14 Mar 2024, 10:15 वाजता
200 उमेदवार मतदारसंघात उभे करणार- बच्चू कडू
Bacchu Kadu : आमदार बच्चू कडू महायुतीचं टेन्शन वाढवणार आहेत.. खासदार अभियानाअंतर्गत प्रत्येक मतदारसंघात 200 ते 300 उमेदवार उभे करणार असल्याचं बच्चू कडू म्हणालेत.. महायुतीमध्ये घटक पक्षांना विचारात घेतलं जात नसल्याचं खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
14 Mar 2024, 10:03 वाजता
एकनाथ खडसे सूनेविरोधात निवडणूक लढणार?
Eknath Khadse : रक्षा खडसेंना भाजपनं उमेदवारी दिल्यानंतर आता एकनाथ खडसे काय करणात अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय.. एकनथ खडसे सुनेविरोधात निवडणूक लढणार का? ते कोणाचा प्रचार करणार या सगळ्या चर्चांवर एकनाथ खडसे काय म्हणालेत पाहूयात..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
14 Mar 2024, 09:28 वाजता
दक्षिण मुंबईतून शिंदे गटाकडून यशवंत जाधव लढण्यास इच्छुक
Yashwant Jadhav : दक्षिण मुंबई लोकसभेसाठी महायुतीत रस्सीखेच सुरु झालीये.. भाजपकडून या मतदारसंघासाठी राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा सुरु असताना शिंदे गटाकडून यशवंत जाधवही दक्षिण मुंबईतून लढण्यास इच्छुक आहेत.. सोशल मीडियावर यशवंत जाधव दक्षिण मुंबईचे उमेदवार म्हणून पोस्ट व्हायरल केलीये. दरम्यान याबाबत आज ते मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
14 Mar 2024, 09:07 वाजता
विजय शिवतारे घेणार मुख्यमंत्री शिंदेंची भेट
Vijay Shivtare will meet CM Shinde : बारामती लोकसभा निवडणूक लढवण्यावर विजय शिवतारे ठाम असल्यामुळे महायुतीतील हा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री सरसावलेत. मुख्यमंत्र्यांनी विजय शिवतारे यांना फोन केलाय. आज त्यांना वर्षा बंगल्यावर भेटण्यासाठी बोलावले आहे. आजच्या बैठकीत बारामतीचा तिढा सोडवण्यावर चर्चा केली जाणार आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा :
14 Mar 2024, 08:24 वाजता
अंबाबाईच्या मूर्तीची पुरातत्व विभागाकडून पाहणी
Ambabai Temple : पुरातत्व खात्याकडून आज करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्तीची पाहणी करण्यात येत आहे.. कोर्टाने पुरातत्व विभागाचे निवृत्त अधिकारी विलास मांगीराज आणि आर एस त्र्यंबके यांची मूर्तीची पाहणी करण्यासाठीं आयुक्त म्हणून नेमणूक केली आहे. या दोघांचाही अंबाबाई मूर्तीच्या संवर्धन प्रक्रियेत सहभाग होता.. त्यामुळे अंबाबाई देवीच्या मूर्तीची परिस्थिती काय आहे.. नेमकं कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागणार हे आता कोर्टाच्या माध्यमातून कळणार आहे..अंबाबाईच्या मूर्तीची परिस्थीती नाजूक असल्याची बातमी झी २४तासनं सर्वात प्रथम दाखवली होती.. झी २४ तासच्या पाठपुराव्यानंतर अखेर या मूर्तीची आज पाहणी केली जाणार आहे.. त्यानंतर मूर्तीच्या संवर्धनासाठी प्रशासन कोणती पावलं उचलते याकडे सा-यांचं लक्ष लागलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
14 Mar 2024, 08:06 वाजता
राष्ट्रवादी पक्ष, चिन्हाबाबत आज सुनावणी
NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह याबाबत आज सुप्रिम कोर्टात सुनावणी होणारेय. शरद पवार गटाने निवडणुक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. त्याच संदर्भातली सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.
14 Mar 2024, 07:31 वाजता
राहुल गांधी आज नाशिकमध्ये
Rahul Gandhi : मालेगावनंतर राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज नाशिकमध्ये दाखल होणार आहे.. नाशिकमध्ये राहुल गांधींचा रोड शो होणार आहे.. रोड शोनंतर राहुल गांधी दुपारी नाशिकमधील शेतक-यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर राहुल गांधी त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतील...त्यानंतर 14 जानेवारीला राहुल गांधीची भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरमधून सुरु झाली होती...6 हजार 700 किलोमीटरचं अंतर पार करत ही यात्रा मुंबईत समाप्त होणार आहे.. 15 मार्चला ही यात्रा ठाण्यात दाखल होईल... त्यानंतर 17 मार्चला यात्रा शिवाजी पार्कमध्ये या यात्रेची सांगता होईल
बातमीचा व्हिडीओ पाहा-
14 Mar 2024, 07:22 वाजता
आमदार निलेश लंके शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार?
Nilesh Lanke : राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आज शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत...अशी माहिती सूत्रांनी दिलीय...दुपारी चार वाजेच्या दरम्यान पुण्यात लंके पक्षप्रवेश करणार आहे...भाजप खासदार सुजय विखे यांना लोकसभा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लंके यांच्या हालचालींना वेग आलाय...निलेश लंके हे नगरमधून लोकसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत...
बातमीचा व्हिडीओ पाहा-