रोहित शर्माने चूक कबूल केली, लाजिरवाण्या खेळीनंतर म्हणाला 'मला पीच नीट वाचता आली नाही...'

IND VS NZ 1st Test : दुसऱ्या दिवसाअंती न्यूझीलंडने तीन विकेट्स गमावून 180 धावा केल्या. टीम इंडियाच्या लाजिरवाण्या परफॉर्मन्सनंतर कर्णधार रोहित शर्माने आपली चूक मान्य केली. 

पुजा पवार | Updated: Oct 17, 2024, 08:09 PM IST
रोहित शर्माने चूक कबूल केली, लाजिरवाण्या खेळीनंतर म्हणाला 'मला पीच नीट वाचता आली नाही...'  title=
(Photo Credit : Social Media)

IND VS NZ 1st Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टेस्ट सीरिज मधला पहिला सामना बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर पार पडत आहे. या टेस्ट सिरीजमध्ये दुसऱ्या दिवशी टॉस जिंकून भारताचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु पहिले बॅटिंगसाठी उतरलेली टीम इंडिया फक्त 46 धावांवर ऑल आउट झाली. यानंतर दुसऱ्या दिवसाअंती न्यूझीलंडने तीन विकेट्स गमावून 180 धावा केल्या. टीम इंडियाच्या लाजिरवाण्या परफॉर्मन्सनंतर कर्णधार रोहित शर्माने आपली चूक मान्य केली. 

काय म्हणाला रोहित शर्मा? 

बंगळुरूमध्ये दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर रोहित शर्मा पत्रकार परिषदेसाठी आला. यावेळी त्याने आपली चूक मान्य केली आणि आपण पीच नीट वाचू शकलो नाही असे म्हटलं. रोहितने पत्रकार परिषदेत सांगितले की, 'आम्ही विचार केला की पहिल्या सेशननंतर या पिचमधून वेगवान गोलंदाजांना जास्त मदत होणार नाही. कारण तिथे जास्त गवत नव्हते. आम्ही विचार केला की ती सपाट असेल. पण हा चुकीचा निर्णय होता आणि मी पिच नीट वाचू शकलो नाही'. 

हेही वाचा : मुंबई इंडियन्स रोहित शर्माला रिटेन करणार की नाही? समोर आली मोठी अपडेट

 

टीम इंडियाने नावावर केला नकोस विक्रम :

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु  न्यूझीलंडच्या घातक गोलंदाजी समोर टीम इंडियाचे फलंदाज एका मागोमाग एक बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले. टीम इंडियाकडून सुरुवातीला यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा यांची जोडी मैदानात उतरली. तेव्हा यशस्वी 13 तर रोहित अवघ्या 2 धावांवर ऑल आउट झाला. त्यानंतर ऋषभ पंत (20) वगळता कोहली (0), सरफराज खान (0), केएल राहुल (0), रवींद्र जडेजा (0), आर अश्विन (0) इत्यादी तब्बल 5 फलंदाज शुन्यावर बाद झाले. तर कुलदीपने 2, बुमराहने 1 तर सिराजने 4 धावा केल्या. परिणामी टीम इंडियाला 46 धावांवर ऑल आउट व्हावे लागले. 

टीम इंडिया पहिल्यांदाच घरच्या मैदानात खेळल्या टेस्ट सामन्यात 50 हून कमी धावा करून बाद झाली. यापूर्वी 2020 मध्ये ऑस्ट्रेलियात एका टेस्ट सामन्यादरम्यान टीम इंडिया 32 धावांवर ऑल आउट झाली होती. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील एका इनिंगमध्ये केलेला टीम इंडियाचा हा तिसरा सर्वात कमी स्कोअर आहे. 

हेही वाचा : आयपीएल मेगा ऑक्शनची तारीख आली समोर, कुठे आणि कधी होणार आयोजन?

भारताची प्लेईंग 11 :

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

न्यूझीलंडची प्लेईंग 11 :

टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टिम साउथी, एजाझ पटेल, विल्यम ओरूरके