India's Victory over Bangladesh : भारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

India's Victory over Bangladesh : भारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय

19 Oct 2023, 08:50 वाजता

एक राज्य, एक गणवेश निर्णयाची अंमलबजावणी

 

One State One Uniform : पुढील शैक्षणिक वर्षांपासून एक राज्य एक गणवेश निर्णयाची अंमलबजावणी होणारेय. शासकीय तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते  आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एक समान रंगाचे दोन गणवेश देण्यात येतील. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत हे गणवेश देण्यात येणारेत. मोफत गणवेश योजनेबाबत शाळा व्यवस्थापन समितीनं स्थानिक पातळीवर कार्यवाही करू नये अशा सूचना शालेय शिक्षण विभागानं दिल्यायत. या संदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

19 Oct 2023, 08:29 वाजता

शरद पवार माढ्यातून लोकसभा लढवणार?

 

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केलीय. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यालयात काल माढा लोकसभा मतदारसंघाची बैठक पार पडली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी ही मागणी केली. 2009 सालच्या निवडणुकीत शरद पवार हे या मतदारसंघातून निवडून आले होते. या मतदारसंघातून 2019 सालच्या निवडणुकीमध्ये भाजपचे रणजितसिंह निंबाळकर हे खासदार म्हणून निवडून आलेत.त्यामुळे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता पवारांनी स्वतः निवडणूक लढवली तर हा मतदारसंघ पुन्हा राष्ट्रवादीच्या ताब्यात येऊ शकतो असं कार्यकर्त्यांचं मत आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

19 Oct 2023, 08:14 वाजता

बांगलादेश टीम इंडियाविरुद्ध उलटफेर करणार?

 

India vs Bangladesh Match : पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर आज टीम इंडियाचा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे.. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने विजयाची हॅटट्रिक केलीय.. तेव्हा विजयाचा चौकार लगावण्यासाठी रोहितची टीम इंडिया सज्ज आहे.. मात्र भारत आणि बांगलादेशमधलं मैदानातलं कट्टर वैर सर्वांनाच ठावूक आहे. त्यातच मागच्या 4 पैकी 3 मॅचमध्ये बांगलादेशने टीम इंडियाचा पराभव केलाय.. बांगलादेशच्या टीममध्येही शाकीब अल हसन, मेहदी हसनसारखे क्रिकेटर्स आहेत.. जे मॅचचा निकाल बदलू शकतात.. तेव्हा भारत विजयाचा चौकार मारणार की बांगलादेश मोठा उलटफेर करणार याकडे सर्वांचंच लक्ष असेल.. दुसरीकडे आजच्या मॅचसाठी शार्दूल ठाकूरऐवजी आर. अश्विनला संधी मिळणार का हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

19 Oct 2023, 08:05 वाजता

सोलापूर बनतंय ड्रग्जचा अड्डा

 

Solapur Drugs Seized : सोलापुरातील चिंचोळी MIDC येथील ड्रग्स फॅक्टरी उघडकीस आणल्यानंतर आता सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केलीय...सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गवरील मोहोळ तालुक्यातील देवडी फाटा येथून 3 किलो 10 ग्रॅम ड्रग्ज जप्त केलंय...त्याची किंमत सहा कोटी रुपये इतकी असल्याची माहिती मिळतेय...सोलापूर ग्रामीण पोलिसांना खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली होती...दोघे आरोपी ड्रग्स घेऊन देवडी इथे येणार होते...त्यावेळी पोलिसांनी सापळा रचला आणि दोघांना रंगेहाथ अटक केली...दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, यांनी ड्रग्ज कुणून आणलं होतं...? याचा तपास सुरूये...

बातमीचा व्हिडीओ पाहा -