलंदाज विल्यम ओरूर्कने चांगली साथ दिली. विल्यम ओरूर्कने 12 षटकात 22 धावा देत 4 बळी घेतले. कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बंगळुरूच्या खेळपट्टीवर जबरदस्त स्विंग पाहायला मिळाले.

टीम इंडिया 46 रन्सवर झाली ऑलआऊट 

ढगाळ वातावरणात भारतीय फलंदाजनसाठी उपयुक्त ठरेल नाही.टीम इंडियाचा पहिला डाव 31.2 षटकात अवघ्या 46 धावांवर आटोपला. वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल परिस्थितीत, मॅट हेन्री, टिम साऊदी आणि विल्यम ओरुर्क यांनी स्विंगसह भारतीय फलंदाजांचा नाश केला. पहिल्या सत्रात न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. या सत्रात भारतीय संघाने 34 धावा करताना 6 विकेट गमावल्या.

 

विराट कोहली शून्यावर बाद

विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाल्याने मैदानावर उपस्थित प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण होते, मात्र विल्यम्सने खाते न उघडताच कोहलीला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. सातव्या धावांवर टॉम ब्लंडेलने ऋषभ पंतचा झेल सोडला नसता तर भारताची सातवी विकेट गेली असती. मात्र, त्याला या संधीचा फारसा फायदा घेता आला नाही आणि तो 20 धावांवर बाद झाला. मॅट हेन्रीने 5 तर विल्यम ओरूर्कने 3 विकेट्स घेतल्या. घरच्या मैदानावर भारताची ही सर्वात लहान धावसंख्या आहे.