14 Mar 2024, 23:23 वाजता
डिझेल आणि पेट्रोल 2 रुपयांनी स्वस्त होणार
Diesel - Petrol Rate : सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी.. डिझेल 2 रुपयांनी स्वस्त होणार आहे.. पेट्रोल दरातही 2 रुपयांनी घट होणार आहे.. उद्या सकाळपासून पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू होणार आहेत.
14 Mar 2024, 22:25 वाजता
दोन दिवसांत मुख्यमंत्री सूचना करतील- विजय शिवतारे
CM Shinde - Vijay Shivtare Meeting : शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बैठक कोणत्याही निर्णयाशिवाय संपलीय. मुख्यमंत्र्यासमोर आपली बाजू मांडल्याची माहिती शिवतारेंनी यावेळी दिलीय.. बारामती लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून लढण्याची घोषणा शिवतारेंनी केली होती.. तसंच अजित पवारांना थेट आव्हानही दिलं होतं.. त्यामुळेच विजय शिवतारेंना मुख्यमंत्र्यांनी बोलावलं होतं. मात्र आजच्या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही.. पुन्हा दोन दिवसांनी बैठक होणार असल्याचं शिवतारेंनी म्हटलंय.. या बैठकीत मुख्यमंत्री आणि शिवतारेंसोबत मंत्री संदीपान भुमरे आणि शंभूराज देसाईसुद्धा उपस्थित होते.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
14 Mar 2024, 21:45 वाजता
सत्ताधारी भाजपच्या वाट्याला सर्वाधिक इलेक्टोरल बॉन्ड्स
Electoral Bond Details : राजकीय पक्षांच्या वाट्याला आलेल्या निवडणूक निधीचा तपशील अखेर जाहीर झालाय.. त्यानुसार सत्ताधारी भाजपच्या वाट्याला सर्वाधिक रक्कम आलीय... सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर एसबीआयनं ही माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला दिली... निवडणूक आयोगानं हा तपशील आपल्या वेबसाईटवर अपलोड केला... दोन भागांमध्ये ही यादी देण्यात आलीय... पहिल्या यादीमध्ये इलेक्टोरल बॉन्ड विकत घेणाऱ्या कंपन्यांची, उद्योगांची आणि व्यक्तींची नावं आहेत.. तर दुसऱ्या यादीमध्ये कोणत्या राजकीय पक्षानं कधी हा निधी आपल्या खात्यात वळता करून घेतला, याची माहिती आहे... इलेक्टोरल बॉन्ड योजना घटनाबाह्य असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टानं दिला होता. या योजनेत जमा झालेल्या निधीचा तपशील जाहीर करण्याचे आदेशही कोर्टानं दिले होते.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
14 Mar 2024, 20:11 वाजता
महायुतीच्या जागावाटपासाठी काही उशीर नाही- देवेंद्र फडणवीस
Fadanvis on Mahayuti : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात मोठी बातमी... महायुतीचे लोकसभेचे उमेदवार लवकरच जाहीर करु अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलीय.. महायुतीच्या उमेदवारांबाबत 80 टक्के काम झालंय. फक्त 20 टक्के काम बाकी असल्याचं त्यांनी म्हटलंय. चौथ्या उमेदवारासाठी काम बाकी राहिलंय का या प्रश्नावर मात्र फडणवीसांनी मोघम उत्तर दिलं.. महायुतीच्या जागावाटपासाठी कोणताही उशीर झाला नसल्याचंही फडणवीस म्हणालेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
14 Mar 2024, 18:48 वाजता
शरद पवारांची साथ, विजारधारा सोडली नाही- निलेश लंके
Lanke Meet Sharad Pawar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंकेंनी आज पुण्यात शरद पवारांची भेट घेतली... लंके राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करून अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे... लंके-पवार भेटीच्या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आणि आमदार अशोक पवारही उपस्थित होते. शरद पवार साहेब आणि माझी विचारधारा एकच आहे. साहेबांची साथ कधीच सोडली नाही, असं लंकेंनी यावेळी सांगितलं.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
14 Mar 2024, 18:10 वाजता
राष्ट्रवादीच्या आमदारांना व्हीप लागू, लंकेंनी चुकीचं काही करू नये- अजित पवार
Ajit Pawar on Lanke : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंकेंना सूचक इशारा दिलाय... लोकसभा निवडणूक लढवायची असेल तर आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल, असं त्यांनी बजावलंय... लंकेनी आज पुण्यात शरद पवारांची भेट घेतली... ते नगरमधून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.. दरम्यान, राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांना व्हीप लागू आहे. त्यामुळं लंकेंनी चुकीचं काही करू नये, असं अजित पवारांनी सुनावलं.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
14 Mar 2024, 17:53 वाजता
गोरेगाव-राममंदिर रोडवर फर्निचर मार्केटमध्ये आग, अग्निशमन दल घटनास्थळी
Jogeshwari Fire : मुंबईच्या जोगेश्वरीत भीषण अग्नितांडव. गोरेगाव-राममंदिर रोडवर फर्निचर मार्केटमध्ये आग लागल्याची माहिती.. फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल.. आग विझवण्यात फायर ब्रिगेडला अडचणी.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
14 Mar 2024, 16:24 वाजता
वसंत मोरे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता
Vasant More in NCP Office : मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मोरे हे पुण्यातल्या पवारांच्या राष्ट्रवादी कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत खासदार अमोल कोल्हे आणि आमदार अशोक पवारही उपस्थित आहेत. पवारांनी फोनवरून संपर्क साधल्यामुळे त्यांना
14 Mar 2024, 16:03 वाजता
धनंजय मुंडे सोबत असल्यामुळे प्रीतम मुंडेंपेक्षा जास्त मतांनी निवडून येणार.. पंकजा मुंडेंना विश्वास
Pankaja Munde on Candidature : लोकसभेची उमेदवारी मिळण्याची अपेक्षा नव्हती अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी व्यक्त केलीय. मात्र राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी मिळणं हा सन्मान समजते अशी पुस्तीही त्यांनी जोडली. धनंजय मुंडे सोबत असल्यामुळे प्रीतम मुंडेंपेक्षा जास्त मतांनी निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. तसंच प्रीतम मुंडेंना विस्थापित होऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी पत्रकार परिषदेत आपल्या बहिणीला दिली.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
14 Mar 2024, 14:05 वाजता
वसंत मोरे शरद पवार गटाच्या वाटेवर?
Vasant More : वसंत मोरे शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर?..आज 4 वाजता मोरे शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता..वसंत मोरेंना शरद पवारांकडून संपर्क झाल्याची माहिती..वसंत मोरे पवार, जयंत पाटलांची भेट घेण्याची शक्यता..