14 Mar 2024, 13:21 वाजता
अजित पवार गटाला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
Sharad Pawar vs Ajit Pawar : अजित पवार गटाला सुप्रीम कोर्टानं फटकारलंय...अजित पवार गटाला शरद पवारांचं नाव आणि फोटो वापरण्यावर आक्षेप घेण्यात आलाय...यापुढे शरद पवारांचा फोटो वापरणार नाही याची लेखी हमी द्या असं कोर्टानं म्हटलंय...यासाठी दोन दिवसांचा वेळ दिलाय...आता पुढील सुनावणी 19 मार्चला होणार आहे...
14 Mar 2024, 13:02 वाजता
'वन नेशन, वन इलेक्शन'चा अहवाल राष्ट्रपतींकडे सादर
One Nation One Election : वन नेशन, वन इलेक्शन'चा अहवाल राष्ट्रपतींकडे सादर करण्यात आलाय...माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतींकडे 18 हजार पानांचा अहवाल सादर केलाय...लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका एकत्रित घेण्याची शिफारस या अहवालात करण्यात आलीय...एकत्र निवडणूक घेतल्यानं निवडणुकीवरील खर्च कमी होईल असा दावा समितीकडून करण्यात आलाय...या समितीचे अध्यक्ष माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आहेत...
14 Mar 2024, 12:43 वाजता
'मोदी देशाचे पंतप्रधान की गुजरातचे?',उद्धव ठाकरेंचा सवाल
Uddhav Thackeray Live | Marathi News LIVE Today : माझा पक्ष, नाव, चिन्ह, वडील चोरले...जेवण सोडून लोकं मला ऐकण्यासाठी आले...भाजपला पैसे देऊन लोकं आणावे लागतात...भ्रष्टाचाऱ्यांना अभय हीच मोदी गॅरंटी..भाजपची भ्रष्टाचारी अभय योजना सुरू...मासेमारीसाठी महाराष्ट्रात गुजरातच्या बोटी..LEDलाईट लावून मासेही चोरून नेत आहेत...गुजरातबद्दल आमचा द्वेष नाही...गुजरातच्या हक्काचं आम्ही देणार...महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले..मोदी देशाचे पंतप्रधान की गुजरातचे?..उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर टीका..
14 Mar 2024, 12:30 वाजता
'भाजपचं नासलेलं कुसलेलं हिंदुत्व', उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
Uddhav Thackeray Live | Marathi News LIVE Today : भास्कर जाधव तुम्ही एकटे नाहीत...भास्कर जाधवांसोबत पक्ष आहे...भाडोत्री जनता पक्षाने सरकार पाडलं...मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं..मला मुख्यमंत्रिपद स्वीकारावं लागलं...भाजपचं शिवीगाळ करणारं हिंदुत्व...भाजपचं नासलेलं कुसलेलं हिंदुत्व...आमच्या हिंदुत्त्वात ओव्या आहेत...उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल..गद्दारी करून आमच्या पाठीत वार केला...विनायक राऊत नसते तर कोकणात गुंडगिरी वाढली असती...उद्धव ठाकरेंची नारायण राणेंवर टीका
14 Mar 2024, 12:05 वाजता
मविआतील जागावाटपाबाबत चर्चा- सूत्र
Mahavikas Aghadi : राहुल गांधी, शरद पवार आणि संजय राऊतांमध्ये बैठक झाल्याची माहिती समोर आलीय...राहुल गांधींच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये 10 ते 15 मिनिटं महत्वाची चर्चा झालीय...या चर्चेत बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले मात्र सहभागी नव्हते...मविआतील जागावाटपाविषयी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...
14 Mar 2024, 11:35 वाजता
पुणे ISIS दहशतवाद्यांचं सातारा कनेक्शन उघड
Pune ISIS Terrorist Satara Connection : पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांचं सातारा कनेक्शन उघड झालंय.. या दहशतवाद्यांपैकी शाहनवाज आलम आणि मोहंमद साकी या दोघांनी साता-यातील एका सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकला होता. यातून मिळालेल्या पैशातून त्यांनी बॉम्ब तयार करण्याचं साहित्य खेरदी केलं होतं अशी माहिती पोलीस चौकशीतून उघड झालीये. पुण्यातील कोथरूड भागातून या दहशतवाद्यांना अटक केली होती.. या दहशतवाद्यांनी टेरर फंडींगसाठी कशा प्रकारे पैसे जमा केले, ते पैसे कोणाला दिले याचा तपास सध्या सुरु आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
14 Mar 2024, 11:08 वाजता
महायुतीचा मनसेला 1 ते 2 जागांचा प्रस्ताव?
Mahayuti on MNS : महायुतीने मनसेला 1 ते 2 जागेवर लढण्याचा प्रस्ताव दिलाय अशी माहिती सूत्रांनी दिलीय...मात्र, निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवा अशी अटही महायुतीने टाकलीय...हा महायुतीचा प्रस्ताव राज ठाकरेंनी नाकारल्याची माहिती आहे...त्यामुळे महायुती मनसेला पुन्हा नवीन प्रस्ताव देण्याची शक्यता आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
14 Mar 2024, 10:41 वाजता
'श्रीमंतांची कर्ज माफ होतात, गरिबांची नाही', राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका
Rahul Gandhi Live | Marathi News LIVE Today : कांद्याच्या दराबाबत चर्चा नाही...कांदा दर हा सर्वात मोठा मुद्दा...महागाई, बेरोजगारी, भागिदारी मोठी समस्या..शेतकरी प्रश्नावर सरकारचं मौन..श्रीमंतांची कर्ज माफ होतात, गरिबांची नाही...उद्योजकांचे 16 लाख कोटी कर्ज माफ...शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलं जात नाही...70 कोटी लोकांकडे जेवढे पैसे तेवढे 22 लोकांकडे..राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका..स्वामीनाथन आयोग लागू करणार..पीकविमा योजनेत सुधारणा करणार..शेतकऱ्यांसाठी जीएसटी हटवणार...राहुल गांधींचं शेतकऱ्यांना आश्वासन..
14 Mar 2024, 10:38 वाजता
'सत्ता आल्यावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विसर', शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका
Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : कांदा शेतकऱ्यांकडे सरकारचं दुर्लक्ष...सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही...राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती गंभीर...शेतकरी संकटात, कर्जबाजारी झालाय...सत्ता नसताना कांद्याला भाव देण्याची मागणी करायचे...मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना न्याय नाही...सत्ता आल्यावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विसर..कांदा प्रश्नी शद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका.
14 Mar 2024, 10:25 वाजता
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती खालावली
Pratibha Patil : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती खालावली..पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे...2 डॉक्टरांच्या मदतीने प्रतिभाताई पाटील यांच्यावर उपचार सुरु.