India's Victory over Bangladesh : भारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

India's Victory over Bangladesh : भारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय

19 Oct 2023, 23:35 वाजता

भारताची बांग्लादेशवर 7 विकेट्सने मात, कोहलीची शानदार सेंच्युरी

 

India's Victory over Bangladesh : पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर टीम इंडियाचा विजयी चौकार...वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय. भारताची बांग्लादेशवर 7 विकेट्सने मात... विजयी सिक्सर मारून विराट कोहलीनं झळकावली शानदार सेंच्युरी.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

19 Oct 2023, 20:25 वाजता

जयंत पाटील अजित पवार गटाच्या संपर्कात- धर्मरावबाबा आत्राम

 

Dharmarao Baba Atram on Jayant Patil : राष्ट्रवादीचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा दोन्ही गटांकडून केला जातोय.. अशातच खुद्द जयंत पाटीलच वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा मंत्री आत्राम यांनी केलाय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

19 Oct 2023, 19:45 वाजता

दसऱ्याच्या दिवशी साई मंदिर रात्रभर खुले राहणार 

 

Shirdi Sai Baba Temple : शिर्डीत चार दिवशीय दसरा उत्सवाचे आयोजन करण्यात आलंय. 105 व्या पुण्यतिथीउत्सवाची साई संस्थान प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरूये. दसऱ्याच्या मुख्य दिवशी भाविकांना दर्शनासाठी साईमंदिर असणार रात्रभर खुले राहणार आहे. तीन लाखाहून अधिक भाविक दसरा उत्सवानिम्मित शिर्डीला येणार असल्याने संस्थानच्या प्रसादालयात दोन ते अडीच लाख भाविकांची महाप्रसाद घेण्याची व्यवस्था करण्यात आलीय.
 

19 Oct 2023, 19:35 वाजता

आमदार अपात्रतेवर उद्या पुन्हा सुनावणी

 

MLA Disqualification : आमदार अपात्रबाबत उद्या पुन्हा विधानसभा अध्यक्ष सुनावणी घेणार. विधानभवनात संध्याकाळी 4 वाजता सुनावणी घेणार. सर्व याचिका एकत्र करा या ठाकरे गटाच्या मागणीवर अध्यक्ष उद्या निर्णय देणार

बातमीचा व्हिडीओ पाहा-

19 Oct 2023, 18:16 वाजता

सुनेत्रा अजित पवार बारामती लोकसभा लढणार?

 

Sumitra Pawar : सुनेत्रा अजित पवार या लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगू लागलीय...बारामती लोकसभा मतदारसंघात वाढदिवसानिमित्त बॅनर लावण्यात आलेयत...या बॅनरवर सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा देताना संसदेचा फोटो लावण्यात आलाय...बारामती लोकसभा मतदारसंघातील वारजे भागात हे बॅनर लावण्यात आलेयत...त्यावर पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा असाही उल्लेख करण्यात आलाय...त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या बॅनरमुळे चर्चांना उधाण आलं असून बारामतीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार अशी लढत होण्याची चर्चा रंगलीय. दरम्यान आता हा बॅनर काढण्यात आल्याचं दिसून येतंय. दरम्यान बारामतीतून कुणीही निवडणूक लढवू शकतो. मात्र ही लढाई वहिनीविरोधात नव्हे तर भाजपविरोधात असल्याचा टोला सुप्रिया सुळेंनी लगावलाय. 

 

 

19 Oct 2023, 17:52 वाजता

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नकोय- नारायण राणे

 

Narayan Rane : एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज-जरांगे पाटलांनी कंबर कसलेली असताना दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी वेगळी भूमिका घेतलीय. मराठा आणि कुणबी यात फरक आहे. कुठलाही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. असं मोठं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलंय. कुठल्याही मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र नकोय. ते कुणबी प्रमाणपत्र घेणार नाहीत असा दावाही नारायण राणेंनी केलाय. मनोज जरांगेंनी जातींचा अभ्यास करावा असा सल्लाही नारायण राणेंनी जरांगेंना दिलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

19 Oct 2023, 17:35 वाजता

बारामतीत शिकावू विमान कोसळलं

 

The Plane Crashed in Baramati : बारामतीत शिकावू विमान कोसळलंय. बारामती तालुक्यातल्या कटफळ इथं हे विमान कोसळलं. रेडबर्ड कंपनीचं हे शिकाऊ विमान होतं. लँडिंगवेळी हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात पायलट शक्ती सिंग किरकोळ जखमी झालाय. बारामतीत पायलट्सना ट्रेनिंग दिले जातं आणि याच दरम्यान विमान लँडिंग करताना हा अपघात झालाय. 

19 Oct 2023, 17:29 वाजता

कोकण रेल्वे पॅन्ट्री डब्यात उंदरांचा सुळसुळाट

 

Konkan Railway : लोकम्यान टिळक मडगाव एक्सप्रेसमध्ये उंदरांचा सुळसुळाट झालाय. या कोकण रेल्वेच्या पॅन्ट्रीमध्ये उंदारांचं वास्तव्य असल्याचं समोर येतंय..प्रवाशांसाठी बनवल्या जाणाऱ्या खाद्यावर उंदीर राजरोसपणे ताव मारताना दिसतायत. अंबादास दानवेंनी हा व्हिडियो सोशल मीडियावर टाकलाय. भांड्यांवर झाकणही ठेवलं नसल्याने चक्क भांड्यावर चढून उंदीर हे खाद्यपदार्थ खाताना आपल्याला या व्हिडिओत दिसतंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-  

19 Oct 2023, 16:44 वाजता

शरद पवार लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत

 

Sharad Pawar : आगामी लोकसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतलाय.. पवारांनी माढा लोकसभा निवडणूक लढवावी, अशी इच्छा पदाधिका-यांनी व्यक्त केली होती. मात्र लोकसभेच्या दिंडोरी मतदारसंघाच्या आढावा बैठकीत पवारांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचं जाहीर केलंय.. आगामी निवडणुकांमध्ये राज्यभरात दौरे करणार असून, संघटना मजबूत करण्यावर भर देणार असल्याचं त्यांनी सांगितले. पक्ष बळकट करण्यासाठी राज्यासह देशातही दौरा करण्याचा निर्धार पवारांनी व्यक्त केला.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

19 Oct 2023, 14:54 वाजता

ललित पाटील प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद- प्रकाश आंबेडकर

 

Prakash Ambedkar : ललित पाटील प्रकरणात पोलीस लपवाछपवी करत असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय. यासाठी त्यांनी मुंबई बॉम्बस्फोटाचं एक उदाहरणही दिलं. पोलिसांनी ललित पाटील प्रकरण फारसं गांभीर्यानं घेतलेलं नाही, त्यांची भूमिका संशयास्पद वाटते असंही आंबेडकरांनी म्हंटलंय.